रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

मा, महसूल मंत्री महोदयांचे अध्यक्षतेखालील बैठक दि २६.१०.२०१८

नमस्कार मित्रांनो , तलाठी संघाच्या अडीअडचणी बाबत मा, महसूल मंत्री महोदयांचे अध्यक्षतेखालील बैठक दि २६.१०.२०१८ मंत्रालयातील त्यांचे दालनात झाली त्यामध्ये अनेक महत्वाचे निर्णय झाले असून अनेक महत्वाच्या निर्णयासाठी शासन विचार्कार्त आहे असे दिसून आले . महत्वाचे निर्णय झाले १. तलाठी यांचे कडून दिलेल्या नकलेसाठी प्राप्त नक्कल फी मधे तलाठ्याला १० रु हिस्सा दिला जाईल . यामध्ये ई फेरफार प्रणाली अंतर्गत online accounting systemविकसित करणेत येईल असे जमाबंदी आयुक्त कार्यालयाचे वतीने स्पष्ट करणेत आहे २. पीएलए मंजूर - ई फेरफार प्रकल्प[ व्यवस्थित कार्यान्वित ठेवण्यासाठी व महाभूमी प्रकल्प व्यवस्थापन संस्था सक्षम करण्यासाठी स्वीय प्रपंजी लेख खाते उघडण्यास वित्त विभागाने सहमती दिली असल्याने महालेखापालांच्या मन्यते नंतर शासन निर्णय निर्गमित होईल ४. तलाठी मंडळ अधिकारी यांना LAPTOP वितरणाचा आढावा घेतला या मध्ये आज अखेर ७७२० LAPTOP वितरीत झाले असून ३६०२ LAPTOP खरेदी प्रक्रियेत आहेत . उर्वरीत ३१३८ LAPTOP तातडीने उपलब्ध करून देणेसाठी संबंधित सर्व जिल्हाधिकारी यांना सूचना दिल्या असल्याचे ACSसर यांनी सांगितले . ४. तलाठी आंतर विभागीय बदली साठी दुय्यम सेवा परीक्षा ssd पास झालेले सर्व पात्र समजून कार्यवाही केली जाईल ५. १४०३ तलाठी रिक्त पद भरतीला मान्यता दिली जाणार ६. नविन पदनिर्मिती उच्चस्थरीय समिती कडे सादर करणार . ७. अ.का. / मं.अ. आदला बदली जीआर महसूल संघटनेशी चर्चा करून रद्द करणार ८.भूसंपादन ३% आस्थापना खर्चातून तलाठी कार्यालय बांधणार ९. तलाठी कार्यालय भाड्याच्या थकीत रकमे पैकी काही रक्कम या वर्षात मार्च पुर्वी देणार १०. तलाठी व मंडळ अधिकारी कायम प्रवास भत्ता वाढ चा पुढील आर्थिक वर्षात निर्णय घेणार ११. सामान्य प्रशासन विभागाच्या मान्यतेने तलाठी SSD तोंडी परिक्षा रद्द करणार १२ . पुनस्थापित तलाठी यांना अकार्यकारी पदा ऐवजी अन्य तालुक्यात पदस्थापना देणेबाबत , तलाठ्यांनी DSP काम काळजीपूर्वक करावे . सुटी साठी ४५ वर्षाची मर्यादा ५० वर्षे केली परंतु ती पूर्वलक्षी प्रभावाने लागू करू नये पेसा क्षेत्रातील तलाठी भारती अश्या अन्य विषयावर सविस्तर चर्चा झाली ई फेरफार साठी क्लाऊड संस्थेची निवड झाली असून लवकरच ई फेरफार प्रकल्प CLOUD वर स्थलांतरीत होईल तसेच तहसील कार्यालये MPLS CONNECTIVITY जोडण्यास देखील HPC ने मान्यता दिली आहे असेही मा. अप्पर मुख्य सचिव महसूल महोदयांनी सांगितले . नंतर मा. मंत्री महोदय व ACS सर यांनी ई फेरफार प्रकल्प DSP सह पूर्ण करण्यासाठी काम चालू ठेवावे असे सुचविले त्यावर श्री डूबल अप्पा यांनी संघटनेचा DSP च्या कामावर बहिष्कार नसून असहकार आहे असे स्पष्ट केले तसेच दि ३ नोव्हेंबर च्या संघाच्या आमसभेत चर्चा करून निर्णय करू असे सांगितले हे आपल्या माहिती साठी सस्नेह रामदास जगताप

Comments

Archive

Contact Form

Send