रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

7/12 वरील क्षेत्र दुरूस्ती योग्य पध्दतीने न केल्याने निर्माण झालेल्या स्थिती बाबत ---- तहसिलदार यांनी काम पुर्ण झालेचे प्रमाणपत्र देणेबाबत.

मार्गदर्शक सुचना क्रं. 67 क्र.रा.भू.अ.आ.का.4/रा.स/67/2018 जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि अभिलेख, (म.राज्य) पुणे यांचे कार्यालय, पुणे, दिनांक 22 /09/2018 प्रति, उपजिल्हाधिकारी तथा डी.डी.ई (सर्व) विषय : - 7/12 वरील क्षेत्र दुरूस्ती योग्य पध्दतीने न केल्याने निर्माण झालेल्या स्थितीबाबत. तहसिलदार यांनी काम पुर्ण झालेचे प्रमाणपत्र देणेबाबत. ई-फेरफार प्रणाली मध्ये कृषक जमिनीचे 7/12 चे एकक हे. आर. चौ. मी. मध्ये व अकृषक जमिनीचे 7/12 चे एकक आर. चौ. मी. निश्चित केल्याप्रमाणे व तसेच शेती व बिगर शेतीचे 7/12 स्वतंत्र केल्याचे कार्यवाही केल्यानंतर तयार होणारे 7/12 चे क्षेत्र व एकक योग्य रित्या रूपांतरीत न केल्याने खालील प्रमाणे त्रृटी निर्माण झालेल्या आहेत. 1. 7/12 शेतीसाठी निवडून आर.चौ. मी. एकक नमुद केले आहे. 2. शेत जमिनीचे 7/12 चे एकक न बदलता फक्त्‍ा चुकुन क्षेत्र रूपांतरीत केले आहे. 3. 7/12 बिगर शेतीसाठी निवडला आहे. तथापि त्याचे एकक आर.चौ. मी. करून क्षेत्र रूपांतर केले नाही. 4. बिगर शेती क्षेत्राचे अकृषिक क्षेत्र रुंपातरीत केले आहे. मात्र त्याचे एकक हे. आर. चौ.मी मध्येच ठेवले आहे. अशा सर्व त्रृटीमुळे अनेक स.नं. चे व पर्यायाने गावचे भौगोलिक क्षेत्र अवास्तवरित्या वाढलेले दिसुन येते. वरील सर्व त्रृटी दूर करण्यासाठी क्षेत्र व एकक रूंपातरणाची कार्यवाही तलाठी यांनी योग्यरित्या झाले का? नाही याबाबत खात्री तहसिलदार यांनी करणे आवश्यक आहे. कोणत्या स.नं. मध्ये अवास्तव क्षेत्र वाढ किंवा घट झाली आहे. हे ठरविण्यासाठी DBA लॉगीनला क्षेत्रनिहाय स.नं. चा अहवाल उपलब्ध करून दिला आहे. त्याप्रमाणे DBA यांनी गाव निहाय अवास्तव वाढ किंवा घट झालेल्या स.नं. ची यादी काढून तलाठी यांनी त्यांना विचारणा करावी. सर्व तलाठी यांच्या लॉगीनला ई-फेरफार क्षेत्र अहवाल मध्ये खालील प्रमाणे 7 अहवाल देण्यात आले आहेत. ते अहवाल पाहून तलाठी यांनी स.नं. निहाय क्षेत्र व एकक दूरूस्तीकरणे अपेक्षित आहे. 1. कृषिक 7/12 ची यादी ज्यांचे क्षेत्र 50 पेक्षा जास्त आहे व ज्यांचे एकक हेक्टर आहे. 2. कृषिक 7/12 ची यादी ज्यांचे क्षेत्र 50 पेक्षा जास्त आहे व ज्यांचे एकक हेक्टर .आर.चौ.मी. आहे. 3. बिनशेती 7/12 ची यादी ज्यांचे क्षेत्र 50 पेक्षा जास्त आहे व ज्यांचे एकक आर.चौ.मी. आहे. 4. बिनशेती 7/12 ची यादी ज्यांचे क्षेत्र 50 पेक्षा जास्त आहे व ज्यांचे एकक हेक्टर .आर.चौ.मी. आहे. 5. बिनशेती 7/12 ची यादी ज्यांचे क्षेत्र 999 पेक्षा जास्त आहे व ज्यांचे एकक हेक्टर आहे. 6. बिनशेती 7/12 ची यादी ज्यांचे क्षेत्र 999 पेक्षा जास्त आहे व ज्यांचे एकक आर.चौ.मी. आहे. 7. कृषिक व बिनशेती 7/12 ची यादी ज्यांचे क्षेत्र 50 पेक्षा जास्त आहे व ज्यांचे एकक हेक्टर किंवा आर.चौ.मी. आहे. वरील अहवाल ७ मध्ये (कृषिक व बिनशेती ७/१२ ची यादी) या अहवाला मध्ये गावातील सर्व ७/१२ ची यादी आहे .प्रत्येक ७/१२ वर त्याचे एकक नमूद आहे . तलाठी यांनी या अहवालातील प्रत्येक ७/१२ समक्ष तपासून त्याचे एकक व क्षेत्र योग्य असल्याची खात्री करावी . सोबत काही चुका व त्यांचे उपाय दर्शविले आहेत ज्याद्वारे चुका कशा दुरुस्त करता येतील त्याचे मार्गदशन होईल . तहसिलदार, उपविभागीय अधिकारी, DDE व DCR यांच्या लॉगीनला गाव निहाय अहवाल (Village Report) मध्ये क्षेत्र दुरूस्तीच्या अहवालाचा गोषवारा उपलब्ध करून दिला आहे. त्याप्रमाणे आपल्या कार्यक्षेत्रातील क्षेत्र दुरूस्तीचे काम योग्यरित्या झाले आहे का? हयाची खात्री करावी. व सर्व स.नं. आकारबंद प्रमाणे योग्य असल्याचे प्रमाणीत करावे. तहसिलदार यांनी MIS मधील क्षेत्र व एकक पडताळणी अहवाल (गाव निहाय एकत्रीत अहवाल) पाहून सर्व गावांचे काम योग्य रित्या झाले असल्याची खात्री करून खालील प्रमाणे प्रमाणपत्र सादर करावे. हे काम योग्यरित्या पुर्ण झाल्याची खात्री उपविभागीय अधिकारी यांनी करावी. क्षेत्र व एकक पडताळणी प्रमाणपत्र तहसिल कार्यालय -------------------------जि------------------------------------ अचुक 7/12 व 8अ साठी शेती व बिगरशेतीच्या 7/12 प्रमाणे क्षेत्र व एकक दुरूस्तीचे सर्व गावांचे ( संख्या ----) काम पुर्ण झाले असून संगणकीकृत 7/12 वरील एकुण क्षेत्र व अद्यावत आकारबंद (गाव न.नं.1 ) प्रमाणे जुळते आहे. हयाची खात्री करण्यात आली आहे. (नांव- ) तहसिलदार -------- जिल्हा ------ तलाठी लॉगीनचे अहवाल व त्याचा वापर याबाबतचे युजर मॅन्युअल व ७/१२ वरील क्षेत्र व एककाच्या चुका व दुरुस्ती करावयाच्या सुविधा बाबतची माहिती तक्ता सोबत जोडला आहे त्या प्रमाणे प्रत्यक्ष कार्यवाही करावी . सदरच्या सुचना सर्व वापरकर्ते यांचे निर्दशनास आणाव्यात, ही विनंती. आपला विश्वासु (रामदास जगताप) राज्य समन्वयक, रा.भू.अ.आ.का. जमाबंदी आयुक्त कार्यालय, पुणे प्रत- उपआयुक्त(महसुल) विभागीय आयुक्त कार्यालय (सर्व) यांना माहितीस्तव. प्रत-उपविभागीय अधिकारी, (सर्व) यांना माहितीस्तव. प्रत- तहसिलदार, (सर्व) यांना माहितीस्तव.

Comments

Archive

Contact Form

Send