मोबाईल ॲपद्वारे तलाठी मंडळ अधिकारी कार्यालयांचे मॅपींग करणे बाबत.
मार्गदर्शक सुचना क्रं.- 7१ क्र.रा.भू.अ.आ.का.4/रा.स/ ७१ /2018
जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि
अभिलेख, (म.राज्य) पुणे यांचे कार्यालय,
पुणे, दिनांक - 0१ /10/2018
प्रति,
उपजिल्हाधिकारी तथा
डी.डी.ई (सर्व)
विषय- मोबाईल ॲपद्वारे तलाठी मंडळ अधिकारी कार्यालयांचे मॅपींग करणे बाबत.
महसुल विभागातील अंत्यत महत्वाच्या तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालयांचे स्थान अक्षांश रेखांशा द्वारे निश्चित करून त्याद्वारे या कार्यालयाचे जिल्हा व तालुका मुख्यालया पासूनचे अंतर निश्चित करून त्या ठिकाणी इंटरनेट सेवा उपलब्ध करून देण्यासाठी MARSAC नागपूर या राज्य शासनाच्या संस्थेकडून Location Survey 1.0 हे Android Mobile Aap विकसीत करणेत आले आहे. हे मोबाईल ॲप तलाठी/मंडळ अधिकारी यांच्या Android मोबाईलवर Download वरून Install करावे. त्याचा वापर करून आपल्या जिल्हयातील सर्व तलाठी कार्यालये, मंडळ अधिकारी कार्यालये, तहसिल कार्यालये व उपविभागीय अधिकारी कार्यालयांचे Location Survey करण्यात येणार नाही. त्यासाठी खालील प्रमाणे कार्यवाही करावी.
Mobile Specification for Location Survey :-
Internet Service Provider Any ISP with 4G Data Card
Operating System Android OS 5.1.1 & above
AGPS and Glonass GPS Mobile device should have this feature
Camera 2 MP and above
RAM 3GB and above
Internal Memory 8GB 8GB & above
Processor 1.2 GHZ & above quad core.
आपल्याला पाठविल्या Link चा वापर करून Help Manual प्रमाणे प्रत्येक तलाठी व मंडळ अधिकारी यांनी मोबाईलमध्ये location Survey 1.0 हे मोबाईल ॲप Downlaod करून Install करावे व आपले Aap Instalation नंतर GPS Services सुरू (on ) कराव्यात. आपल्या जिल्हयांचा Downlaod manager वापरून तालुका निवडणेत यावा.Send manager चा वापर करून सर्व्हे केलेले Location पाठविण्यासाठी केला जातो. Profile manager मध्ये वापरकर्त्यांची माहिती साठविणे आवश्यक आहे.
तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालय लोकेशन मापिंग आप साठी mrsac.maharashtra.gov.in/locationmapping/ link
यामध्ये Location survey mobile app वर क्लिक करून आप downlod करा
हे आप फक्त android mobile वर चालते ( iphone वर नाही ) हे आप mobile download न झाल्यास laptop वर download करून mobile वर install करावे
१. profile manager मध्ये अधिकारी / कर्मचारी यांचे नाव , पदनाम , mobile नो. व ई मेल आय डी नोंदवावा
२. Download manager वर फक्त एकदा क्लीक करावे ,
३ Mapping मध्ये तलाठी निवडून jurisdiction मध्ये TALATHI SAJA ------ अथवा मंडळ अधिकारी यांचेसाठी CO -----नमूद करावे.त्यानंतर कार्यालयाचा पूर्ण पत्ता नमूद करावा व PIN CODE नमूद करुर माहिती SAVE करावी
४. Send Manager मधील माहिती SEND करावी
५. EXIT काम संपताच AAP मधून EXIT व्हावे
हे आप फक्त एकदाच वापरावयाचे आहे . या माहितीचे आधारे प्रत्येक तलाठी मंडळ अधिकारी कार्यालयात इंटरनेट कनेक्शन देण्या साठी आवश्यक माहिती तत्काळ प्राप्त होणार आहे .
वरील प्रमाणे प्रत्येक तलाठी साजा मुख्यालय , महसूल मंडळ मुख्यालय , तहसील व उप विभागीय अधिकारी कार्यालयाचे लोकेशन सर्वे करून अहवाल दि १०.१०१.२०१८ पर्यंत इकडे पाठवावा .
आपला विश्वासु
(रामदास जगताप)
राज्य समन्वयक, रा.भू.अ.आ.का.
जमाबंदी आयुक्त कार्यालय, पुणे
प्रत- उपआयुक्त(महसुल) विभागीय आयुक्त कार्यालय (सर्व) यांना माहितीस्तव.
प्रत-उपविभागीय अधिकारी, (सर्व) यांना माहितीस्तव.
Comments