रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

समाईक/संयुक्त खात्यातील अविभाज्य हिश्श्याचे हस्तांतरणाबाबत अविभाज्य हिस्स्याचे खरेदीपत्र हे नविन sub article दुय्यम निबंधक यांना उपलब्ध करून देणे बाबत

मार्गदर्शक सूचना क्रमांक -६५ क्र. रा.भू.अ.आ.का ./कक्ष ४ /रा.स. /६५/२०१८ जमाबंदी आयुक्त व संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे यांचे कार्यालय दिनांक : - ३१.८.२०१८ प्रति, उपजिल्हाधिकारी तथा डि डि ई (सर्व.) सह जिल्हानिबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी (सर्व.) विषय :- समाईक/संयुक्त खात्यातील अविभाज्य हिश्श्याचे हस्तांतरणाबाबत दुय्यम निबंधक यांना अविभाज्य हिस्स्याचे खरेदीपत्र हे नविन sub article उपलब्ध करून देणे बाबत. महोदय, सन 2016 पासुन राज्यात i-SARITA प्रणालीत नोंदविण्यात येणारे शेतजमीन / बिनशेती जमीनीचे हस्तांतर दस्‍त ऑनलाईन पध्दतीने भूमी अभिलेख विभागाच्या “ई-फेरफार ” प्रणालीतुन भोगवटादाराची नांवे व क्षेत्र घेऊन नोंदविले जात आहेत. वैयक्तिक खात्यातील संपुर्ण अथवा अंशत: हिश्श्याचे खरेदीपत्र नोंदविताना 25. अभिहस्तांतरण हे अनुच्छेद वापरावे. व त्याचे खाली उपलब्ध होणाऱ्यादस्त प्रकारांपैकी ( शिर्षकांपैकी ) योग्य प्रकार ( शीर्षक ) निवडून दस्त नोंदणी केली जाते . काहीवेळा समाईक अथवा संयुक्त खातेदारांपैकी काही विशिष्ट सहहिस्सेधारक त्यांचा मिळकतीमधील अंशत: अथवा पुर्णत: हक्क खरेदीदाराला अविभाज्य हिस्सा म्हणुन विक्री करुन शकतात. अशा नोंदणीकृत दस्तांचे ई-फेरफार प्रणालीत फेरफार प्रमाणीत होऊन त्याचा 7/12 वर योग्यरित्या अंमल येण्यासाठी 1. अविभाजय हिश्श्याची पुर्ण विक्री (162) व 2. अविभाज्य हिश्श्याची अंशत: विक्री (163) असे दोन subtitle तयार करण्यात आले असुन i-SARITA प्रणालीत अनुच्छेद 25 अभिहास्तांकन खाली उपलब्ध होणऱ्या दस्त प्रकारामध्ये ( शिर्षकांमध्ये ) नोंदणी साठी उपलब्ध करुन दिले आहेत. समाईक / संयुक्त खात्यात अनेक सहहिस्सेदार विशिष्ट क्षेत्र धारण न करता समाईकात क्षेत्र धारण करत असतील तर आणि त्यापैकी काही सहहिस्सेधारक आपला पुर्ण हिस्सा अथवा अंशत: हिस्सा दुसऱ्या खात्यातील खातेदारांना विक्री करत असतील तर अविभाज्य हिश्श्याची अंशत: विक्री व अविभाज्य हिश्श्याची पुर्णत: विक्री या पैकी एक योग्य पर्याय वापरण्यात यावा . खरेदी देणाराचे नांवे क्षेत्र व विक्री क्षेत्र बरोबर / समान असल्यास अविभाज्य हिश्श्याचे पुर्ण विक्री हा पर्याय निवडावा व ज्या ठिकाणी खरेदी देणाराचे नांवे क्षेत्रापेक्षा विक्री क्षेत्र कमी असल्यास अविभाज्य हिश्श्याचे अंशत: विक्री हे sub article वापरावे. या दोन्ही दस्त प्रकारातील दस्त नोंदणी पुर्ण झालेनंतर त्याची माहिती संबंधीत तलाठयाकडे पाठविण्यात येईल व त्याप्रमाणे संबंधीत गावात फेरफार होऊन अशा फेरफार तपशिलामध्ये खरेदी क्षेत्र नमूद न करता नोंद होईल व 7/12 वर प्रत्यक्ष अंमल होताना त्या समाईक / संयुक्त खात्यातुन खरेदी देणारांची नांवे कमी होऊन त्याच खात्यात जमीन खरेदीदारांचे फक्त नाव / नांवे समाविष्ट होतील अशी सुविधा विकसित केली असुन ती १ सप्टेंबर , 2018 पासुन राज्यातील सर्व जिल्हयांना उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्याप्रमाणे संबंधीत दुय्यम निबंधक यांनी दस्त नोंदणी व तलाठी यांनी अविभाज्य हिस्स्याचे खरेदीपत्र हा फेरफार प्रकार घेऊन मंडळ अधिकारी यांनी नोंद निर्गत करण्याची कार्यवाही करावी . सदरच्या मार्गदर्शक सुचना नोंदणी महानिरीक्षक कार्यालयाच्या सहमतीने निर्गमित करणेत येत आहेत . सोबत याबाबतचे user manual जोडले आहे. सदरच्या सुचना सर्व दुय्यम निबंधक, तलाठी व मंडळ अधिकारी यांचे निदर्शनास आणाव्यात ही विनंती. आपला विश्वासू, (रामदास जगताप ) उपजिल्हाधिकारी तथा राज्य समन्वयक , ई फेरफार प्रकल्प , जमाबंदी आयुक्त तथा संचालक भूमी अभिलेख यांचे कार्यालय , ( महाराष्ट्र राज्य ) पुणे. प्रत . मा. नोंदणी महानिरीक्षक ,, महाराष्ट्र राज्य , पुणे नोंदणी उप महानिरीक्षक ( सर्व ) उप विभागीय अधिकारी ( सर्व ) तहसीलदार ( सर्व )

Comments

Archive

Contact Form

Send