कोकण विभागीय कार्यशाळा दि.06/09/2018 खोपोली. ता . खालापूर
क्रमांक राभूअआका 4/कार्यशाळा/2018
जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि अभिलेख
(म.राज्य) पुणे यांचे कार्यालय
पुणे दिनांक 04/09/2018
प्रति,
मा.उप आयुक्त (महसूल)
विभागीय आयुक्त कार्यालय,
कोकण विभाग, कोकण
बेलापूर, नवी मुंबई
विषय - ई - फेरफार प्रणालीत अंमलबजावणी
कोकण विभागीय कार्यशाळा दि.06/09/2018 खोपोली. ता . खालापूर
ई - फेरफार प्रणालीच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी तयार केलेल्या विविध मॉड्युलमधील कार्यपध्दती याबाबत प्रशिक्षणवर्ग व प्रत्यक्ष अंमलबजावणीतील अडीअडचणी याबाबतचे चर्चासत्र यासाठी विभागीय स्तरावर मास्टर ट्रेनर्सची कार्यशाळा आयोजित करण्याचे निर्देश मा. जमाबंदी आयुक्त यांनी दिले आहेत.
त्या अनुषंगाने कोकण विभागातील मास्टर ट्रेनर्सची कार्यशाळा गुरूवार दिनांक 06/09/2018 रोजी सकाळी 10.00 ते सायं. 6.00 या कालावधीत शाहू महाराज सामाजिक सभागृह, खोपोली (नाट्यगृह) ता . खालापूर या ठिकाणी आयोजित केली आहे. तरी सदर कार्यशाळेसाठी आपल्या विभागातील सर्व DDO, सर्व तालुक्यांचे तहसिलदार व नायब तहसिलदार/DBA, प्रत्येक तालुक्यातील 2 तलाठी व 2 मंडळ अधिकारी तसेच सर्व जिल्ह्यांचे सुचना विज्ञान केंद्र अधिकारी (DIO/ADIO) व सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी यांना देखील कार्यशाळेत उपस्थित राहण्याच्या सुचना द्याव्यात ही विनंती.
आपला विश्वासू,
(रामदास जगताप)
उपजिल्हाधिकारी तथा
राज्य समन्वयक ई फेरफार प्रकल्प
प्रत - उपजिल्हाधिकारी तथा DDE ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई उपनगर.
2/- आपल्या जिल्ह्यातून कार्यशाळेसाठी येणा-या मास्टर ट्रेनर्सची नावे व संख्या तात्काळ विभागीय
आयुक्त कार्यालय व DDE रायगड यांना कळवावी.
प्रत - राष्ट्रीय सुचना विज्ञान केंद्र अधिकारी ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई उपनगर.
प्रत - सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई उपनगर.
Can anyone tell me How to Contact Ramdas Jagtap Sir ?
ReplyDeleteRespected Sir, kindly reply for the same.
ReplyDelete