ऑनलाईन पिकपाहणी प्रणाली (O.C.U.) मध्ये पिक-पेऱ्याच्या नोंदी योग्य पध्दतीने होण्याबाबत.
मार्गदर्शक सूचना क्रमांक - 69
रा.भू.अ.आ.का/रा.स./कावि/६९ /२०१८ दिनांक २५.९.२०१८
प्रति,
उपजिल्हाधिकारी तथा डि.डि.ई. (सर्व)
विषय :- ऑनलाईन पिकपाहणी प्रणाली (O.C.U.) मध्ये पिक-पेऱ्याच्या नोंदी योग्य पध्दतीने होण्याबाबत.
महोदय,
राज्यभरात ई-फेरफार प्रणाली कार्यान्वित करण्यास दिनांक 23/01/2013 च्या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आली असुन त्याप्रमाणे पुर्वतयारी पुर्ण झाल्यानंतर जानेवारी 2015 ते एप्रिल 2016 या कालावधीत वेगवेगळया तारखांपासून त्या त्या तालुक्यात ई-फेरफार प्रणाली कार्यान्वित केली असून त्याद्वारे हस्तलिखीत गा.न.नं. 7/12 व फेरफार नोंदवही ( गा.न.नं. 6) बंद करुन संगणकीकृत गा.न.नं. 7/12 व गा.न.नं. 6 ठेवण्याचे निर्देश दिले आहेत त्या तारखेपासुन पुढील हंगामाची पिकपाहणीच्या नोंदी देखील ऑनलाईन पिकपाहणी प्रणाली (Online Crop Updation Module-OCU) द्वारे घेणे अपेक्षीत आहे. तथापि अशाप्रकारे पिक-पेऱ्याच्या नोंदी संगणकीकृत करताना अनेक त्रुटी निदर्शनास येत आहेत. त्याबाबत खालीलप्रमाणे कार्यवाही करावी. 1. पिक-पेऱ्याच्या नोंदी करताना ऑनलाईन प्रणालीमध्ये मिश्र पिके, घटक पिके, निर्भेळ पिके, अजलसिंचीत व जलसिचिंत याप्रमाणे योग्य रकान्यात नोंदी घेण्यात याव्यात. काही ठिकाणी एकच पिक असतांना घटक पिक रकान्यात पिकपाहणी नोंदविली जाते हे योग्य नाही. तसेच काही ठिकाणी ऊसासारखे बागायती ( जलसिंचीत) पिकाची नोंद अजलसिंचीत मध्ये घेतली जाते हे योग्य नाही. 2. एखाद्या स.नं. / ग.नं. च्या पोटहिस्स्यात एक पेक्षा जास्त पिके एकत्रित पेरणी / लागवड केली असल्यास त्या-त्या पिकाच्या क्षेत्राच्या प्रमाणात घटक पिक म्हणुन प्रत्येक पिक नोंदवून अशा प्रत्येक घटक पिकाचे क्षेत्र नमुद करावे. यामध्ये सर्व घटक पिकांच्या क्षेत्राची बेरीज त्या-त्या वर्षात / हंगामात एकुण क्षेत्रापेक्षा जास्त असु नये. तसेच यातील घटक पिक जलसिंचीत आहे की अजलसिंचीत ते पाहुन योग्य त्या रकान्यात क्षेत्र हे.आर, चौ.मी. मध्ये नमुद करावे. (एकच पिक असल्यास निर्भेळ पिक या रकान्यात पिकांची नोंद घ्यावी.) 3. काही ठिकाणी पड क्षेत्राच्या नोंदी पिक म्हणून घटक पिक किंवा निर्भेळ पिक म्हणुन घेतल्या आहेत ते अयोग्य असुन पडक्षेत्राच्या नोंदी लागवडी अयोग्य क्षेत्राच्या तपशील व क्षेत्र या रकान्यात घेण्यात याव्यात. 4. फळपिकांच्या नोंदी हे पिक घेतले असल्यास क्षेत्राच्या स्वरुपात घेण्यात याव्यात. यामध्ये झाडांची संख्या नमुद करण्याची सोय सध्यातरी नाही मात्र बांधावरील झाडांच्या नोंदी शेरा रकान्यात घेण्यात याव्यात व तेथे झाडांची संख्या नमुद करता येईल. 5. काही जिल्हयात स्थानिक बोली भाषेप्रमाणे पिकांच्या नोंदी हस्तलिखीत 7/12 वर घेतल्या जात होत्या. त्याप्रमाणेच नोंदी ऑनलाईन OCU प्रणालीत देखील घेतल्या आहेत ते योग्य नाही. उदा. ज्वारी ऐवजी शाळु, दादर, भात ऐवजी साळ, धान इत्यादी. तसेच काही ठिकाणी पिक घेण्याच्या पध्दती अन्वये पिकांच्या नोंदी घेतल्याचे दिसून येते. उदा. धान रोवणे, सुरु ऊस, जाणारा ऊस, खोडवा ऊस इत्यादी. त्याऐवजी फक्त भात अथवा ऊस अशा प्रकारे नोंदी घेणे अपेक्षीत आहे. 6. दिनांक 24 /11 /1997 च्या शासन परिपत्रकाप्रमाणे बिगरशेतीच्या 7/12 वर नमुना 12 मध्ये पिकांच्या नोंदी करण्याची गरज नाही तथापि लागवडी अयोग्य क्षेत्राच्या तपशीलामध्ये अकृषीक पड क्षेत्र ------ नमुद करता येईल. 7. जलसिंचनाची साधने म्हणुन शक्यतो विहीर, नदी, कॅनॉल, बोअरवेल, सामुहिक शेततळे इत्यादी घेता येईल. तथापि जलसिंचनाच्या साधनांची संख्या DBA Login ला विहीरी-१, विहीरी-२, विहीरी-३ असे नमुद करुन तलाठी स्तरावर पिकपाहणी करताना वापरता येतील. काही ठिकाणी धरणाची नांवे, पाटबंधारे प्रकल्पाची नांवे नमुद करुन जलसिंचनाच्या साधनांच्या नोंदी घेता येतील. उदा. उजनी धरण, बाभळी धरण, कुकडी प्रकल्प, निरा डावा कालवा इत्यादी. 8. ठिबक सिंचन, तुषार सिंचन, शेडनेट हाऊस, पॉली हाऊस अशा नोंदी घेण्याची सध्या तरतुद नाही. याबाबत कृषी विभागाच्या रितसर मान्यतेने स्वतंत्र सुविधा विकसित करता येऊ शकतील. पिकांच्या नोंदी कृषीगणना संचालनालयाने ठरवून दिलेल्या कृषीगणना सांकेतांकाप्रमाणे घेणे आवश्यक आहे. त्यासाठी अधिकृत पिकांची यादी ( सांकेतांक क्रमांकासह ) प्रमाणे व पिकांच्या नोंदी घेण्यात याव्यात तरच राज्यातील कृषीगणनेसाठी अचूक आकडेवारी राज्यस्तरावर उपलब्ध होऊ शकेल. या यादीमध्ये नसलेले कोणतेही पिकांचे नांव अथवा बांधावरील झाडांचे नांव Crop Master अथवा Tree Master मध्ये समाविष्ट करण्यासाठी DDE यांचे मार्फत या कार्यालयाकडे प्रस्ताव पाठवावा. पिक पाहणीच्या नोंदी घेण्याचा हंगामनिहाय व विभाग निहाय कालावधी शासनाने परिपत्रकान्वये निश्चित करुन दिला आहे त्या कालावधीतच पिकांच्या नोंदी घेण्यात याव्यात त्यात काही चुक आढळुन आल्यास 7 दिवसात तलाठयाकडुन दुरुस्त करता येईल त्यानंतर संबंधितांनी याबाबत लेखी अर्ज केला तरच मंडळ अधिकारी संबंधित अर्जदारसमवेत प्रत्यक्ष पाहणी करुन पिकांची नोंद बदलु शकतील. तथापि तलाठयाने परस्पर पिकांच्या नोंदी त्यांचे स्तरावर बदलण्याचा प्रयत्न करुन नये अन्यथा याबात संबंधीत तलाठी यांचेवर जबाबदारी निश्चित करुन शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते. सध्या पिकांच्या नोंदी स.नं./ग.नं. निहाय घेतल्या जातात तथापि कोणत्या खातेदाराने कोणते पिक पेरणी केले आहे अथवा लागवड केले आहे हे नोंदविता येत नाही त्यामुळे पिकनिहाय शेतकऱ्यांच्या याद्या पिकविमा, नैसर्गिक आपत्तीमध्ये पिक नुकसान भरपाईच्या खातेदारनिहाय याद्या करताना तयार करता येत नाही याचा विचार करुन नमुना 12 मध्ये सुधारणा करुन त्यावर खाते क्रमांक नमुद करुन खाते क्रमांक नियम पिकांच्या नोंदी करुन घेणे प्रस्तावित आहे. तथापि याबाबत शासन मान्यता झाल्यानंतर OCU प्रणालीमध्ये योग्य ते बदल करणेत येतील. वरील सुचनांचे काटेकोर पालन करुन खरीप 2018 पासुन होणाऱ्या पिक पाहणीच्या नोंदी OCU प्रणालीत अचूकरित्या नोंदवाव्यात. अचूक पिकांच्या नोंदी घेतल्याने पिक नियोजन, कृषी अंदाजाशिवाय किमान आधारभूत किंमतीवर (MSP) खरेदीसाठी अधिकृत व अचूक माहिती उपलब्ध होऊ शकेल. त्यामुळे पिकपाहणीच्या नोंदी राज्यभरात एकाच पध्दतीने घेणे आवश्यक आहे. सदरच्या सूचना सर्व तलाठी व मंडळ अधिकारी यांचे निदर्शनास आणाव्यात ही विनंती.
आपला विश्वासू,
( रामदास जगताप )
राज्य समन्वयक, ई-फेरफार प्रकल्प जमाबंदी
आयुक्त कार्यालय (म.राज्य) पुणे.
प्रत - उप आयुक्त (महसूल )
(सर्व.) उप विभागीय अधिकारी
(सर्व.) तहसिलदार (सर्व.)

सर,
ReplyDeleteocu मध्ये पिक पाहणी update केले नंतर गाव नमुना ११ आपोआप तयार व्हावा ही विनंती
सर, अनुदान याद्या तसेच 8ब ,11नंबर,ऑनलाईन पद्धतीने तयार व्हाव्या आणि ocu mobile app लवकर सुरू व्हावे
ReplyDeleteसर मुलभूत म्हणजे speed असावा ही विनिंती
ReplyDeleteSir speed of server change as bank's server
ReplyDeleteसर साइड SPEED खुप कमी आहे
ReplyDelete