रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

बदली झालेल्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांची माहिती ई- फेरफार प्रणालीमध्ये अदयावत करणेबाबत व विविध MIS सुविधा वापरणेबाबत.

क्र.रा.भू.अ.आ.का.4/रा.स./70/2018. जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि अभिलेख (म.राज्य) पुणे यांचे कार्यालय, पुणे, दिनांक 26/ 09 /2018 प्रति, जिल्हाधिकारी (सर्व) ( आस्थापना शाखा ) विषय - बदली झालेल्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांची माहिती ई- फेरफार प्रणालीमध्ये अदयावत करणेबाबत व विविध MIS सुविधा वापरणेबाबत. महोदय डिजीटल इंडिया भूमि अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमांतर्गत ( DILRMP ) ई-फेरफार प्रणालीमधील User Creation मध्ये कार्यरत तलाठी, मंडळ अधिकारी, नायब तहसिलदार व तहसिलदार यांची नोंदणी user Creation मध्ये केलेली असते. तथापि विविध कारणाने बदली / दिर्घकालीन रजा / सेवा निवृत्ती इत्यादी मुळे अधिकारी / कर्मचारी पदमुक्त झाला असल्यास त्याबाबतचा सक्षम अधिकाऱ्याचा बदली / कार्यमुक्त आदेशाचा योग्य क्रमात User Creation मध्ये टाकून DBA अथवा DDE यांनी योग्य तो बदल तात्काळ करण्यात यावा. बदली अथवा कार्यमुक्त आदेशाची प्रत आवश्यकतेप्रमाणे संबंधित DBA अथवा DDE यांना न चुकता देण्यात यावी. त्यानुसार DBA अथवा DDE यांनी कार्यवाही करावी. कोणत्याही सक्षम अधिकाऱ्याने आदेश असल्याशिवाय डि.डि.ई./डि.बी.ए. यांनी User Creation मधुन कर्मचारी अधिकारी यांची पदस्थापना व कार्यक्षेत्र बदलु नये. ई- फेरफार प्रणालीचा कार्यक्षमपणे वापर व प्रशासकीय नियंत्रणासाठी वापर घेण्याच्या दृष्टीने विविध कामकाजाची प्रगती दर्शविणारे MIS प्रणालीमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे, व सदरचे MIS विभागीय आयुक्तांपासून त्या त्या स्तरावरील MIS पाहण्यासाठी उपलब्ध आहे. त्यासाठी सर्व उपआयुक्त (महसूल), निवासी उपजिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी व सर्व उपविभागीय अधिकारी यांना MIS पाहण्यासाठी User Name व Paasword उपलब्ध करून दिले आहे. तरी त्याचा योग्य वापर करून तहसिलदार, उपविभागीय अधिकारी / DDE यांनी कामाची प्रगती व गुणवत्तापुर्ण कामाची पुर्तता यासाठी उपयोग करणे आवश्यक आहे. सध्या स्टेट डाटा सेंटर (SDC) वरील Server Space व अन्य संसाधनांच्या कमतरतेमुळे 8 जिल्हे BSNL Claud वर, 6 जिल्हे NDC पुणे वर, 2 जिल्हे स्थानिक स्तरावर व अन्य 19 जिल्हे SDC वर कार्यरत आहे. त्यामुळे या जिल्हयांचे MIS पाहताना वेगवेगळया URL वापराव्या लागतात. त्या खालीलप्रमाणे आहे. 1. SDC वरील सर्व जिल्हयांसाठी - https//10.187.203.132/eferfarmis 2. BSNL वरील सर्व जिल्हयांसाठी - http//10.195.33.106/eferfarmis 3. NDC वरील सर्व जिल्हयांसाठी - http//10.153.15.93/eferfarmistest 4. स्थानिक Server वरील जिल्हयांसाठी त्यांची स्थानिक URL वापरावी. वरील प्रमाणे उपलब्ध MIS चा वापर उप आयुक्त, डि.डि.ई. उपविभागीय अधिकारी, तहसिलदार व डि.बी.ए. यांनी आवश्यक त्या ठिकाणी करून ई-फेरफार प्रणालीचा प्रशासनामधे गतीमानता व पारदर्शकता आणण्यासाठी उपयोग करणेबाबत संबंधितांना आपले स्तरावरुन सूचना द्याव्यात ही विनंती. आपला विश्वासू, (रामदास जगताप) राज्य समन्वयक, रा.भू.अ.आ.का. जमाबंदी आयुक्त कार्यालय, पुणे. प्रत, उप आयुक्त (महसूल) विभागीय आयुक्त कार्यालय (सर्व.) उपजिल्हाधिकारी तथा डि.डि.ई. (DILRMP कक्ष) (सर्व.) उपविभागीय अधिकारी (सर्व.) - तलाठी बदल्यांच्या आदेशाची एक प्रत संबंधित डि.बी.ए. यांना देण्यात यावी तहसिलदार (सर्व.)

Comments

Archive

Contact Form

Send