रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

कोकण विभागीय मास्टर ट्रेनर्स व तहसीलदार डीबीए कार्यशाळा दि.६.९.२०१८

नमस्कार मित्रांनो दि. ४.९.२०१८ रोजी ठरविलेल्या विभागीय कार्यशाळा प्रशिक्षण वर्गाच्या नियीजीत दौऱ्याप्रमाणे आज कोकण विभागातील सर्व DDE , JDR, तहसीलदार , नायब तहसीलदार /DBA , प्रत्येक तालुक्यातील दोन तलाठी व दोन मंडळ अधिकारी आणि रायगड जिल्ह्यातील सर्व तलाठी मंडळ अधिकारी यांची कार्यशाळा श्री शाहू महाराज नाट्यगृह , खोपोली येथे पार पडले . चांगल्या मुद्द्यांवर चर्चा झाली , ई फेरफार प्रणाली तील नवीन महत्वाच्या सुविधा जसे की क. १५५ च्या आदेशाने दुरुस्त्या ( सात सुविधा ) , ७/१२ वर मंजूर फेर्फाराचा योग्यरीत्या अंमल झाला नाही / झाला , फेरफार कक्ष बंद केल्या नंतर तलाठी स्थरावरील कार्यवाही , डिजिटल स्वाक्षरीची नवीन DSP सुविधा , प्रत्येक फेरफार प्रकार कधी व कश्यासाठी वापरायचा , अकृषक ७/१२ चे क्षेत्र व एकक दुरुस्ती , अतिरिक्त अहवाल ५ व ५.१ ची दुरुस्ती सुविधा ई बाबत सादरीकरण व प्रत्यक्ष DEMO TRAINING सर्व उपस्थितांना देनेत आले . कार्यशाळेसाठी रायगड चे अप्पर जिल्हाधिकारी श्री. भरत शितोळे साहेब , RDC रायगड श्री किरण पाणबुडे साहेब , DDE ठाणे जलसिंग वाळवी साहेब , DDE पालघर श्री अद्कुने साहेब हे देखील उपस्थित होते . तलाठी संघ रायगड व जिल्हा प्रशासन रायगड यांचे सुयोग्य नियोजना बद्दल धन्यवाद .

Comments

Archive

Contact Form

Send