सातबारा डिजिटल स्वाक्षरीत करण्याची सुविधा परभणी , नांदेड , लातूर , यवतमाळ , नंदुरबार व रायगड जिल्ह्यात सुरु केले बाबत
नमस्कार मित्रांनो
आपल्या ई फेरफार प्रणालीच्या स्टेट डेटा सेंटर (SDC) मधील तांत्रिक बिघाडामुळे बंद करणेत आलेली सातबारा डिजिटल स्वाक्षरीत करणेची सुविध (DSP) परभणी जिल्ह्यात १.९.२०१८ पासून व नांदेड , लातूर , यवतमाळ , नंदुरबार व रायगड जिल्ह्यात दिनांक ६.९.२०१८ पुन सुरु करणेत आली आहे . या सुविधेतून आपण या पूर्वी डिजिटल स्वाक्षरीत केलेले सातबारा पुन्हा डिजिटल स्वाक्षरीत करण्याची आवशकता असणार नाही . या सुविधेमध्ये सातबारा प्रथम डिजिटल स्वाक्षरीत करण्याचा पर्याय व सातबारा फेरफार मंजुरी पश्चात डिजिटल स्वाक्षरीत करण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे . या नवीन डिजिटल स्वाक्षरीत केलेले ७/१२ जनतेला aapleabhilekh.mahabhumi.maharashtra .gov.in/satbara या पर्यायातून उपलब्ध होणार आहेत त्यामुळे प्रत्येक सातबारा अचूक व योग्य असल्याची खात्री करूनच तलाठी यांनी सातबारा डिजिटल स्वाक्षरीचत करावे असे अवाहन करणेत येत आहे . त्यामुळे कामाची १००% गुणवत्ता राखण्याची जबाबदारी या प्रकल्पातील सर्वच घटकांची आहे ह्याची जाणीव प्रत्येक महसूल अधिकारी कर्मचारी यांनी खबरदारी घ्यावी .
आपला
रामदास जगताप
उप जिल्हाधिकारी , पुणे
Comments