रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

नांदेड , अमरावती व नागपूर येथील ई फेरफार विभागीय कार्यशाळा

क्र. राभूअआका 4/कार्यशाळा/2018 जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि अभिलेख ( म.राज्य ) पुणे यांचे कार्यालय दिनांक : - 17/09/2018. प्रति, मा.उप आयुक्त (महसूल) विभागीय आयुक्त कार्यालय, औरंगाबाद, अमरावती,नागपूर. विषय - ई - फेरफार प्रणालीत अंमलबजावणी मास्टर ट्रेनर्स साठी विभागीय कार्यशाळा आयोजित करणे बाबत. संदर्भ :- 1. मा.उपआयुक्त (महसुल), औरंगाबाद विभाग यांचेकडील दिनांक 07/09/2018 चे पत्र. 2. मा.उपआयुक्त (महसुल) नागपूर विभाग यांचेकडील दिनांक 14/09/2018 चे पत्र. ई - फेरफार प्रणालीच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी तयार केलेल्या विविध मॉड्युलमधील कार्यपध्दती याबाबत प्रशिक्षणवर्ग व प्रत्यक्ष अंमलबजावणीतील अडीअडचणी याबाबतचे चर्चासत्र यासाठी विभागीय स्तरावर मास्टर ट्रेनर्सची कार्यशाळा आयोजित करण्याचे निर्देश मा. जमाबंदी आयुक्त यांनी दिले आहेत. संदर्भ क्रमांक 1 व २ अन्वये मा. उपाआयुक्त (महसुल) यांनी केलेल्या विनंती प्रमाणे आपल्या विभागातील मास्टर ट्रेनर्सची कार्यशाळा खालील प्रमाणे सकाळी १०.३० ते दु १.३० वा पर्यंत प्रशिक्षण / सादरीकरण व दुपारी २.३० ते ५.३० वा पर्यंत शंकासमाधान / चर्चासत्र आयोजित केली आहे. दौरा कार्यक्रम अ.नं. विभाग दिनांक ठिकाण २ औरंगाबाद विभाग 27.९.२०१८ जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड ( नांदेड, परभणी, हिंगोली, लातुर) 2 अमरावती विभाग 28.९.२०१८ नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती 3 नागपूर विभाग २9 .९.२०१८ बालसदन सभागृह, काटोल रोड,राजभवन जवळ, नागपूर तरी सदर कार्यशाळेसाठी आपल्या विभागातील सर्व जिल्ह्यांचे उपजिल्हाधिकारी तथा DDE, सर्व जिल्ह्यांचे सुचना विज्ञान केंद्र अधिकारी (DIO/ADIO), सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी, सर्व तालुक्यांचे तहसिलदार व नायब तहसिलदार/DBA, प्रत्येक तालुक्यातील 2 तलाठी व 2 मंडळ अधिकारी तसेच यांना कार्यशाळेत संबंधित सर्व अधिकारी व कर्मचारी पूर्णवेळ उपस्थित राहतील अश्या सुचना आपले स्तरावरून द्याव्यात व प्रशिक्षण पथकातील अधिकारी / कर्मचाऱ्यांसाठी शासकीय विश्रामगृहातील दोन सुट आरक्षित करुन वाहन व्यवस्था करावी ही विनंती. स्थळ प्रत मा. जमाबंदी आयुक्त आणि ( रामदास जगताप ) संचालक भुमि अभिलेख (म.राज्य) पुणे राज्य समन्वयक, ई-फेरफार प्रकल्प यांचे मान्यतेने. जमाबंदी आयुक्त कार्यालय (म.राज्य)पुणे. प्रत - उपजिल्हाधिकारी तथा DDE ( औरंगाबाद विभाग, अमरावती विभाग, नागपूर विभाग ) 2/- आपल्या जिल्ह्यातून कार्यशाळेसाठी येणा-या मास्टर ट्रेनर्सची नावे व संख्या तात्काळ उप आयुक्त ( महसूल) यांना कळवावी व प्रशिक्षण वर्गा नंतर उपस्थिती पत्रक इकडे पाठवावे . प्रत - राष्ट्रीय सुचना विज्ञान केंद्र अधिकारी ( औरंगाबाद विभाग, अमरावती विभाग, नागपूर विभाग ) प्रत - सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी, ( औरंगाबाद विभाग, अमरावती विभाग, नागपूर विभाग )

Comments

Archive

Contact Form

Send