नाशिक विभागाची ई फेरफार प्रणाली कार्यशाळा दि . १५.९.२०१८
नमस्कार मित्रांनो ,
नाशिक विभागाची ई फेरफार प्रणाली कार्यशाळा दि . १५ .९.२०१८
काल दिनांक १५.९.२०१८ रोजी नाशिक महसूल विभागातील पाचही जिल्ह्यातील सुमारे ४५० महसूल अधिकारी
कर्मचाऱ्यांचा समावेश असलेल्या मास्टर ट्रेनर्स ची कार्यशाळा सकाळी ११.०० ते सायं. ६.०० अशी स्वामी नारायण सभागृह नाशिक येथे घेणेत आली .
त्यामध्ये सर्व उपस्थितीत अधिकारी कर्मचारी यांना ई फेरफार प्रणाली चे सविस्थर प्रशिक्षण देनेत आले असून शंकासमाधान सत्र देखील घेणेत आले .
या कार्यशाळेला विभागीय आयुक्त कार्यालयातील उप आयुक्त महसूल , सहाय्यक आयुक्त श्री उन्मेष महाजन साहेब हे स्वतः व अप्पर जिल्हाधिकारी नाशिक यांचे सह नाशिक चे डी डी ई श्री शशिकांत मंगरुळे नंदुरबार चे अनिल पवार साहेब , धुळे चे राजेंद्र पाटील साहेब , अह्माद्नागारचे अहिर साहेब उपस्थितीत होते
या कार्यशाळेचा फायदा हा प्रकल्प पुढे नेण्यास निश्चित फायदा होईल अशी अपेक्षा आहे .
आपला
रामदास जगताप
पुणे
Comments