रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

पुणे जिल्ह्यातील सर्व तलाठी मंडळ अधिकारी डी बी ए , तहसीलदार , प्रांताधिकारी यांचे साठी ई फेरफार प्रणालीची विशेष कार्यशाळा दि. १८.९.२०१८

नमस्कार मित्रांनो , पुणे जिल्ह्यातील सर्व तलाठी मंडळ अधिकारी डी बी ए , तहसीलदार , प्रांताधिकारी यांचे साठी ई फेरफार प्रणालीची विशेष कार्यशाळा दि. १८.९.२०१८ विभागीय कार्यशाळा होत असताना पुणे जिल्ह्यातील सर्व तलाठी मंडळ अधिकारी डी बी ए , तहसीलदार , प्रांताधिकारी यांचे साठी ई फेरफार प्रणालीची विशेष कार्यशाळा उद्या दि. १८.९.२०१८ रोजी १०.३० ते साय ६.०० या कालावधीत अल्प बचत भवन , विधान भवन जवळ , पुणे येथे आयोजित केली आहे त्याचा सर्वानी लाभ घ्यावा . पुणे जिल्ह्यातील घोषणापत्र ३ पूर्ण झालेल्या तालुक्यांसाठी सातबारा डिजिटल स्वाक्षरीत करण्यासाठी dsp सुविधा पुन्हा चालू करणेत आली आहे उद्याच्या कार्यशाळेत प्रामुख्याने खालील विषयावर सविस्तर सादरीकरण करणेत येणार आहे तसेच डेमो देनेत येणार आहे दुपारी शंका समाधान / चर्चासत्र ठेवले आहे . 1. ODC मधील 1 ते 28 अहवाल निरंक करणे 2. ई-फेरफार मधील दिलेल्या सुविधा 3. कलम १५५ च्या आदेशाने दुरुस्ती 4. अहवाल १ ची दुरुस्ती (गाव नमुना ७ वरील एकुण क्षेत्र व ७/१२ वरील खात्यांच्या एकुण क्षेत्रांची फरक) 5. अहवाल १ मध्ये नसलेल्या ७/१२ वरील क्षेत्र दुरुस्ती 6. फेरफार योग्य रित्या प्रमाणित झाला नाही असा शेरा भरलेल्या फेरफार वरील कार्यवाही. 7. मंजुर फेरफाराचा तपशील व मंडळ अधिकारी यांचा शेरा यामध्ये दुरुस्ती 8. अतिरिक्त अहवाल-५ ची दुरुस्ती 9. Mutation Cell कमी केल्याने तलाठी यांनी करावयाची कार्यवाही 10. SKN-TKN ची दुरुस्ती व री-एन्ट्री 11. हक्कसोड फेरफाराचा तपशिल दुरुस्ती करणे : तलाठी लोगिन 12. वारस / मयताचे नाव कमी करणे फ्लो 13. दुय्यमनिबंधक यांनी दस्तनोंदणी करताना घ्यावयाची काळजी 14. DBA यांची जबाबदारी पुणे जिल्ह्यातील सर्व तलाठी मंडळ अधिकारी डी बी ए व तहसीलदार यांनी या कार्यशाळेत सहभागी होऊन पुणे जिल्ह्यातील जनतेला अचूक संगणकीकृत सातबारा व खाते उतारा या सह डिजिटल स्वाक्षरीत सातबारा लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यासाठी योगदान द्यावे आपला रामदास जगताप दि १७.९.२०१८

Comments

Archive

Contact Form

Send