NIC VPN ACCOUNT तात्पुरते स्वरुपात उपलब्ध करून देण्याबाबत...
क्र.रा.भू.अ.आ.का.4/NDC/64/2018
जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि
अभिलेख (म.राज्य) पुणे यांचे कार्यालय, पुणे
दिनांक १0.०८.२०१८
प्रति ,
मा. उप जिल्हाधिकारी तथा डी डी ई
नाशिक, वर्धा, सातारा, कोल्हापूर व वाशिम
विषय : NIC VPN ACCOUNT तात्पुरते स्वरुपात उपलब्ध करून देण्याबाबत...
संदर्भ : या कार्यालयाच्या मार्गदर्शक सूचना
क्र. ६२ रा.भू.अ.आ.का.4/रा.स./६२ /2018 दि. ०६ /0८ /2018.
आदरणीय महोदय ,
SDC वरील Monitor server बंद झाल्याने औरंगाबाद, परभणी, नांदेड, लातूर व यवतमाळ या जिल्ह्यासाठी NDC, पुणे येथे स्थलांतर करून ई-फेरफार सुविधा सुरु करणेत आली आहे तथापि उपरोक्त जिल्ह्यातील वापरकर्त्यांना स्वत:चे VPN ACCOUNT अद्याप प्राप्त झाले नसल्याने, NDC वर स्थलांतरीत केलेल्या जिल्ह्यांना नाशिक, वर्धा, सातारा, कोल्हापूर व वाशिम जिल्ह्यांचे VPN ACCOUNTS या पूर्वी तयार झाले आहेत. त्यांचे VPN ACCOUNTS तात्पुरते वापरण्यासाठी खालील प्रमाणे देण्याचा निर्णय घेणेत आला आहे.
१. यवतमाळ साठी नाशिकचे (५९१)
२. परभणी जिल्ह्यासाठी वर्ध्याचे (३०१)
३. औरंगाबाद जिल्ह्यासाठी सातारा जिल्ह्याचे (५४१)
४. नांदेड जिल्ह्यासाठी कोल्हापूर जिल्ह्याचे (४९८) व
५. लातूर जिल्ह्यासाठी वाशीम जिल्ह्याचे (२४९)
वरील प्रमाणे VPN ACCOUNTS चे DETAILS संबंधित DDE यांचे ई-मेल वर या सोबत उपलब्ध करून दिले आहेत. आपण आपले जिल्हयातील सर्व तलाठी / मंडळ अधिकारी अथवा अन्य अधिकारी यांना त्यांचे VPN ACCOUNT तात्पुरते उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात याव्यात. तरी त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे या १० जिल्ह्यातील DDE यांना विनंती करणेत येत आहे.
NDC वरील जिल्ह्यांचे DDE यांनी आपल्या जिल्ह्याचे VPN ACCOUNTS चे ई-मेल अद्याप आले नसल्याने तात्पुरत्या स्वरुपात या पूर्वी तयार झालेले VPN ACCOUNTS सोबत संबंधित कर्मचाऱ्याच्या नाव व मोबाईल क्रमांकासह सोबत पाठवले आहेत. त्या मध्ये आपल्याकडील तलाठी / मंडळ अधिकारी यांना नाव टाकून प्रत्येकी एक या प्रमाणे वाटप करावेत व संबंधित तलाठी / मंडळ अधिकरी यांचे मोबाईल वर संपर्क करून CERTIFICATE व PRIVET KEY प्राप्त करून घेण्यास सांगावे व आपले तलाठी / मंडळ अधिकारी यांना मेल येई पर्यंत वापरावेत, ही विनंती.
आपला विश्वासू
( रामदास जगताप )
जमाबंदी आयुक्त व संचालक
भूमी अभिलेख (म. रा.) पुणे यांचे करिता
प्रत :
मा. उप जिल्हाधिकारी तथा डी डी ई
औरंगाबाद , परभणी , नांदेड , लातूर ,यवतमाळ,
आवश्यकते प्रमाणे आपले जिल्ह्याला VPN ACCOUNTS उपलब्ध करून दिलेल्या जिल्ह्याच्या DDE यांचेशी संपर्क करून सर्व तलाठी / मंडळ अधिकारी यांना VPN ACCOUNT उपलब्ध करून द्यावे.
Comments