ई फेरफार मध्ये दि.२.८.२०१८ पासून नव्याने उपलब्ध करून दिलेल्या सुविधा तसेच नवीन बदल .
मार्गदर्शक सूचना क्र. ६१ रा.भू.अ.आ.का.4/रा.स./६१ /2018
जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि अभिलेख,
(म.राज्य) पुणे यांचे कार्यालय ,पुणे .
दिनांक : ०२ /0८ /2018.
प्रति,
मा. उप जिल्हाधिकारी तथा डी डी ई (सर्व)
विषय :- ई फेरफार मध्ये दि.२.८.२०१८ पासून नव्याने उपलब्ध करून दिलेल्या
नवीन सुविधा तसेच नवीन बदल...
महोदय ,
राज्यात DILRMP अंतर्गत सुरु असलेल्या ई-फेरफार प्रकल्पामध्ये खालील प्रमाणे नव्याने उपलब्ध करून दिलेल्या नवीन सुविधा तसेच नवीन बदल दि ०२.०८.२०१८ पासून उपलब्ध करून दिले आहेत. त्या सर्व सुविधा अथवा बदलाचे USER MANUALS आपल्याला या सोबत पाठविनेत येत आहेत.
नवीन सुविधा:
१. अविभाज्य हिस्स्याची विक्री : सामाईक/ संयुक्त खात्यातील अविभाज्य हिश्याचे खरेदीपत्र झाल्यास त्याच खात्यात विक्री करणाराचे नाव वगळून त्या ऐवजी खरेदी घेनाराचे नाव समाविष्ट करण्यासाठी “अविभाज्य हिस्स्याची विक्री” हे नवीन TEMPLATE देणेत आले आहे.
२. राजपत्राने नावात बदल : असा नवीन फेरफार प्रकार TEMPLATE मध्ये देणेत आला आहे.
३. आदेशाने खात्यातील नाव दुरुस्त करणेची सुविधा
४. ई-फेरफार मध्ये खाता एकत्रीकरण ची सुविधा देणेत आली आहे.
५. कलम १५५ च्या आदेशाने अहवाल १ ची दुरुस्ती ची सुविधा देनेत आली आहे.
६. कलम १५५ च्या आदेशाने होणाऱ्या सर्व “ परिशिष्ट क “ प्रमाणे आदेश तयार होण्याची सुविधा.
७. फेरफार मंजुरी नंतर मंडळ अधिकारी यांनी योग्य रित्या अंमल झाला नाही असा शेरा (REMARK) दिल्यास मंडळ अधिकारी यांचे सुचना प्रमाणे योग्य अंमल होण्यासाठी दुरुस्ती ची सुविधा.
जुन्या सुविधा मधील त्रुटी / अडचणी दूर करणे:
१. फेरफार कक्ष बंद करणे पुर्वी प्रोसेस केलेले दस्त क्रमांक FIFO साठी विचारात घेणार नाही.
२. फेरफार तपशील व मंडळ अधिकारी शेरा दुरुस्त करणे, अहवाल १ ची दुरुस्ती व ईतर अधिकारातील प्रकार व उपप्रकार बदलणे या प्रकारच्या फेरफाराचा तपशील TEMPLATE प्रमाणे होणार.
३. नामंजूर फेरफारासाठी योग्यरीत्या अंमल झाला नाही असा शेरा /REMARK देता येणार नाही.
४. या पूर्वी सामान्य फेरफारातून अहवाल १ मध्ये असलेल्या स.नं/गट नं वर फेरफार घेता येत नव्हता, आत्ता घेता येईल.
५. भोगवटादार वर्ग २ प्रमाणे वर्ग १ मधील उपप्रकार १ किंवा २ निवडलेले असतील तर तसेच सरकार व सरकारी पट्टेदार या भूधारणा प्रकारासाठी आदेशासह कोणताही फेरफार घेण्यासाठी तहसीलदार यांचे लॉगीन ने तो गट तात्पुरता UNBLOCK करून घ्यावा लागेल.
६. गाव नमुना ७ वरील क्षेत्र दुरुस्ती ( जिरायत/बागायत/तरी/वर्कस/इतर/एकूण क्षेत्र ) या पुढे अकृषिक आदेश/क्षेत्र दुरुस्ती फेरफार मधून होणार नाही तर फक्त क.१५५ च्या आदेशानेच होईल.
७. अकृषिक आदेशाने/कलम १५५ च्या आदेशाने नवीन ७/१२ मध्ये इतर हक्कातील देखील दुरुस्त्या आता करता येतील.
८. हवेली तालुक्यासाठी विकसित सुविधे मध्ये (Re-Edit module) खाता वगळणे करता येईल व भूधारणा बदल फेरफार मध्ये Character Varying 20 error आता येणार नाही आता असे फेरफार प्रमाणित करणेसाठी उपलब्ध राहतील.
९. दुय्यम निबंधक यांचे कडून प्राप्त दस्त क्रमांक प्रोसेस करताना येणारा syntax error आता येणार नाही.
१०. कोल्हापूर जिल्ह्याने कळविले प्रमाणे ई-फेरफार मध्ये फेरफार घेतल्यानंतर ODU मधून स.नं/गट न. बदलला असल्यास असा फेरफार आता नामंजुरी साठी उपलब्ध करून दिला आहे . स.नं/गट न. बदलला असलेने सदर फेरफार मंजूर होऊ शकणार नाही.
११. हक्कासोड फेरफार प्रमाणित करताना Cannot find table 0 चा एरर आता येणार नाही.
१२. काही वापरकर्त्यांना दुसऱ्याच्या DSC ने लॉगीन करता येत होते असे निदर्शनास आणले होते. आता असे होणार नाही. तपासून FEEDBACK द्यावा.
१३. एकाच ग्रुप सामाईक क्षेत्र विकत असताना एकापेक्षा जास्त (SKN1, SKN2 इ.) तयार झाले असल्यास ते नष्ट करता येतील.
१४. एकाच ७/१२ वर खरेदी देणार व खरेदी घेणार असतील व देणाराच्या नावासमोर पोट खराब क्षेत्र नमूद नसल्यास खरेदी घेणाराचे नावासमोर पोटखराब क्षेत्र समाविष्ट होत नव्हते ते आता होईल.
१५. वाटणीपत्र मंजुरीमधील पालघर जिल्ह्याने पाठविलेली अडचण दूर केली आहे.
१६. अतिरिक्त अहवाल ५ मध्ये गट समाविष्ट असल्यास तो दुरुस्त केल्या शिवाय फेरफार घेता येणार नाही, तसा मेसेज दिला जाईल.
१७. सामान्य फेरफारातून “अपाक कमी करणे” चा फेरफार प्रमाणित करणेची अडचण/एरर दूर केली आहे.
१८. “हक्कसोड” चा फेरफार प्रमाणित करणेची अडचण/एरर दूर केली आहे (मंजुरी नंतर एकाच गटाला अंमल होणे) .
१९. “बोजा कमी करणे” चा फेरफार प्रमाणित करणेची अडचण/एरर दूर केली आहे (मंजुरी नंतर एकाच गटाला अंमल होणे )
२०. सामान्य फेरफारात मयताचे नाव कमी करणे या फेरफाराचा आता योग्य अंमल होईल.
२१. १००% क्षेत्र निश्चित केलेल्या सामाईक/संयुक्त खात्यातील खरेदी फेरफार मध्ये buyer area is less than seller area असा एरर आता येणार नाही.
सदरचे बदल SDC वरील जिल्ह्यांना आज पासून उपलब्ध करून दिले आहेत तर NDC व BSNL CLOUD व लोकल सर्वर साठी दि. ०३.०८.२०१८ पासून उपलब्ध होतील .
सदरच्या सर्व सूचना सर्व तलाठी मंडळ अधिकारी व डी बी ए यांच्या निदर्शनास आणाव्यात, हि विनंती.
आपला विश्वासू
( रामदास जगताप )
उप जिल्हाधिकारी तथा राज्य समन्वयक
ई फेरफार प्रकल्प , जमाबंदी आयुक्त
कार्यालय, ( महाराष्ट्र राज्य ) पुणे
आदरणीय सर, आमच्याकडे काही जमिनी खरेदी हक्काने भुसंपादीत करण्यात आल्या परंतु त्या जमिनीवर अदयाप सरकारचे खाते नाहीत. जमिनीचे भेागवटदार वर्ग 2 चे वर्ग 1 करण्यात आले असूनही त्यावर विक्रीपत्रानुसार फेरबदल करतानी " सदर सर्वे हा सरकारी असून सदर सर्वे वर फेर फार घेता येणार नाही' असे दिसून येते. मार्गदर्शन करावे हि विनंती.
ReplyDelete