ऑनलाईन ई फेरफार बाबतीतील लक्षात घेण्याजोग्या महत्वाच्या बाबी दि.४.८.२०१८
ऑनलाईन ई फेरफार बाबतीतील लक्षात घेण्याजोग्या महत्वाच्या बाबी :
forticlient password reset :
1. forticlient चा उपयोग सुरु केल्यानंतर काही दिवसांनी सदरच्या password ने लॉगीन न होणे हि समस्या येऊ शकते .अशा वेळी password reset करावा लागेल
2. यासाठी webmail.maharashtra.gov.in या वेब साईट वर जाऊन प्रथम आपला जुना username व password टाकावा .त्यानंतर आपल्या समोर एक नवीन window येईल .त्यात username म्हणून सेवार्थ आय डी व password म्हणून जुना password टाकावा .आणि new password म्हणून नवीन password तयार करून टाकावा .password हा ABCDE@123 अशा स्वरूपाचा असावा .
3. जुना व नवा PASSWORD यातील characters शक्यतो सारखी असू नयेत .
4. त्यानंतर confirm password मध्ये नवीन password परत टाका आणि submit करा .5 वेळा चुकीचा password टाकला तर password block होतो .याची काळजी घ्यावी .
data sign झाला नाही हा error येणे
1. ऑन लाईन ला नोंदी घेताना किंवा नोंदी मंजूर करताना किंवा एडीट ,री एडीट module ला नोंदी टाकताना सदरच्या गटाचा data sign झाला नाही तो sign करून घ्या व नंतर काम करा .असा संदेश येतो .
2. याचे कारण म्हणजे bulk sign करताना संपूर्ण गट नं चे bulk sign होत नाही .ज्या गट नं चे bulk sign बाकी आहे .त्या गटांना असा error येतो .आपण जेव्हा त्या गटावर असलेल्या खात्याशी प्रक्रिया करतो तेव्हा तो गट बल्क sign झाल्याशिवाय त्यावर फेरफार होत नाही .याचप्रमाणे जेव्हा आपण त्या गावातील संपूर्ण खाती अनुक्रमंकाने लावतो तेव्हा हि संपूर्ण गटाचे बलक sign करावे लागते
3. संबंधित गावच्या bulk sign न झालेल्या गट नं ची संख्या हि 10 %पेक्षा जास्त असेल तर मात्र त्या गावाचा नवीन फेरफार नं तयार होणार नाही तसेच मंडळ अधिकारी लॉगीन ला dashboard ला नोंदी दिसणार नाही
4. यासाठी मंडळ अधिकारी यांची भूमिका महत्वाची असून मंडळ अधिकारी यांनी आपल्या भागातील सर्व गावे दिवसातून किमान एक वेळा नुसती इ फेरफार लोगिन ला open करून पहिली तरी . 90 %पेक्षा जास्त गटांचे bulk sign पूर्ण होईन व नवीन फेरफार नं तयार होईन .
5. बल्क sign न झालेल्या गटाचा बल्क sign करण्याची सुविधा इ फेरफार तलाठी login ला दिलेली असून यात गट नं टाकून सबंधित गटाचे बल्क sign पूर्ण करता येते
odu मधून log out होणे
1. odu मधून नवीन सातबारा तयार करताना तसेच गट नं चे नाव बदलताना कधी कधी log out होते अशा वेळी odbatool मध्ये forward व reverse integrity हा पर्याय वापरून नंतर odu त काम करावे
.फेरफार क्र तलाठी लोगिन ला dashboard वर न दिसणे
1. अशा वेळी संबधित फेरफार क्र टाकून odbatool मधून फेरफारची माहिती अद्ययावत करून घ्यावी
फेरफार रजिस्टर कोरे दिसणे किंवा फेरफार रजिस्टर मधला मजकूर अपुरा राहणे किंवा data is not available for that pins असा संदेश येणे .
1. इ फेरफार प्रणालीवर एखादी नोंद घेत असताना पूर्वावलोकन व्यवस्थित दिसते मात्र तयार झालेले फेरफार रजिस्टर हे एक तर कोरे किंवा अपूर्ण दिसते किंवा data is not available for that pins असा संदेश येतो .अशा वेळी फेरफार रजिस्टर दुरुस्त करता येते .
2. मात्र कोणतीही नोंद साठवून झाल्यावर प्रथम त्या गटाचे पूर्वावलोकन व फेरफार रजिस्टर तपासल्याशिवाय नमुना 9 ची नोटीस तयार करू नये .एकदा नमुना 9 ची नोटीस तयार झाल्यास फेरफार रजिस्टर दुरुस्त करता येणे जिकीरीचे काम आहे .
3. असे फेरफार रजिस्टर दुरुस्त करताना प्रथम नवीन फेरफार क्र निवडावा .त्यानंतर सामान्य फेरफार किंवा आदेश निवडा नंतर पुढील window मधून नोंदीचा प्रकार नंतर अपूर्ण फेरफार ची माहिती अद्ययावत करणे मधून ज्या नोंदींचे फेरफार रजिस्टर दुरुस्त करावयाचे आहे तो नोंद नं निवडावा व नंतर संपूर्ण व्यवहाराचा तपशील हि window enable झालेली दिसेल तीवर click करून नोंदीचा मजकूर भरून घ्यावा व साठवा वर click करावे .हा क्रम चुकणार नाही याची काळजी घ्यावी .
forticlent connect करताना vpn is not reachable asa error yene
किंवा इ फेरफार वर काम करताना canceling statement due to user request असा error येणे
1. आपण वापरत असलेल्या network ची स्पीड कमी असलेने असा error येतो .
नोटीस ची तारीख भरताना valid date time error येणे
1. कंट्रोल panel मध्ये change date time setting मध्ये जावे . नंतर format मध्ये english united states select करणे .
2. नंतर short date मध्ये m/d/yyyy व long date मध्ये dddd .mmmm.dd.yyyy select करून ok करणे
ocu मध्ये पिक्पाहणी भरताना क्षेत्र type न होणे
compatibility setting मध्ये मूळ १०.१८७.२०३.१३४ हि url व आपल्या जिल्ह्याची url add remove vice versa करून क्षेत्र टाकून पहा .
खाते उतारावर zp व ग्रा प निरंक दिसणे
1. dba लॉगीन ने user creation ला जावे .त्यात zp मध्ये 7 आणि ग्राम प मध्ये 1 असे रेट टाकावेत .हि प्रक्रिया पूर्ण तालुक्यासाठी एकदाच करावी लागणार आहे .
वर्ग 2 च्या तसेच सरकार , सरकारी पट्टेदार आणी वर्ग २ चे उपप्रकार १ ( आर्ग एक च्या आदिवाशिंच्या जमिनी ) उप प्रकार २ ( काळ ६३(१)(अ) प्रमाणे खरेदी केलेल्या जमिनी वर फेरफार घेणे
1. वरील सर्व गटासाठी फेरफार घेताना तो गट फेरफार साठी प्रतिबंधित आहे असा संदेश येतो बोजा कमी,अपाक कमी करणे ,एकुक कमी करणे ,वारस , अशा नोंदी साठी असा संदेश येत नाही .
2. तो गट फेरफारासाठी मोकळा करून देण्याची सुविधा तहसीलदार यांच्या लॉगीन मधून user creation ला आहे .
3. यासाठी अशा मोकळा केलेल्या गटाबाबत एक स्वतंत्र नोंदवही ठेवणे आवश्यक आहे .यात साधारणत गावाचे नाव ,गट नं ,व्यवहाराचा प्रकार ,दस्त क्रमांक ,परवानगी चा तपशील ,व गट मोकळा केल्याचा दिनांक व असल्यास सक्षम अधिकाऱ्याचा आदेश क्रमांक अशा बाबी नमूद करणे आवश्यक आहे .
आदेशाची नोंद घेताना घ्यावयाची काळजी
1. आदेशाची नोंद घेत असताना नेट connectivity व विजेची सुविधा या गोष्टी चा विचार करूनच नोंद घ्यावी
2. आदेशाच्या नोंदीला मध्येच quit झाले तर फेरफार रजिस्टर कोरे अशा समस्या येऊ शकतात
3. बिनशेती आदेशाची नोंद घेत असताना पडलेले प्लॉट चा गट नं व्यवस्थित भरावा .पडलेल्या प्लॉट नं चा गट नं जर अचूक भरला नाही तर असा गट नं पुन्हा दुरुस्त करता येत नाही .अशा नोंदीची री एन्ट्री हि करता येत नाही .त्यामुळे गट नं व्यवस्थित भरावा .
पुढील वर्षाची पिक पाहणी नष्ट करणे
1. जर चुकीने पुढील वर्षाची पिक पाहणी copy झाली असेल तर ocu ला dba लोगिन मधून ती नष्ट करता येईल .
बांधावरील झाडांची संख्या नमूद करणे :
1. ocu मधून बांधावरील झाडांची संख्या शेरा रकान्यात नमूद करण्याची सुविधा दिलेली आहे .
नोटीस भरताना date time माहितीचे स्वरूप चुकीचे आहे असा संदेश येणे
1. कंट्रोल panel मध्ये change date time setting मध्ये जाने .नंतर format मध्ये english united states select करणे .नंतर short date मध्ये m/d/yyyy व long date मध्ये dddd .mmmm.dd.yyyy select करून ok करणे
User number
हस्तलिखित सातबारावर एकाच खात्यातील वेगवेगळी नावे ज्या क्रमाने आहेत त्याच क्रमाने ऑनलाईन सातबारावर असायला हवेत .
दुर्दैवाने 70% ऑनलाईन सातबरावरील खात्यातील नावाचा क्रमांक चुकलेला आहे अथवा योग्य आहे किंवा नाही हे आपण पाहिलेले नाही
खात्यातील नावाचा क्रमांक बदलण्याची सुविधा odc ला दिलेली आहे.
अशी सुविधा खाता विभागणी ला एखादा खाता घेतल्यास odu ला आहे
री एडीट चे कामकाज पूर्ण होऊन घोषणापत्र 3 झालेले असल्यास सबंधित गावाचे odu फेरफार घेण्याची प्रक्रिया बंद होते
मात्र तलाठी login ने odu ला login केले असता सर्व प्रथम अहवाल मधील सातबारा वर क्लिक करा .व नंतर सबंधित गाव निवडून एक गट नं टाकून सातबारा ओपन करून
यानंतर मागे जाऊन खाते विभागणी वर क्लिक करा व सबंधित खात्यातील user num मूळ हस्तलिखित सातबारा प्रमाणे बदलून खात्याचा प्रकार निवडून साठवा करा
यानंतर सातबारा वरील नावाचा क्रम आवश्यक ते प्रमाणे बदलला गेल्याचे आपणास आढळून येईल .
इ फेरफार नवीन नोंद घेत असताना समाईक खाते एकापेक्षा जास्त गटावर समाविष्ट केले की त्या ही ठिकाणी user num o येतात किंवा विस्कळीत येतात
प्रत्येक इ फेरफार नोंदी नंतर user num बदलणे आवश्यक आहे .
ज्या गावाचे डिक्लेरेशन 3 झालेले आहे अशा गावातील सर्व user num odu खाता विभाजन घेऊन बदलणे आवश्यक आहे मात्र असे करत असताना सर्व नावे निवडणुच कार्यवाही करणे आवश्यक आहे
user number बदलताना खात्याचे विभाजन होणार नाही याची दक्षता घेणे आवश्यक आहे .
नवीन सातबारा तयार करणे
तालुका ऑनलाईन झाल्यानंतर जे फेरफार प्रणालीवर घेत जात आहे अशा फेरफार च्या अनुषगाने सातबारा बंद करून नवीन सातबारा तयार करणे जेथे आवश्यक आहे असे सातबारा बंद व सुरु करण्याची सुविधा पूर्वी इ फेरफार ला होती मात्र आता हि सुविधा फक्त
https://10.187.203.6/eferfar2beta_test_new712 for जळगाव
https://10.187.203.आपल्या जिल्ह्याचा url /eferfar2beta_test_new712
येथे दिलेली आहे .
नोंद निर्गमित केलेचा दिनांक न दिसणे किंवा फेरफार घेत असताना पूर्वीचा फेरफार त्या गटावर प्रलंबित दिसणे
1. फेरफार ,एडिट आणि री एडिट झालेल्या नोंदी मंजूर केल्यानंतर त्या तात्काळ हिरव्या पट्टातून काढणे किंवा निर्गमित करणे आवश्यक आहे .
अशी नोंद निर्गमित केल्यावर फेरफार पत्रक पाहिले असता त्यावर नोंद निर्गमित केल्याचा दिनांक येणे आवश्यक आहे
2. अशी नोंद निर्गमित केलेला दिनांक येत नसल्यास अशा गटावर री एडिट किंवा इ फेरफार नोंद घेत असल्यास यापूर्वी ची नोंद मंजूर करणे आवश्यक आहे .
ती नोंद मंजूर करूनच तो गट री एडिट किंवा इ फेरफार ला घेता येईल असा संदेश येतो.दुर्दैवाने अशी नोंद मंजूर असूनही अशी अडचण उद्भवत असल्याने विनाकारण वेळ वाया जातो
3. इ फेरफार मंडळ अधिकारी लॉगिन ला नोंद नामंजूर करणे हा पर्याय आहे .यावर क्लिक करा .
व नंतर गाव निवडल्यावर या गावातील ज्या नोंदि निर्गमित होण्याच्या बाकी आहेत.
आशा सर्व नोंदी दिसतात यावर फक्त नोंद नामंजूर करणे या पर्यायावर क्लिक करून नोंद प्रमाणित केल्याचा शेरा पुन्हा भरून साठवा करा .
नोंद निर्गमित केल्याचा दिनांक येईल .
व सातबारा वरील अंमल ही नष्ट होणार नाही.
आपला
रामदास जगताप
दि.४.८.२०१८
Comments