Data Signing बाबत
नमस्कार मित्रांनो .
महत्वाचा खुलासा
सध्या काही दिवसापासून Data Signing तलाठी लॉगिन ने करुन त्यानंतर फेरफार प्रमाणित करता येईल, असा मेसेज येत आहे ती ही अडचण नसून सुविधा आहे.
याआधी ज्या गटांवर इ फेरफार/एडिट/री एडिट आज्ञावलीत फेरफार घेण्यात आले, परंतु त्यावेळी लागू असलेल्या Active X Component ऐवजी जुने component वापरल्याने त्या गटांवर data signing झालेला नाही, त्यामुळे आज्ञावली data signing करा असा मेसेज देते, व त्यातील 7/12 योग्य असल्याची तलाठी यांनी खात्री केल्यानंतर फेरफारचा निर्णय मंडळ अधिकारी यांना नोंदवता येईल.
तलाठी लॉगिन ला फेरफारची माहिती भरत असतानाच data signing आवश्यक असलेल्या गटांची यादी देऊन तेथेच असे 7/12 तपासणे व त्यावर data signing करणे ही सुविधा नजीकच्या काळात देण्यात येईल त्यामुळे मंडळ अधिकारी यांना फेरफार निर्गत करताना काही अडचण येणार नाही . सर्व तलाठी यांनी एकदा हे लक्षात घावे की data signing व बल्क signing मध्ये बदल आहे . लवकरच आपण dsp module मध्ये बदल करून सातबारा डिजिटल स्वाक्षरीत करणेची सुविधा विकसित करत आहोत , त्यावेळी प्रत्येक सातबाराचा डेटा sign केला जाणार आहे .
आपला
रामदास जगताप
Comments