रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

समाईक/संयुक्त खात्यातील अविभाज्य हिश्श्याचे हस्तांतरणाबाबत नविन सब आर्टिकल निवडणेबाबत

दिनांक 21/08/२०१8. प्रति, उपजिल्हाधिकारी तथा डि डि ई (सर्व.) सह जिल्हानिबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी (सर्व.) विषय :- समाईक/संयुक्त खात्यातील अविभाज्य हिश्श्याचे हस्तांतरणाबाबत नविन सब आर्टिकल निवडणेबाबत. संदर्भ :- महोदय, सन 2016 पासुन राज्यात i-SARITA प्रणालीत नोंदविण्यात येणारे शेतजमीन / बिनशेती जमीनीचे हस्तांतर दस्‍त ऑनलाईन पध्दतीने भूमी अभिलेख विभागाच्या “ई-फेरफार ” प्रणालीतुन भोगवटादाराची नांवे व क्षेत्र घेऊन नोंदविले जात आहेत. वैयक्तिक खात्यातील संपुर्ण अथवा अंशत: हिश्श्याचे खरेदीपत्र नोंदविताना 25. अभिहस्तांतरण हे आर्टिकल वापरावे. तथापि समाईक अथवा संयुक्त खातेदारांपैकी काही विशिष्ट सहहिस्सेधारक त्यांचा मिळकतीमधील अंशत: अथवा पुर्णत: हक्क खरेदीदाराला अविभाज्य हिस्सा म्हणुन विक्री करुन शकतात. तरतुदीनुसार होणारे दस्त दुय्यम निबंधक (SRO) यांचेकडे नोंदविले जातात. अशा नोंदणीकृत दस्तांचे ई-फेरफार प्रणालीत प्रमाणीत होऊन 7/12 वर योग्यरित्या अंमलात येण्यासाठी नोंदणी अधिनियमाच्या कलम ------मधील तरतुदी प्रमाणे. 1. अविभाजय हिश्श्याची पुर्ण विक्री (162) व 2. अविभाज्य हिश्श्याची अंशत: विक्री (163) असे दोन subtitle तयार करण्यात आले असुन ते i-SARITA प्रणालीत नोंदणी साठी उपलब्ध करुन दिले आहेत. समाईक / संयुक्त खात्यात अनेक सहहिस्सेदार विशिष्ट क्षेत्र धारण न करता समाईकात क्षेत्र धारण करत असतील तर आणि त्यापैकी काही सहहिस्सेधारक आपला पुर्ण हिस्सा अथवा अंशत: हिस्सा दुसऱ्या खात्यातील खातेदारांना विक्री करत असतील आणि त्यास त्या समाईक / संयुक्त खात्यातील इतर सहहिस्सेधारकांची संमती असल्यास व खरेदी क्षेत्र तुकडेबंदी कायद्यातील प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी नसल्यास प्रथम वाटणीपत्र करुन त्यानंतर दुसऱ्या दस्तांचे अभिहस्तांकन करता येईल तथापि समाईक / संयुक्त खात्यातील अन्य सहहिस्सेधारकांची संमती नसताना अविभाज्य हिश्श्याची विक्री करता यावी व त्याचा योग्य अंमल ई-फेरफारद्वारे 7/12 वर होण्यासाठी अविभाज्य हिश्श्याची अंशत: विक्री व अविभाज्य हिश्श्याची पुर्णत: विक्री असे दोन सब आर्टिकल वापरण्यात यावेत. अशावेळी खरेदी देणाराचे नांवे क्षेत्र व विक्री क्षेत्र बरोबर / समान असल्यास अविभाज्य हिश्श्याचे पुर्ण विक्री “अ” पर्याय निवडावा व ज्याठिकाणी खरेदी देणाराचे नांवे क्षेत्रापेक्षा विक्री क्षेत्र कमी असल्यास अविभाज्य हिश्श्याचे अंशत: विक्री हे सब आर्टिकल वापरावे. या दोन्ही दस्त प्रकारातील दस्त नोंदणी पुर्ण झालेनंतर त्याची माहिती प्रमाणे संबंधीत तलाठयाकडे Online पध्दतीने पाठविण्यात येईल व त्याप्रमाणे संबंधीत गावात फेरफार होऊन अशा फेरफार तपशिलामध्ये स्वयंस्पष्ट नोंद येईल. मात्र 7/12 वर प्रत्यक्ष अंमल होताना त्या समाईक / संयुक्त खात्यातुन खरेदी देणारांची नांवे कमी होऊन त्याच खात्यात जमीन खरेदीदारांची नांवे समाविष्ट होतील अशी सुविधा विकसित केली असुन ती १ ऑगष्ट 2018 पासुन राज्यातील सर्व जिल्हयांना उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्याप्रमाणे संबंधीत दुय्यम निबंधक व तलाठी / मंडळ अधिकारी यांनी नोंद घ्यावी ही विनंती. सोबत याबाबतचे user manual जोडले आहे. सदरच्या सुचना सर्व दुय्यम निबंधक, तलाठी व मंडळ अधिकारी यांचे निदर्शनास आणाव्यात ही विनंती. आपला विश्वासू ( रामदास जगताप ) राज्य समन्वयक, ई-फेरफार प्रकल्प जमाबंदी आयुक्त कार्यालय (म.राज्य) पुणे.

Comments

  1. जर एखाद्यची अविभाज्य हिस्स्याची क्षेत्र 4 गुंठे असतील तर दस्त बनवून ग्राह्य धरले जाईल की 11 गुंठ्यापेक्षा कमी आहे म्हणून ते अग्राह्य धरले जाईल

    ReplyDelete

Archive

Contact Form

Send