रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

ई- फेरफार पुर्वी सर्व हस्तलिखित अभिलेख स्कॅनिंग झालेबाबतचे प्रमाणपत्र सादर करणे बाबत

क्र.रा.भू.अ.आ.का.2/स्कॅनिंग /2018 जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि अभिलेख (म.राज्य) पुणे यांचे कार्यालय, नविन प्रशासकिय इमारत, 3 रा मजला, विधानभवनसमोर, पुणे 1 दिनांक 30/ 08 /2018 प्रति, जिल्हाधिकारी, सर्व विषय - ई- फेरफार पुर्वी सर्व अभिलेख स्कॅनिंग झालेबाबत. “डिजिटल इंडिया भूमि अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रम” (DILRMP) अंतर्गत सर्व तहसिलदार, उप-अधीक्षक भूमि अभिलेख आणि नगर भूमापन अधिकारी कार्यालयाकडील महत्वाच्या जुन्या भूमि अभिलेखांचे स्कॅनिंग काम शासन निर्णय क्र.रा.भू.अ./प्र.क्र.182/ले-1, दिनांक 06/06/2014 अन्वये सुरू असून ते अंतिम टप्प्यात आहे. त्यानुसार जुन्या भूमी अभिलेखांचे स्कॅनिंग करणे व अभिलेख डिजिटल स्वरुपात जतन करणेत येणार आहेत. स्कॅन केलेल्या अभिलेखांच्या डेटा मधुन नागरिकांना व शासनाच्या अन्य विभागांना अभिलेख तत्परतेने उपलब्ध करुन देणेत येणार आहे. महसूल विभागात विविध प्रकारचे अभिलेख संधारण करणेत आले असून त्यात स्कॅनिंग योजनेत समाविष्ठ करणेत आलेले सर्व प्रकारचे अभिलेखांचे स्कॅनिग पुर्ण झाले अगर कसे त्याची सबंधीत तहसिलदार कडून व्यक्तीश: पडताळणी करुन प्रमाणपत्र प्राप्त करुन घ्यावे. यामध्ये प्राधान्याने ऑनलाईन ई फेरफार प्रणाली सुरु करण्यापूर्वीचे सर्व हस्तलिखीत गा.न.नं. 7/12, फेरफार रजिस्टर व 8अ चे स्कॅनिंग पुर्ण झाले असल्याची खात्री तहसिलदार यांनी करावी व त्यानंतरच सोबतच्या नमुन्यात प्रमाणपत्र द्यावे. त्याप्रमाणे उपजिल्हाधिकारी तथा डिडिई यांनी तहसीलदार यांचेकडील प्रमाणपत्रे एकत्रीत करुन सोबतच्या नमुन्यातील जिल्हाधिकारी यांचे प्रमाणपत्रासह अहवाल इकडे सादर करावा. प्रमाणपत्राचा नमुना या सोबत जोडला आहे. सदरचे अभिलेख हे 7/12 व फेरफार जनतेला ऑनलाइन उपलब्ध करुन देण्यासाठी “ई अभिलेख” प्रणालीवर दर्शविण्यासाठी आवश्यक आहेत. ई फेरफार कार्यान्वीत होईपर्यंतचे काही अभिलेख स्कॅनींग करणेवर शिल्लक असल्यास अशा स्कॅनींग करावयाच्या दस्तांची पृष्ठ संख्या वाढणार असल्यास तशी माहिती 10/09/2018 पुर्वी पृष्ठाचे आकारमानासह सादर करावी. (रामदास जगताप) राज्य समन्वयक ,ई फेरफार प्रकल्प जमाबंदी आयुक्त कार्यालय पुणे

Comments

  1. आदरणीय, सामान्‍य फेरफार मधील वाटणीपत्र हा पर्याय सुरू करण्‍यात यावा. हि विनंती.

    ReplyDelete

Archive

Contact Form

Send