रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

शेतकऱ्यांना मिळणार डिजिटल स्वाक्षरीत सातबारा!!

शेतकऱ्यांना मिळणार डिजिटल स्वाक्षरीत सातबारा!! रामदास जगताप--उपजिल्हाधिकारी तथा राज्य समन्वयक ई-फेरफार प्रकल्प "महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना सातबारा मिळवताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी लवकरच डिजिटल स्वाक्षरीत सातबारा ची सेवा सप्टे.२०१८ पासून पुन्हा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे" "शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्यातील सर्व सातबारा उतारे ऑनलाईन पध्दतीने देण्यात येत आहेत. शासनाच्या या योजनेला शेतकऱ्यांनी भरघोस प्रतिसाद दिला आहे. परंतु ऑनलाईन सातबारा मिळाल्यावर त्यावर सही घेण्यासाठी तलाठ्यांकडे जावे लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ व्यर्थ जात असून त्यांना मोठी धावपळ करावी लागत आहे. हे सर्व टाळण्यासाठी शासनाच्या महसूल विभागाच्या वतीने लवकरात काही काळासाठी बंद झालेली डिजिटल स्वाक्षरीची सुविधा लवकरच तलाठी स्थरावर पुन्हा उपलब्ध करून दिली जाणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना डिजिटल सातबारा उपलब्ध होऊ शकेल राज्यातील ४३९४५ गावांपैकी ४३ हजार गावांचे संगणकीकृत ७/१२ चे काम पूर्ण झाले असून सुमारे ४२ लक्ष ७/१२ डिजिटल स्वाक्षरीत झाले आहेत ते सध्या महाभूलेख या संकेतस्थळावरून ( mahabhulekh.maharashtra.gov.in) डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ या पर्यायामध्ये जनतेला उपलब्ध करून देणेत आले आहेत , त्यासाठी प्रत्येक खातेदाराला एकदा या संकेतस्थळावर नोंदणी करावी लागते त्यासाठी अर्जदाराचे पूर्ण नाव , पत्ता , मोबाईल नंबर , ई मेल आय डी , इत्यादी माहिती सह नाव नोंदणी झाल्यानंतर प्रत्येक वापरकर्त्याला युजरनेम व पासवर्ड वापरून पुढे कायम स्वरूपी डिजिटल स्वाक्षरीत सातबारा या संकेतस्थळावरून उपलब्ध होऊ शकतील . प्रत्येक ७/१२ डाउनलोड करण्यापूर्वी वापरकर्त्याच्या नोंदणी केलेल्या मोबाईल नंबर वर OTP पाठवला जाईल व त्याची पडताळणी झाल्यानंतरच डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ डाउनलोड होईल . या पद्धतीमुळे प्रत्येक गरजू खातेदाराला आपला डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ उपलब्ध असल्यास डाउनलोड करता येईल व तो सर्व कामासाठी ग्राह्य धारणेत येईल त्यावर पुन्हा तलाठ्याची स्वाक्षरी घेण्याची गरज नाही . सध्या उपलब्ध असलेले ४२ लक्ष ७/१२ मी २०१८ मध्ये डिजिटल स्वाक्षरीत केलेले आहेत त्यानंतर कोणतीही फेरफार नोंद ७/१२ झाली असल्यास याच संकेतस्थळावरील विनास्वक्षारीत ७/१२ हा पर्याय पहावा . विनास्वक्षारीत ७/१२ उपलब्ध करून देणारे अनेक मोबाईलAAP सध्या उपलब्ध आहेत तथापि त्यापैकी अनेक आप ची सेवा खंडित केली असल्याने फक्तऑनलाईन ७/१२ काढताना शेतकऱ्यांनी फक्त शासनाचे "महाभुलेख"हे अधिकृत संकेतस्थळाचा वापर खातेदारांनी करावे असेही श्री रामदास जगताप यांनी सांगितले . खासगी aap कोणीही वापरु नये. अनेक खासगी aap बंद करण्यात आलेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये ऑनलाईन सातबारा बंद झाल्याचा गैरसमज पसरलेला आहे.शासनाच्या अधिकृत महाभूलेख या संकेत स्थळावर डिजिटल स्वाक्षरी असलेले व डिजिटल स्वाक्षरी नसलेले असे दोन्ही प्रकारचे सातबारा उतारे उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. सध्या हे ७/१२ खातेदारांना मोफत उपलब्ध आहेत मात्र तलाठी यांचे कडून प्रिंट काढून घेतल्यास प्रत्येक ७/१२ ला पंधरा रुपये नक्कल फी द्यावी लागते " ऑनलाईन सातबारा शेतकऱ्यांना निश्चित वरदान ठरत आहे. यामुळे हस्तलिखित सातबारा मिळवण्यासाठी शेतकऱ्यांची होणारी धावपळ नक्कीच थांबलेली आहे व श्रम .वेळ व पैशाची बचत होणार आहे .

Comments

Archive

Contact Form

Send