DSP करण्यापूर्वी अतिरिक्त अहवाल ५ च्या दुरुस्ती बाबत
जा. क्र./रा.भू.अ.आ.का.4/रा.स./४४/2018.
जमाबंदी आयुक्त आणि संचालक,
भूमि अभिलेख कार्यालय (म.राज्य) पुणे.
दिनांक ०५ /0५/2018.
प्रति,
डि.डि.ई. तथा उपजिल्हाधिकारी (सर्व.)
विषय :- ई-महाभूमी प्रकल्पांतर्गत डिजीटल स्वाक्षरीचा 7/12 देण्यासाठी
DSP करण्यापूर्वी अतिरिक्त अहवाल ५ च्या दुरुस्ती बाबत
संदर्भ :- १) या कार्यालयाचे परिपत्रक क्र.रा.भू.अ.आ.का.4/रा.स.33/2018
दिनांक 12/03/2018
२) या कार्यालयाचे परिपत्रक क्र.रा.भू.अ.आ.का.4/रा.स.3६/20१८
दिनांक 12/03/2018
संदर्भीय परिपत्रकान्वये दिलेल्या मार्गदर्शक सूचनांबाबत ई महाभूमी प्रकल्प अंतर्गत डिजिटल स्वाक्षरीने संगणकीकृत ७/१२ जनतेला उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्यक्ष कार्यवाही करताना ODC मधील अहवाल निरंक करणे आवश्यक आहे . सर्व प्रथम ODC मध्ये तलाठी यांनी लोगिन करुन अहवाल-५ व अहवाल-११ पाहावा व हे अहवाल यासाठी दिलेल्या दुरुस्ती सुविधामधुन निरंक करावेत. त्यानंतर अतिरिक्त अहवाल ५ दुरुस्त करण्यासाठी खालीलप्रमाणे कार्यवाही करावी.
DATABASE मध्ये खाता मास्टर व ७/१२ वरील नावांच्या संख्यें मध्ये फरक असल्यास तलाठी यांच्या ODC लोगीनमध्ये अतिरिक्त अहवाल-१२ (अतिरिक्त अहवाल-५ ) दिसतो.
1. अतिरिक्त अहवाल-१२ (अतिरिक्त अहवाल-५) मध्ये खाते नंबर, खात्यातील खातेदारांची संख्या व सदर खात्यातील एकुण सर्व्हे नंबर वेगवेगळया खातेदार संख्येच्या फरकाने दिसतील याचाच अर्थ खाते जरी एकच असले तरी त्या खात्यातील काही सर्व्हे नंबरवर खात्यादारांची संख्या वेगवेगळी आहे. त्यामुळे जर आपणास वेगवेगळया सर्व्हे क्रमांकावर वेगवेगळया संख्येने असलेली नावे सर्व सर्व्हे क्रमांकावर समान करावयाची असल्यास दुरुस्ती सुविधामध्ये अतिरिक्त अहवाल-५ ची दुरुस्ती करायला हरकत नाही. परंतु जर आपणास वेगवेगळी नावे ७/१२ वर वेगवेगळया संख्येने हवी असल्यास खाता विभागणी ODC मधून करावी.
२. दुरुस्ती सुविधामधिल दुरुस्ती सुविधा -२१ अतिरिक्त अहवाल-५ ची दुरुस्ती करुन घेण्यासाठी सदर खात्यातील सर्व ७/१२ पाहावेत व खात्री करावी की सदर खाता मास्टरमधिल नावे सर्व ७/१२ वर असणे आवश्यक आहे का ?. त्यानंतर खात्यातील कोणत्याही एका सर्व्हे नंबरला निवडा (टिक) करावे. निवडा केलेल्या सर्व्हे नंबरच्या खाता मास्टरमधिल सर्व नावे दिसतील. आपणास खाता मास्टरमधिल सर्व नावे सर्व सर्व्हे नंबरसाठी समाविष्ट करण्यासाठी “खात्यामध्ये समाविष्ट करा” या बटनावर क्लिक करावे. सर्व नावे सर्व सर्व्हे नंबरसाठी समाविष्ट करण्यासाठी खात्यामध्ये समाविष्ट करुन घेतल्यानंतर सदर नावांपैकी एखादे नाव नको असल्यास ते नाव निवडून (टिकमार्क करून) माहिती साठवा करावी. मात्र कोणतेही नाव ७/१२ वरून काढून टाकावयाचे नसल्यास नाव निवडण्याची गरज नाही.
वरिल संपुर्ण कार्यवाही झाल्यानंतर प्रत्येक ७/१२ व ८अ पाहावा व सदर ७/१२ वरिल क्षेत्र व नावासमोरील फेरफार क्रमांक बरोबर असल्याची खात्री करावी. याप्रमाणे अतिरिक्त अहवाल-१२ (अतिरिक्त अहवाल-५ ) निरंक झाल्यांतरच DSP वापरून ७/१२ डिजिटल स्वाक्षरीत करता येईल याची नोंद घ्यावी.
याबाबतचे user manual सोबत जोडले आहे.
सदरच्या सुचना सर्व संबंधितांच्या निदर्शनास आणाव्यात ही विंनती.
आपला,
( रामदास जगताप )
उपजिल्हाधिकारी तथा राज्यसमन्वयक,
जमाबंदी आयुक्त कार्यालय (म.राज्य) पुणे
प्रत :
१. उपविभागीय अधिकारी (सर्व)
२. तहसीलदार (सर्व)
Comments