DSP साठी 7/12 कोणत्या २० अहवालातून पास होणे आवश्यक ?
नमस्कार मित्रांनो ,
DSP-RoR मध्ये ७/१२ कोणत्या वीस अहवालामधून पास होणार आहे व त्यासाठी काय करावे लागणार आहे हे आपल्या माहितीसाठी येथे नमूद करत आहे .अहवाल निरंक करण्यासाठीच्या सुविधा कंसात नमूद केल्या आहेत .
अहवाल क्र. - १ : - गाव नमुना ७ वरील एकुण क्षेत्र व ७/१२ वरील खात्यांच्या एकुण क्षेत्रांचा फ़रक.
(eFerfar-take a mutation)
अहवाल क्र. - ३ : -गाव नमुना १ व ७ मधील क्षेत्रांचा फ़रक.
VF I change in ODC, VF VII chages in eFerfar
अहवाल क्र. - ४ : -गाव नमुना ७ वरील एकुण क्षेत्र व जिरायतबागायतइत्यादी क्षेत्र यांचा मेळ न बसलेले सर्व्हे क्र.
ODC Option for Ahwal-4 durusti
अहवाल क्र. - ५ : - ७/१२ व खाता रजिस्टर मधील खात्यावरील नावांचा फ़रक
use ODC- ७ वर असलेले पण खाता रजिस्टर मध्ये नसलेली नावे अद्यावत करणे(अहवाल-५)
अहवाल क्र. - ७ : - खाता रजिस्टर मध्ये चुकीचे निवडलेले खाता प्रकार
use ODC-खाता प्रकार दुरुस्ती (अहवाल-७)
अहवाल क्र. - ८ : - फ़ेरफ़ार क्र. नसलेल्या कब्जेदारांची नावे
(eFerfar-take a 155 mutation)
अहवाल क्र. - ११ : - इतर आधिकारात नोंदीचा प्रकार निवडलेला नाही
(eFerfar-take a mutation)
अहवाल क्र. - १२ : - फ़ेरफ़ार क्र.नसलेल्या इतर अधिकारांच्या नोंदी
(eFerfar-take a 155 mutation)
अहवाल क्र. - १३ : - भुधारणा पद्धती साठी प्रकार निवडलेला नाही
(eFerfar-take a Order mutation)
अहवाल क्र. - १५ : -निरंक अथवा '-' अथवा '0' अथवा 'TKN' असलेले खाते.
use ODC- निरंक अथवा '-' अथवा '0' अथवा 'TKN' असलेले खाता क्रमांक दुरुस्ती
अहवाल क्र. - १८ : -सामाईक खात्यामधील नावांचे क्षेत्र 0% अथवा 100% नसलेल्या खातेदारांची यादी.
(eFerfar-take a mutation)
अहवाल क्र. - १९ : -सर्वे निहाय आणेवारी असलेल्या खातेदारांची यादी.
(eFerfar-take a mutation)
अहवाल क्र. - २१ : -७/१२ वरील एकूण क्षेत्र व क्षेत्राचे एकक यामध्ये तफावत असलेले सर्व्हे क्र.
(eFerfar-take a mutation)
अहवाल क्र. - २२ : - शून्य क्षेत्र असलेले ७/१२ वरील चालू खाता क्रमांक.
(eFerfar-take a mutation)
अहवाल क्र. - २४ : -एकसारखे असलेल्या सर्व्हे क्रमांकाची यादी.
(eFerfar-take a order mutation and change Survey number)
अहवाल क्र. - २५ : -भूधारणा : भोगवटदार - १ असलेले परंतु १ क मध्ये असलेले सर्व्हे क्रमांक.
( Option Provided in UC)
अहवाल क्र. - २६ : -भूधारणा : भोगवटदार - २ असलेले परंतु १ क मध्ये नसलेले सर्व्हे क्रमांकाची यादी.
(use eferfar- Option is Provided and Approve by CO)
अहवाल क्र. - २७ : -खातेदारांचे नाव/नावे निरंक असलेले खाता - सर्व्हे क्रमांक.
Use ODC-खातेदारांचे नाव/नावे निरंक असलेले खाते क्रमांक / नावे काढून टाकणे.
अतिरिक्त अहवाल क्र. - ८ : - खातेदारांच्या नावामध्ये स्पेस असल्याने तयार झालेले डूप्लीकेट.
Use ODC खातेदारांच्या नावामध्ये स्पेस असल्याने तयार झालेले डूप्लीकेट काढून टाकणे.
अतिरिक्त अहवाल क्र. - १२ : -अहवाल 5- अतिरिक्त.
Use ODC - अतिरिक्त अहवाल 5 ची दुरुस्ती - पर्याय क्र.१ OR अतिरिक्त अहवाल 5 ची दुरुस्ती - पर्याय क्र.२-खाता विभागणी
वरील प्रमाणे सुविधा वापरून अहवाल निरंक केल्या नंतरच सर्व ७/१२ डिजिटल स्वाक्षरीत करता येतील .
कोणताही ७/१२ चुकीचा असून देखीन डिजिटल स्वाक्षरीत होणार नाही ह्याची दक्षता घ्यावी
आपला
रामदास जगताप
उप जिल्हाधिकारी तथा राज्य समन्वयक
Comments