रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ व त्यासाठी च्या महत्वाच्या बाबी

नमस्कार मित्रांनो , मागील आठवड्यात आलेल्या अडचणींवर मत करून आपण बंद असलेले सात जिल्हे चालू करून DSP चे काम चालू केले आहे . कालच SDC ने आपल्या गरजे प्रमाणे BSNL CLOUD वर सर्वर स्पेस उपलब्ध करून दिली आहे त्या बद्दल IT विभागाचे आभार . आत्ता USER I D तयार झाले बरोबर दोन जिल्हे BSNL CLOUD वर स्तनांतरीत करून SDC सी वर उपलब्ध होणारी स्पेस सर्व जिल्ह्यांना उपलब्ध करून दिली जाईल त्या मुळे आपले काम आणखी गतीने सुरु ठेवता येईल . डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ करण्यापूर्वी कोणते २० अहवाल आज्ञावली मार्फत चेक केले जातात ते आपण माहित करून घेतले आहेत . हे काम करत असताना आपण ODC माधीत सर्व अहवाल निरंक करणे आवश्यक आहे त्यासाठी देनेत आलेल्या सुविधा बाबत सविस्तर मार्गदर्शक सुचना दोन दिवसापूर्वी च काढण्यात आल्या आहेत . डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ १००% अचूक असला पाहिजे ही संकल्पना घेऊन हे सर्व अहवाल निरंक करणे आवश्यक करणेत आले आहेत . कोणत्याही आहवाल मध्ये काहीही अडचण असल्यास हेल्प डेस्क ची मदत घ्या अडचणी / FEEDBACK तातडीने लक्षात आणून द्या त्यामध्ये गरजे प्रमाणे सुधारणा / बदल करून घेता येतील . अहवाल १ निरंक करताना कलम १५५ अथवा २५७ प्रमाणे योग्य आदेश सक्षम महसूल अधिकारी पारीत करील व त्या नंतरच ७/१२ दुरुस्त होऊ शकेल अहवाल ३ दुरुस्त करण्यासाठी दिलेल्या सुविधेमध्ये भूमी अभिलेख विभागाकडून प्राप्त आकार्बंद गाव नमुना नं. १ प्राप्त करून घेऊन त्या प्रमाणे माहिती भरावी . आकारबंद तलाठ्याकडे उपलब्ध नसल्यास तो उप अधीक्षक भूमी अभिलेख यांचेकडून प्राप्त करून घ्यावा . त्यामध्ये जसे क्षेत्र नमूद केले असेल तसे क्षेत्र हे.आर. मध्ये तेथे भरावी . अहवाल ३ मध्ये आकारबंदाचे क्षेत्र आर चौ.मी. मध्ये रुपांतरीत करून पडताळणी साठी दाखवले असलेतरी मुल आकार्बंदा प्रमाणे हे आर मधेच क्षेत्र अहवाल ३ च्या दुरुस्ती सुविधेत भरावे . सर्व अहवाल निरंक केल्या शिवाय ७/१२ अचूक तयार होणार नाहीत हे लक्षात घ्यावे . ODC मधील काही अहवाल दुरुस्त केलेवर त्यास मान्यता द्यावी लागते हे देखील लक्षात ठेवावे . हे सर्व काम अत्यंत महत्वाचे असल्याने ते तलाठ्याने स्वता करावे . काही ठिकाणी समन्वयासाठी उप विभागीय अधिकारी यांनी समन्वय बैठका घ्याव्यात . आपला रामदास जगताप

Comments

Archive

Contact Form

Send