रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

मंजूर फेरफारा प्रमाणे दुरुस्त ७/१२ डिजिटल स्वाक्षरीत करण्यासाठी DSP मध्ये केले बदल

नमस्कार मित्रांनो , आज अखेर २४००००० सातबारा झाले डिजिटल स्वाक्षरीत , त्यासाठी आपल्या सर्वांचे अभिनंदन आज नव्याने विकासीत फेरफार पश्यात्त दुरुस्त ७/१२ डिजिटल स्वाक्षरीत करण्यासाठी DSP MODULE मध्ये सुधारणा करून वाशीम व पनवेल तालुक्यात UAT साठी दिली आहे . या मध्ये प्रत्येक गावात प्रख्यापण आदेशानंतर प्रमाणित झालेल्या फेरफाराचा ७/१२ वर अंमल करून दुरुस्त केलेला ७/१२ डिजिटल स्वाक्षरीत करण्यासाठी उपयोगात आणण्यात येणार आहे . गाव नमुना न. ७ मध्ये कोणताही बदल फेरफार घेऊनच करतां येतो . असा फेरफार मंडळ अधिकार्याने मंजूर केल्या नंतर त्याचा अंमल ७/१२ वर तत्काळ होतो व असा ७/१२ जनतेला महाभूलेख या संकेतस्थळावर तत्काळ पाहण्यासाठी ( VIEW ONLY) उपलब्ध देखील होतो मात्र डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ जनतेला उपलब्ध करून देण्यासाठी DSP MODULE मध्ये आवश्यक बदल करण्यात आले असून ते लवकरच सर्व तलाठी यांना उपलब्ध करून दिले जाणार आहे . त्यानंतर प्रत्येक तलाठ्याला ज्या क्रमाने मंडळ अधिकार्याने फेरफार मंजूर केला असेल त्या क्रमाने ७/१२ कन्फर्म करून DSP करण्यासाठी एका DASHBOARD वर उपलब्ध करून दिले जातील तेथून DSP केल्यास ते DASHBOARD वरून कमी होतील . या मुले जनतेला अद्यावत डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ कोणत्याही शासकीय वा कायदेशीर कामासाठी उपलब्ध होईल . आपला रामदास जगताप दिनांक १५.५.२०१८

Comments

Archive

Contact Form

Send