महाराष्ट्रदिनी महसूल विभागाची राज्यातील जनतेला अमूल्य भेट
नमस्कार मित्रांनो ,
काल दिनांक १ मे ,२०१८ च्या महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर आपल्या सर्वांसह महाराष्ट्रातील जनतेचे स्वप्न साकार होत असताना मनामध्ये एक समाधानाची व राष्ट्र प्रेमाची भावना दाटून आली . काम मुंबई यथे सह्याद्री अतिथिगृहात मा. ना.श्री . देवेन्द्रजी फडणवीस , महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांचे शुभहस्ते व मा.ना. चंद्रकांतदादा पाटील महाराष्ट्राचे महसूलमंत्री यांचे प्रमुख उपस्थितीत राज्यातील ३०००० गावातील जनतेला डिजिटल स्वाक्षरीचा सातबारा वितरण सेवेचा शुभारंभ झाला . त्यावेळी मा. श्री मनुकुमार श्रीवास्तव प्रधान सचिव महसूल यांनी सदरीकर्ण करून मा. मुख्यमंत्री व मा. मंत्री महसूल महोदयांना या कामातील अडचणी / आव्हाने व हा प्रकल्प पूर्णत्वाकडे पोहोचण्यासाठी राज्यातील सर्व तलाठी , मंडळ अधिकारी व सर्व महसूल अधिकारी यांनी अहोरात्र कष्ट केल्या मुळेच ४०००० गावातील संगणकीकृत ७/१२ मधील त्रुटी दूर करणेत आल्या आहेत व त्यापैकी ३०००० गावामधील खातेदारांना डिजिटल स्वाक्षरीचा ७/१२ online उपलब्ध करून देने शक्य होत आहे असे नमूद केले. कामाची व्याप्ती व अडचणी यांचा देखील त्यांनी ओहापोह केला .
सन २००२ मध्ये सुरु झालेले ७/१२ चे संगणकीकरण आज पूर्णत्वाकडे जात असताना महसूल विभागाच्या प्रत्येक कर्मचारी अधिकाऱ्याला होत असलेला आनंद पाहून मोठे समाधान वाटले . या प्रसंगी मा. महसूल मंत्री महोदयांनी सुद्धा ग्रामीण भागात सातबारा , फेरफार व तलाठी यांचे महत्व नमूद कातून तलाठी महासंघाची भूमिका व प्रत्येक तलाठी मंडळ अधिकारी याच्या योग्य मागण्या शासनाने मान्य करून अन्य काही मागण्या बाबत देखील शासनाचे विचाराधीन असल्याचे आपल्या भाषणात नमूद केले .
मा. मुख्यमंत्री महोदयांनी देखील तलाठी मंडळ अधिकारी यांच्या कामाची दाखल घेऊन विधायक कामाचे कौतुक केले तसेच महसूल विभागाच्या ईज ऑफ डूयिंग बिझिनेस बाबत सर्वात जास्त निर्णय केलेने महसूल विभागाचे जाहीर कौतुक केले . हा प्रकल्प यशस्वी करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी प्रामाणिक प्रयत्न केले त्यांचे मा. मुख्यमंत्री महोदयाच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरव करणेत आला . त्यात माझाही मा.ना. मुख्यमंत्री महोयांच्या शुभहस्ते गौरावीनेत आले . माझ्या आज वरच्या २२ वर्ष्याच्या महसूल खात्यातील कार्यकाळात दुसऱ्यांदा मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते गौरविनेत आले . हेच माझ्यासाठी मोठी समाधानाची बाब होती .
गेल्या ४/५ दिवसात ८.१५ लक्ष्य ७/१२ डीजीटल स्वकारीत झाले देखील.
रामदास जगताप
Comments