डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ वितरण सेवेचा लोकार्पण सोहळा दिनानक १ मे. २०१८ -- एक स्वप्न पूर्ती
डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ वितरण सेवेचा लोकार्पण सोहळा दिनानक १ मे. २०१८ -- एक स्वप्न पूर्ती
नमस्कार मित्रांनो ,
गेली अनेक वर्षे सुरु असलेले ७/१२ संगणकीकरणाचे काम पूर्णत्वाकडे जात असल्याने आपल्यापैकी प्रत्येकाला आनंद होत असेल ह्यात शंका नाही
आपल्या पैकी तलाठी मंडळ अधिकारी , नायब तहसीलदार तथा डी बी ए , तहसीलदार यांचे सह सर्वच महसूल कर्मचारी व अधिकारी यांनी दिवस रात्र व सुट्ट्यांच्या दिवशी काम करून हे शिवधनुष्य पेलले आहे त्या बद्दल प्रथम आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद व अभिनंदन .
राज्यातील सुमारे ४४,००० महसुली गावांपैकी ४०,०००० गावामधील ७/१२ दुरुस्तीचे काम पूर्ण झाले आहे . ONLINE झालेल्या ३५७ तालुक्यांपैकी २५० तालुक्यातील १०० % गावांचे घोषणापत्र ३ सह सर्व काम पूर्ण झाले आहे व अनेक तालुके १ /२ गावा साठी अजून अपूर्ण दिसतात परंतु लवकरच हे ही तालुके पूर्ण होतील . राज्यातील २५० तालुक्यातील ३०००० गावातील खातेदारांना डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ वितरण सेवेचा शुभारंभ महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर दिनांक १, मे ,२०१८ रोजी मा. मुख्यामंत्री महोदयांच्या शुभहस्ते व मा.महसूल मंत्री महोदय , मा. प्रधान सचिव (महसूल) महोदय व मा. जमाबंदी आयुक्त महोदयांच्या प्रमुख उपस्थित होत आहे. या नंतर या ३०००० गावातील जे ७/१२ अचूकरीत्या दुरुस्त केले आहेत व डिजिटल स्वाक्षरीत केले आहेत ते ७/१२ कोणत्याही कायदेशीर व शासकीय कामा साठी वापरता येणार आहेत ही एक क्रांतीच म्हणावी लागेल . स्वातंत्रपूर्व काळापासून जमीन विषयक कागदपत्रांना व अधिकार अभिलेखांना असलेले महत्व व काळा ओघात महसूल विभागाने देखील कात टाकून हा परिवर्तनाचा मार्ग अवलंबिला आले त्यासाठी आपण सर्वानी अपर कष्ट घेऊन हस्तलिखित ७/१२ मध्ये न दिसून येणाऱ्या असंख्य त्रुटी संगणकीकृत ७/१२ मध्ये दूर करणेत आल्या आहेत .
सामान्य जनतेला अचूक ७/१२ देण्यासाठी घेतलेल्या चावडी वाचनाच्या विशेष मोहिमेमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक खातेदाराची अडचण दूर झाली असेल अशी अपेक्षा आहे . या पूर्ण प्रक्रियेमध्ये जर तलाठी यांनी स्वतः दप्तर समजून घेऊन तसेच आज्ञावली समजून घेऊन काम केले असल्यास नक्की अचूक ७/१२ झाला असेल यात शंका नाही .
दिनांक १ मे , २०१८ रोजी दुपारी १२.०० ते १.०० या कालावधीत मुंबईत सह्याद्री अतिथिगृहात मुख्य कार्यक्रम मा. मुख्यमंत्री महोदयांच्या शुभहस्ते व मा.महसूल मंत्री महोदय व प्रधान सचिव ( महसूल ) महोदयांच्या प्रमुख उपस्थितीत डिजिटल ७/१२ चे लोकार्पण होईल , त्यावेळी आचारसंहिता नसलेल्या १८ जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी दु. १.०० पासून पुढे हा कार्यक्रम चालू राहील त्या ठिकाणी उत्कृष्ट रीत्या गुणवत्तापूर्वक काम पूर्ण करणाऱ्या तलाठी मंडळ अधिकारी व अन्य महसूल अधिकार्यांचा गौरव करणेत येईल .
१) रायगड , २) रत्नागिरी ,३)सिंधुदुर्ग . ४) पालघर
५) नाशिक ,६)सांगली ,७) वर्ध ,८) चंद्रपूर ,९) गडचिरोली ,
१०)परभणी , ११)हिंगोली , १२) अमरावती , १३) उस्मानाबाद ,
१४)लातूर ,१५) बीड ,१६) भंडारा ,१७ )
गोंदिया या सतरा जिल्ह्यात निवडणुकीची आचारसंहिता चालू असलेने या जिल्ह्यात जिल्हा स्थरावरील लोकार्पण सोहळ्याचा हा कार्यक्रम १ मे रोजी होणार नाही असे शासनाने कळविले आहे मात्र अन्य सर्व जिल्ह्यात कार्यक्रम होईल .
या कार्यक्रमात सर्वच तलाठी मंडळ अधिकारी व महसूल अधिकार्यांना मा. मंत्री महोदय , राज्य मंत्री महोदय व मा. प्रधान सचिव यांच्या संयुक्त सहीचे प्रशस्तीपत्र देऊन गौराविनेच्या सुचना मा मंत्री महोदयांनी दिल्यां आहेत . मात्र कार्यक्रमाच्या वेळी १०० सत्कारमूर्ती निवडताना निकष काय असावेत याबाबत आपल्या जिल्ह्याची स्थिती पाहून निकष ठरवता येतील
१) डिजिटल स्वाक्षरीचे काम सुरु केलेल्या तालुक्यांसाठी आपल्या सजा , मंडळ , तालुका व जिल्हा घटक विचारात घेऊन सर्व गावांचे DSP चे कामकाज पूर्ण केलेल्या अथवा सर्वाधिक ७/१२ DSP केलेले तलाठी मंडळ अधिकारी , डी बी ए , तहसीलदार / उप विभागीय अधिकारी यांना गौरविता येईल .
२) ज्या तालुक्यातील प्रख्यापनाचे आदेश काढलेले नाहीत त्या ठिकाणी त्या ठिकाणी सजा , मंडळ , तालुका व उप विभागातील सर्व महसुली गावांचे घोषणापत्र ३ पूर्ण केले असतील त्यांना गौराविनेत येता येईल .
३) कामाची गुणवत्ता पाहण्यासाठी ODC सर्व अहवालांची संख्या निरंक असल्यास प्राधान्याने विचार करावा .
या सर्व प्रक्रियेत गुणवत्ता पूर्वक काम पूर्ण करणार्या तसेच ईतरांना मदत केलेल्या कर्मचारी यांचा गौरव करणेत यावा हीच अपेक्षा .
आपले हे सर्व कामकाज मध्ये ZERO TOLERANCE TO ERROR याच तत्वाने पूर्ण करणे आवश्यक आहे . त्यामुळे DSP करताना फक्त अचूक ७/१२ कन्फर्म करणेत यावेत व तेच डिजिटल स्वाक्षरीत करावेत .
हा डिजिटल स्वाक्षरीचा ७/१२ महाभूलेख या संकेत स्थळावरून ( https://mahabhulekh.maharshtra.gov.in ) तसेच महाभूमी च्या संकेत स्थळावरून ( https://aapleabhilekh.mahabhumi.gov.in/saatbara ) महसूल दिना पर्यंत ( दि. १ ऑगष्ट ,२०१८ ) मोफत मिळतील . तेच ७/१२ १ ऑगस्ट पासून सशुल्क online मिळतील .
मा मुख्यमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते आपला ७/१२ व आपली चावडी ह्या दोन सेवा सुरु करणार आहोत
आपला ७/१२ मधून डिजिटल स्वाक्षरीचा ७/१२ व
आपली चावडी मधून गावच्या चावडीचा डिजिटल नोटीस बोर्ड जनतेस उपलब्ध करून देत आहोत .
आपली चावडी म्हणजे तलाठी कार्यालयात प्रशिद्ध होणार्या सर्व सार्वजनिक नोटीसा आपणास पाहता येतील त्यामध्ये प्रख्यापण आदेश झाल्यानंतर घेतलेल्या प्रत्येक फेरफाराची नोटीस व फेरफाराची स्थिती जनतेला online उपलब्द होणार आहेत
या दोन सेवा प्राप्त झाल्याने राज्यातील जनतेला त्यांच्या मनातील स्वप्नपुर्ती झाल्याचे समाधान झाल्या सारखे वाटेल यात शंका नाही .
जनतेचा ७/१२ अचूक व योग्य रित्या जतन करण्याचे आपले कर्तव्य पार पडण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेणाऱ्या माझ्या सर्व महसूल अधिकारी व कर्मचारी मित्रांचे धन्यवाद व हार्दिक अभिनंदन
रामदास जगताप
राज्य समन्वयक ई फेरफार प्रकल्प
Do we have any schdeule when Pune District PherPhar and Maps of Mojani will be available?
ReplyDelete