कवठे येमाई : डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ साठी पुण्याचे उप जिल्हाधिकारी रामदास जगताप यांचे उत्कृष्ठ कार्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते गौरव
May 3, 2018 Samajsheel कवठे येमाई 0
कवठे येमाई : संपूर्ण महाराष्ट्रात डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ नागरिकांना उपलब्ध व्हावा या साठी मागील काही वर्षांपासून सुरु असलेले काम आता अंतिम टप्प्यात असून यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करणारे ई फेरफार प्रकल्पाचे राज्य समन्वयक तथा पुण्याचे उप जिल्हाधिकारी रामदास जगताप यांनी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात भेटी देत डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ नागरिकांना लवकरात लवकर उपलब्ध व्हावा या हेतूने मार्गदर्शन करीत शासनाच्या या उपक्रमास शक्य तितक्या जलदगतीने हे काम मार्गी लागण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न सुरु ठेवले आहेत.
राज्यातील जनतेला डिजीटल स्वाक्षरीत ७/१२ उपलब्ध देण्याचा लोकार्पण सोहळा दि १ मे रोजी मुंबई येथे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शुभहस्ते व महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे उपस्थित संपन्न झाला . हा प्रकल्प यशस्वी करण्यासाठी केलेले उत्कृष्ठ कार्य व अमूल्य योगदाना बद्दल पुण्याचे उपजिल्हाधिकारी , प्रकल्पाचे राज्य समन्वयक रामदास जगताप यांचा राज्य शासनाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते पुरस्कार व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
उपजिल्हाधिकारी रामदास जगताप हे पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील मुळ जांबुत गावचे असून ते डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ साठी प्रभावीपणे राबवित असलेल्या या उपक्रमाबद्दल शासानाने त्यांचा गौरव केला असल्याने शिरूर तालुक्यासह पुणे जिल्यातून व जांबुत ग्रामस्थांकडून रामदास जगताप यांचे अभिनंदन होत आहे.
– सुभाष शेटे,(कार्यकारी संपादक,सा.समाजशील)
Share on:
Comments