ODC अतिरिक्त अहवाल ५ .१ ची दुरुस्ती सुविधा
<
नमस्कार मित्रांनो ,
गेल्या काही दिवसा पासून NIC TEAM कडून ODC अतिरिक्त अहवाल ५ व अतिरिक्त अहवाल ५.१ हे नवीन अहवाल व त्याची दुरुस्ती सुविधा देण्यात आली आहे त्यासाठी खालील कार्य पद्धती वापरावी
हस्तलिखित ७/१२ ची डेटा एन्ट्री करताना अथवा हस्तलिखित ७/१२ व ८अ लिहितांना झालेल्या असंख्य चुका सध्या संगणकीकरण करताना लक्षात येत आहेत.
जर एकाच खात्यातील नावे त्या खात्यातील वेगवेगळ्या ७/१२ वर वेगवेगळ्या पद्धतीने लिहिली असलीतरी त्यांचे खाते एकच होते अथवा खात्यातील समाविष्ट ७/१२ वर नावांची संख्या व नावे समान नसल्यास अशी सर्व खाती व त्यावरील स.नं./ गट नं. या ODC अतिरिक्त अहवाल ५.१ मध्ये दाखविनेत येतील व या मध्ये खालील प्रमाणे दुरुस्ती करावी
१. ODC मधील अतिरिक्त अहवाल ५.१ पहावा त्यामध्ये अश्या पद्धतीने खातेदाराच्या नावांमध्ये व संखे मध्ये तफावत असल्यास अशी सर्व खाती व ७/१२ वरील नावे दाखविनेत येतील.
२. जर आपणास वेगवेगळी नावे वेवेगळ्या ७/१२ वर हवी असल्यास अशी दुरुस्ती ODU / री एडीट मधून खाते विभागणी करून करावी.
३. जर आपणास वेगवेगळ्या सर्वे क्रमांकावर असलेली वेगवेगळी नावे सर्व सर्वे क्रमांकावर समान करावयाची असल्यास ODC मधील अतिरिक्त अहवाल ५ ची दुरुस्ती यां सुविधेचा वापर करून अहवाल निरंक करावा .
रामदास जगताप
दिनांक २२.४.२०१८
Comments