रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

महाराष्ट्र दिनाचा डिजिटल स्वाक्षरीच्या सातबारा चे लोकार्पण व महसूल अधिकारी कर्मचारी गौरव सोहळा

नमस्कार सर , शासनाच्या DILRMP प्रकल्प अंतर्गत सुरु असलेल्या ई फेरफार प्रकल्पा अंतर्गत अचूक ७/१२ व ८अ साठी घेणेत आलेल्या चावडी वाचनाच्या विशेष मोहिमेत प्राप्त आक्षेप / तक्रारी व तपासणीत आढळून आलेल्या त्रुटी दूर करण्यासाठी दिलेल्या RE EDIT MODULE चे काम दिनांक ३० एप्रिल २०१८ अखेर गुणवत्तापूर्वक पुर्ण करणाऱ्या तसेच डिजिटल स्वाक्षरीयुक्त ७/१२ ( DSP-RoR) पूर्ण साजा , मंडळ, तालुका ,उप विभाग व जिल्हा पूर्ण करणाऱ्या अधिकारी व कर्मचार्यांचा गौरव सोहळा घेनेच्या शासन विचारात आहे . या संभाव्य कार्यक्रमाच्या अटी शर्ती आताच जाहीर केल्यास गुणवत्तापूर्वक काम पूर्ण करण्यास निश्चित मदत होईल अशी अपेक्षा आहे . १. घोषणापत्र ३ पूर्ण केलेल्या गावात / साजात / मंडळात / तालुक्यात /उप विभागात / जिल्ह्यात एकाही ODC अहवाल व अतिरिक्त अहवाल प्रलंबित नसावा . २. या गावात / साजात / मंडळात / तालुक्यात /उप विभागात / जिल्ह्यात एकाही कलम १५५ चा आदेश प्रलंबित नसावा. ३. या गावात / साजात / मंडळात / तालुक्यात /उप विभागात / जिल्ह्यात दि १६/१०/२०१७ च्या सुचांना प्रमाणे सर्व तपासणी संचिका तालुका अभिलेख काक्षात जमा केलेल्या असाव्यात . ४. या गावात / साजात / मंडळात / तालुक्यात /उप विभागात / जिल्ह्यात एकाही ७/१२ अहवाल १ अथवा अहवाल ३ मध्ये प्रलंबित नसावा . ५ . या गावात / साजात / मंडळात / तालुक्यात /उप विभागात / जिल्ह्यातील सर्व ७/१२ डिजिटल स्वाक्षरीत झालेले असावेत . ६. हे काम तलाठी मंडळ अधिकार्याने स्वतः केलेले असावे . वरील अटी शर्ती पूर्ण करत असलेल्या सर्व तलाठी , मंडळ अधिकारी , नायब तहसीलदार , तहसीलदार , उप विभागीय अधिकारी, उपजिल्हाधिकारी तथा डीडीई ,जिल्हाधिकारी यांची पात्रता तपासून गौरव सोहळ्यासाठी निवडलेल्या नावांची शिफारस विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत करणेत येईल पत्र सर्व तलाठी , मंडळ अधिकारी , नायब तहसीलदार , तहसीलदार , उप विभागीय अधिकारी , उपजिल्हाधिकारी तथा डीडीई , जिल्हाधिकारी यांना मा. महसूल मंत्री व मा .प्रधान सचिव ( महसूल) यांच्या स्वाक्षरीचे प्रशस्तीपत्र देऊन मुख्यमंत्र्यांचे हस्ते गौरविणेत यावे. असे प्रस्तावित आहे . असे केल्याने अनेक तांत्रिक अडचणी असताना हा प्रकल्प अशास्वी करणेसाठी अहोरात्र प्रामाणिकपणे कष्ट करणार्या कर्मचारी व अधिकार्याना प्रोत्साहन मिळेल व उर्वरीत काम देखील वेळेत पूर्ण होईल . आपला रामदास जगताप उप जिल्हाधिकारी तथा राज्य समन्वयक ई फेरफार प्रकल्प , जमाबंदी आयुक्त कार्यालय , पुणे

Comments

Archive

Contact Form

Send