रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

महाराष्ट्र दिनाचा महसूल अधिकारी कर्मचारी गौरव सोहळा

नमस्कार मित्रांनो महत्वाची सुचना-- शासनाच्या DILRMP प्रकल्पा अंतर्गत सुरु असलेल्या ई फेरफार प्रकल्पा मध्ये अचूक ७/१२ व ८अ साठी घेणेत आलेल्या चावडी वाचनाच्या विशेष मोहिमेत प्राप्त आक्षेप / तक्रारी आणी तपासणीत आढळून आलेल्या त्रुटी दूर करण्यासाठी दिलेल्या RE EDIT MODULE चे काम दिनांक ३० एप्रिल २०१८ अखेर गुणवत्तापूर्वक पूर्ण करणाऱ्या तसेच डिजिटल स्वाक्षरी युक्त ७/१२ ( DSP-RoR) पूर्ण साजा , मंडळ, तालुका ,उप विभाग , जिल्हा पूर्ण करणाऱ्या अधिकारी व कर्मचार्यांचा गौरव सोहळा महारष्ट्र दिनाच्या दिवसी घेण्याचा विचार शासन स्तरावर सुरु आहे . त्यासाठी घोषणापत्र ३ पूर्ण करून डिजिटल स्वाक्षरी पूर्ण केलेले साजा , महसूल मंडळ ,तालुका , उप विभाग व जिल्हा हे घटक विचारात घेऊन ते पूर्ण करण्यासाठी अहोरात्र प्रयत्नांची पराकाष्टा करून डिजिटल स्वाक्षरीचा अचूक संगणकीकृत ७/१२ जनतेला उपलब्ध करून देणाऱ्या सर्व तलाठी , मंडळ अधिकारी , नायब तहसीलदार , तहसीलदार , उप विभागीय अधिकारी व जिल्हाधिकारी यांचा समावेश असेल . या बाबत सविस्तर कार्यपद्धती लवकरच शासन जाहीर करेल त्यासाठी आपण पूर्वतयारी सुरु करावी म्हणून ही सुचना आपल्या आगाऊ माहिती साठी .

Comments

Archive

Contact Form

Send