ई फेरफार मधील आज पासून दूर करणेत आलेल्या अडचणी दिनांक ३.४.२०१८
नमस्कार मित्रांनो ,
" ई फेरफार " आज्ञावली मध्ये आढळून आलेल्या काही error / त्रुटी आज पासून दुरुस्त करणेत आल्या असून त्यां आज दि. १३.४.२०१८ पासून पासून रायगड, पुणे व वाशीम जिल्ह्यांना टेस्ट साईट मध्ये देनेत आल्या आहेत .
१. काही वेळा मयताचे नाव कमी करणे व वारस फेरफार घेतल्यानंतर क्षेत्र स्थालांतरीत होत नव्हते अशी समस्या आता येणार नाही
२. काही सर्व्हे नंबर अहवाल-१ मध्ये नसताही क्षेत्र मेळात बसत नाही असा मेसेज आता येणार नाही. ७/१२ वरील एखाद्या खात्यातील सर्व नावांना कंस असल्यास असे खाते सामविष्ट करता येणार नाही.
३. वारस फेरफार नामंंजुर करायचा असल्यास सर्व सर्व्हे एकाच वेळी नामंंजुर होतील.
४. आता "विश्वस्त खात्याची वारस नोंद" खाते वगळुन करता येईल.
५. MCI कडुन नष्ट केलेले दस्त व नामंंजुर केलेले फेरफारातील दस्त क्र आता नव्याने फेरफार घेताना दस्त प्रलंबित येणार नाही व दस्त फेरफार घेण्यासाठी उपलब्ध राहतील .
६. आता वाटपपत्र, अदला-बदल व हक्कसोड फेरफार प्रकार सामान्य फेरफार मधुन घेता येणार नाही.
७. वाटपपत्र, अदला-बदल व हक्कसोड फेरफार प्रकाराची री-एंट्री घेता येणार नाही.
८. वारस template प्रमाणे हक्कसोड फेरफार घेता येईल.
९. एखाद्या ७/१२ वरील सर्व खात्यांना कंस असल्यास आदेशाने अशा ७/१२ वर खाते समाविष्ट करता येईल.
१०. काही वेळा ८अ नावाने सर्च केल्यास सर्व ८अ वर सर्व सर्व्हे नंबर दिसत नव्हते आता खात्यातील सर्व सर्व्हे नंबर दिसतील.
११. ई फेफार मध्ये ८अ काढल्यास शेतीचा ८अ व बिन्शेतीचा ८अ एकाच पानावर येईल .
रायगड, पुणे व वाशीम या जिल्ह्यांनी खात्री करून feedback द्यावा .
रामदास जगताप
दिनांक १३.४.२०१८
Comments