वाडी विभाजन करुन महसूली गांव निर्मीतीच्या सुविधेबाबत.
मा. जमाबंदी आयुक्त आणि
संचालक भूमी अभिलेख (महाराष्ट्र राज्य ) पुणे यांचे कार्यालय
ई-फेरफार/क्र/रा.स./कावि/41/२०१8 दिनांक 12 /04/२०१8.
प्रति,
उपजिल्हाधिकारी तथा डी.डी.ई (सर्व)
विषय - ई-फेरफार आज्ञावलीची अंमलबजावणी.
वाडी विभाजन करुन महसूली गांव निर्मीतीच्या सुविधेबाबत.
संदर्भ - १. या कार्यालयाकडील क्र.रा.भू.अ.आ.का.४/ई-म्युटेशन/2015 दिनांक 29/12/2015 चे पत्र.
2.या कार्यालयाकडील क्र.रा.भू.अ.आ.का.४/वाडी विभाजन/2017दिनांक 27/03/2017 चे पत्र.
3. या कार्यालयाकडील क्र.रा.स./का.वि/34/2018दिनांक 17/03/2018 चे पत्र.
महोदय,
DILRMP अंतर्गत ई-फेरफार आज्ञावलीच्या अंमलबजावणी मधील वाडी विभाजनाने तयार झालेल्या नविन महसुल गावाबाबत करावयाची कार्यवाही हा देखील महत्वाचा घटक आहे. याबाबत उपरोक्त संदर्भीय पत्रान्वये वेळोवेळी सुचना देण्यात आल्या आहेत. यामध्ये क्षेत्रीय स्तरावर येत असलेल्या विविध तांत्रिक अडचणी विचारात घेवून या सुविधेमध्ये काही बदल करण्यात आले आहेत व ही सुविधा https://10.187.202.183/wadivibhajan या URL वर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. ज्या जिल्हयांचा डेटा SDC वर उपलब्ध आहे अशा सर्व जिल्हयांसाठी ही URL वापरुन वाडी विभाजनाची कार्यवाही पुर्ण करता येईल. तरी SDC वरील कोणत्याही जिल्हयाने ई-फेरफार मधील वाडीविभाजन हा पर्याय वापरुन कार्यवाही करु नये. हे आपण सर्व वापरकर्त्यांच्या निदर्शनास आणावे.
दिनांक 17/03/2018 च्या पत्रात नमुद केल्याप्रमाणे नवनिर्मित गावासाठी कोणता जनगणना सांकेतांक कमांक (Census Code) वापरावयाचा याबाबत या कार्यालयाकडुन तो उपलब्ध करुन घ्यावा व त्यानंतर वाडी विभाजनाची प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने करावी. सोबत त्याचे परिपुर्ण USER MANUAL जोडले आहे.
सदरच्या सूचना सर्व वापरकर्त्यांच्या निदर्शनास आणाव्यात.,
( रामदास जगताप )
राज्य समन्वयक, रा.भू.अ.आ.का.
जमाबंदी आयुक्त कार्यालय (म.राज्य)
प्रत,
उपविभागीय अधिकारी (सर्व)
तहसिलदार (सर्व)
Comments