रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

1 मे 2018 रोजी होणाऱ्या डिजीटल स्वाक्षरीने संगणकीकृत 7/12 लोकार्पण सोहळयात महसूल अधिकारी / कर्मचारी यांचा गौरव करणेबाबत चा प्रस्ताव

क्र.रा.भू.अ.आ.का./ अ.क.गौरव /2018 जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि अभिलेख (महाराष्ट्र राज्य) पुणे पुणे दिनांक 10 /04/2018 प्रति, मा. प्रधान सचिव, महसुल, मंत्रालय मुंबई. विषय - दिनांक 1 मे 2018 रोजी होणाऱ्या डिजीटल स्वाक्षरीने संगणकीकृत 7/12 लोकार्पण सोहळयात महसूल अधिकारी / कर्मचारी यांचा गौरव करणेबाबत. संदर्भ - दिनांक 07/04/2018रोजी पुणे येथील विभागीय आयुक्त कार्यालयात मा. मंत्री (महसूल ) यांचे अध्यक्षतेखाली व मा प्रधान सचिव (महसूल) यांचे उपस्थितीत सर्व विभागीय आयुक्त यांची कार्यशाळा. शासनाच्या DILRMP प्रकल्प अंतर्गत सुरु असलेल्या ई फेरफार प्रकल्पा अंतर्गत अचूक ७/१२ व ८अ साठी घेणेत आलेल्या चावडी वाचनाच्या विशेष मोहिमेत प्राप्त आक्षेप / तक्रारी व तपासणीत आढळून आलेल्या त्रुटी दूर करण्यासाठी दिलेल्या RE EDIT MODULE चे काम दिनांक ३० एप्रिल २०१८ अखेर गुणवत्तापूर्वक पूर्ण करणाऱ्या तसेच डिजिटल स्वाक्षरी युक्त ७/१२ ( DSP-RoR) पूर्ण साजा, मंडळ, तालुका, उपविभाग, जिल्हा पूर्ण करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव सोहळा घ्यावा असे प्रस्तावित करणेत येत आहे. त्यासाठी च्या अटी शर्ती आताच जाहीर केल्यास गुणवत्तापूर्वक काम पूर्ण करण्यास निश्चित मदत होईल अशी अपेक्षा आहे . १. घोषणापत्र ३ पूर्ण केलेल्या गावात / साजात / मंडळात / तालुक्यात /उप विभागात / जिल्ह्यात सर्व ODC अहवाल व अतिरिक्त अहवाल निरंक केलेले असावेत. ( अहवाल 6,14 व 23 वगळून ) २. या गावात / साजात / मंडळात / तालुक्यात /उप विभागात / जिल्ह्यात चुक दुरुस्ती बाबतचा एकाही कलम १५५ चा आदेश प्रलंबित नसावा. ३. या गावात / साजात / मंडळात / तालुक्यात / उप विभागात / जिल्ह्यात दि १६/१०/२०१७ च्या सुचनांप्रमाणे सर्व गावांच्या तपासणी संचिका तालुका अभिलेख कक्षात जमा केलेल्या असाव्यात. ४. या गावात / साजात / मंडळात / तालुक्यात /उप विभागात / जिल्ह्यात एकाही ७/१२ DSP RoR अहवाल १ अथवा अहवाल ३ मध्ये प्रलंबित नसावा. ५ . या गावात / साजात / मंडळात / तालुक्यात / उप विभागात / जिल्ह्यातील सर्व ७/१२ डिजिटल स्वाक्षरीत झालेले असावेत. वरील अटी शर्ती पूर्ण करत असलेल्या तलाठी, मंडळ अधिकारी, नायब तहसीलदार, तहसीलदार, उप विभागीय अधिकारी, उपजिल्हाधिकारी तथा डीडीई, जिल्हाधिकारी यांची पात्रता तपासून गौरव सोहळ्यासाठी निवडलेल्या नावांची शिफारस विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत करणेत येईल पात्र सर्व तलाठी, मंडळ अधिकारी, नायब तहसीलदार, तहसीलदार, उप विभागीय अधिकारी, उपजिल्हाधिकारी तथा डीडीई, जिल्हाधिकारी यांना मा.मंत्री (महसूल) व मा .प्रधान सचिव ( महसूल) यांच्या स्वाक्षरीचे प्रशस्तीपत्र देऊन मुख्यमंत्र्यांचे हस्ते गौरविणेत यावे. असे केल्याने अनेक तांत्रिक अडचणी असताना हा प्रकल्प अशस्वी करणेसाठी अहोरात्र प्रामाणिकपणे कष्ट करणारऱ्या कर्मचारी व अधिकाऱ्यांना प्रोत्साहन मिळेल व उर्वरीत काम देखील वेळेत पूर्ण होईल. तरी याबाबत योग्य ते निर्देश संबंधितांना देण्यास विनंती आहे. ( कैलास जाधव ) भा.प्र.से. स्थळ प्रतीवर मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक उपसंचालक भूमि अभिलेख संलग्न भूमि अभिलेख (म.रा.) पुणे यांची स्वाक्षरी असे. जमाबंदी आयुक्त (सर्वसाधारण) पुणे. प्रत :- 1. मा. विभागीय आयुक्त (सर्व) २. जिल्हाधिकारी (सर्व)

Comments

Archive

Contact Form

Send