घोषणापत्र - 3 झालेल्या गावांची तपासणी करणेबाबत.
विषय : - घोषणापत्र - 3 झालेल्या गावांची तपासणी करणेबाबत.
उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने या कार्यालयातील पथकाने दिनांक 16/01/18 रोजी गडचिरोली जिल्हयातील घोषणापत्र 3 पुर्ण झालेल्या गावांची तपासणी केली असता प्रत्येक गांवनिहाय दिसुन आलेल्या त्रुटी सोबतच्या परिशिष्टी - अ मध्ये नमुद केल्या आहेत.
या कार्यालयाचे दिनांक 16/10/2017 च्या परिपत्रकाप्रमाणे सविस्तर सुचना देऊनही घोषणापत्र 3 करण्यापुर्वी कामाची गुणवत्ता योग्यरित्या राखण्यासाठी आवश्यक ती दक्षता घेतली गेलेली नाही असे दिसुन आले आहे. अनेक गावांमधील दुरुस्त 7/12 ची प्रिंट काढुन त्याची ठरवुन दिलेल्या बिंदुप्रमाणे तपासणी करुन प्रपत्र 1 मधील प्रमाणपत्र न घेताच घोषणापत्र 3 दिल्याचे दिसुन येते. पालक महसुल अधिकाऱ्यांची 1 ते 24 मुद्यांची तपासणी केली नाही व भूधारणा बदलत्या स.नं. ची यादी पडताळणी केलेली नाही. तसेच नायब तहसिलदार, उपविभागीय आयुक्त यांनी आपल्या तपासणीत 100% अचुकता प्राप्त झाली असल्याची खात्री करणे आवश्यक आहे.
नागपूर जिल्हयातील विभागातील भंडारा जिल्हा वगळता सर्वच जिल्हयामध्ये हस्तलिखीत 7/12 मधील सर्व फेरफार क्रमांक जसेच्या तसे संगणकीकृत 7/12 मध्ये घेण्यात आलेले नाही व अजुनही मानीव फेरफार क्रमांक संगणकीकृत 7/12 वर दिसुन येतात, हे अत्यंत अयोग्य आहे. कोणत्याही संगणकीकृत ७/१२ वर चुकीचे फेरफार क्रमांक नमूद असणे अथवा कोणताही फेरफार क्रमांक नमूद नसणे अत्यंत घातक ठरू शकते व यामुळे अनेक महसुली अथवा दिवाणी डाव्यांचे कारण ठरू शकते . काही तालुक्यात सर्व 7/12 संगणकीकृत प्रती ऑनलाईन उपलब्ध नाहीत.
डाटा क्लिनिंगच्या या विशेष मोहिमेध्ये सर्व महसुल अधिकाऱ्यांचा सक्रिय सहभाग व वरिष्ठ स्तरावर गुणवत्तेबाबत गांभिर्य वाढविल्याशिवाय Zero tolerance to error हे तत्व पाळले जाणार नाही. सबब या कामकाजात गुणवत्तापुर्ण कामासाठी आपण स्वत: लक्ष घालावे म्हणजे अचुक 7/12 व 8 अ देण्याचे उदिदष्ट वेळेत साध्य करण्यास मदत होईल.
Comments