नवीन मराठी वर्ष्याच्या व गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
नमस्कार मित्रांनो ,
मराठी नव वर्षाच्या व गुढी पाडव्याच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा 💐💐💐
गेल्या वर्षभरात संगणकीकृत अचूक ७/१२ व ८अ साठी राज्यभरातील सर्व तलाठी , मंडळ अधिकाऱ्यांपासून सर्व महसूल अधिकारी अहोरात्र प्रयत्न करत आहेत . आज अखेर ३६००० गावातील काम पुर्ण झाले असून ११ जिल्हे व १५५ तालुक्यांतील काम पुर्ण झाले आहे . डिजीटल स्वाक्षरीने ७/१२ जनतेला उपलब्ध करुन देण्यासाठी ची सुविधा विकसीत केली असून ५० गावचे काम पुर्ण झाले असून ते mahabhumi.gov.in/erecords_new या संकेतस्थळावर उपलब्ध करुन दिले आहे , फक्त त्याचे रितसर लोकार्पण होऊ शकले नाही ते नजिकच्या काळात होईलच.
हा ऐक मोठा बदल महसूल विभागात होत आहे व त्याचे साक्षिदार आपण आहोत यांचे खूप समाधान आहे .
पुढील वर्षात आणखी लोकोपयोगी उपक्रम महसूल विभाग यशस्वी होवोत व आपले हे वर्ष समाधान व शांततेत जावो हिच सदिच्छा🙏💐💐
रामदास जगताप
Comments