रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

ई-फेरफार आज्ञावलीची अंमलबजावणी वाडी विभाजन करून नविन महसुली गाव निर्मितीबाबत

क्र./रा.स./ का.वि./३४/2018. जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (म.राज्य), पुणे दिनांक - १७ /03/2018. प्रति, उप जिल्हाधिकारी तथा डिस्ट्रीक्ट डोमेन एक्सपर्ट (सर्व.) विषय - ई-फेरफार आज्ञावलीची अंमलबजावणी. वाडी विभाजन करून नविन महसुली गाव निर्मितीबाबत. संदर्भ - या कार्यालयाकडील दिनांक 27/03/2017 चे पत्र. DILRMP अंतर्गत ई-फेरफार आज्ञावलीच्या अंमलबजावणीमध्ये अनेक जिल्हयामधुन वाडी विभाजन होऊन नविन महसुली गावाबाबतच्या अडचणी कशा पध्दतीने निर्गत करावयाच्या आहेत त्याबाबत संदर्भीय पत्रान्वये मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या होत्या व आपल्या जिल्हयातील तालुकानिहाय गावांचा आढावा घेवून - १) ऑफलाईन पध्दतीने कार्यवाही करावयाच्या वाडी विभाजनाच्या गावांची नांवे व संख्या व २) ऑनलाईन पध्दतीने कार्यवाही करावयाच्या वाडी विभाजनाच्या गावांची नांवे व संख्या याचा आढावा घेवून अशी सर्व गांवे 30 एप्रिल 2017 अखेर ऑनलाईन होतील अशी अपेक्षा व्यक्त केली होती. तथापि याप्रमाणे अद्यापही कार्यवाही झालेली नाही असे दिसून येते अद्यापही वरील प्रमाणे कार्यवाही न झालेल्या नवीन महसुली गावांच्याबाबत खालीलप्रमाणे कार्यवाही करावी. अ) ज्या गावामध्ये वाडी विभाजनाची अधिसूचना अंतिम होऊन महसूली गावात रुपांतर यापूर्वीच झालेले आहे व अशा नविन गावांचा गा.न.नं. १ (आकारबंद) भूमी अभिलेख विभागाकडून तयार झाल्यानंतर त्याचा हस्तलिखीत 7/12 मध्ये फेरफार होऊन यापूर्वीच हस्तलिखीत गांव दप्तरामध्ये विभाजीत होऊन स्वतंत्र गावे अस्तित्वात झाली आहेत मात्र अशा गावांचा अंमल संगणकीकृत 7/12 मध्ये झालेला नाही. त्या गावांच्या वाडीविभाजनाबाबत https://10.187.202.18३/wadivibhajan या URL चा वापर करुन वाडी विभाजनाची कार्यवाही ऑनलाइन पध्दतीनेच करण्यात यावी. या नवनिर्मित गांवाना कोणता जनगणना सांकेतांक क्रमांक (Census Code) देण्यात यावा हे जमाबंदी आुयक्त आणि संचालक भूमी अभिलेख कार्यालय (म.राज्य) पुणे या कार्यालयाकडून कळविण्यात येईल यासाठी वाडी विभाजनासाठी हस्तलिखीतमध्ये वापरलेला फेरफार नंबर वापरुन वाडी विभाजनाची कार्यवाही करण्यात यावी. ब) ज्या गावामध्ये तालुका ऑनलाईन झाल्यानंतर वाडी विभाजनाची अधिसूचना अंतिम होऊन वाडीचे महसूली गावात रुपांतर झाले आहे व त्याप्रमाणे दोन्ही गावांचा सुधारीत गाव नमुना नंबर -१ (आकारबंद) तलाठी यांचेकडे प्राप्त झाल्यानंतर डी.बी.ए. लॉगीन ने नविन गांव तयार करणे यामधुन नविन गांव तयार करता येईल मात्र यापुर्वी या गावाला कोणता जनगणना सांकेतांक क्रमांक (Census Code) देण्यात यावा हे जमाबंदी आुयक्त आणि संचालक भूमी अभिलेख कार्यालय (म.राज्य) पुणे या कार्यालयाकडून कळविण्यात येईल. त्याप्रमाणे जनगणना सांकेतांक क्रमांक नमुद करुन नविन महसुली गाव तयार करण्यात यावे. त्यानंतर तलाठी लॉगीनने ई-फेरफार आज्ञावलीमधून अनोंदणीकृत फेरफार प्रकारातुन वाडी विभाजनाने हा फेरफार उप प्रकार निवडून वाडी विभाजनाची कार्यवाही पुर्ण करावी. याबाबतचे अध्ययावत User Manual सोबत जोडले आहे. वरीलप्रमाणे ज्या गावांचे वाडी विभाजनाने अथवा साझा निर्मितमध्ये नव्याने निर्माण झालेल्या गावांचे साठी गाव दप्तरी विभाजनाची कार्यवाही करावयाची आहे त्या गावांची नांवे नमुद करुन याबाबतच्या ( अधिसूचनेची प्रत जोडुन ) जनगणना सांकेतांक क्रमांकसाठी आपला प्रस्ताव या कार्यालयाकडे पाठवावा व असा क्रमांक या कार्यालयाकडून दिला गेल्यानंतरच वरीलप्रमाणे पुढील कार्यवाही आपले स्तरावर पुर्ण करण्यात यावी. सदरच्या सुचना सर्व संबंधीतांना देण्यात याव्या ही विनंती. आपला, ( रामदास जगताप ) राज्य समन्वयक, रा.भू.अ.आ.का. जमाबंदी आयुक्त कार्यालय (म.राज्य) पुणे.

Comments

Archive

Contact Form

Send