रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

ई महाभूमी प्रकल्पांतर्गत डिजिटल स्वाक्षरीयुक्त सातबारा जनतेला उपलब्ध करून देणे बाबत मार्गदर्शक सूचना.

वाचा :- 1) शासन परिपत्रक क्रमांक रा.भू.अ./प्र.क्र./80/ल-1 दि. ०७/५/२०१६ 2) या कार्यालयाकडील परिपत्रक क्र.रा.भू.अ.आ.का.4/युनिकोड रुपांतरण/प्र.क्र.15/2012 दि. १५/०३/२०१३ 3) या कार्यालयाकडील परिपत्रक क्र.रा.भू.अ.आ.का.4/चावडी वाचन /प्र.क्र.15/201७ दि. ५/५/२०१७ व दि १६.१०.२०१७ जा.क्र. कक्ष-४/ रा.आ.अ.आ.का./रा.स/३३/२०१८ जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि अभिलेख कार्यालय, महाराष्ट्र राज्य, पुणे १ दिनांक : १२/३/३०१८ मार्गदर्शक सूचना विषय:- ई महाभूमी प्रकल्पांतर्गत डिजिटल स्वाक्षरीयुक्त सातबारा जनतेला उपलब्ध करून देणे बाबत मार्गदर्शक सूचना. राज्यात केंद्र पुरस्कृत डिजीटल इंडिया लँड रेकॉर्ड मॉडर्नायझेशन प्रोग्रॅम (DILRMP) कार्यान्वित असुन त्याअंतर्गत राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र, पुणे यांनी ई-फेरफार आज्ञावली विकसित केली आहे. राज्यातील “ ई-फेरफार ” आज्ञावलीची प्रत्यक्ष अंमलबजावणी यशस्वी करण्यासाठी शासनाचे दिनांक 7/5/2016 चे परिपत्रकान्वये हस्तलिखीत व संगणकीकृत अधिकार अभिलेख तंतोतंत जुळविण्यासाठी “ Edit Module” व त्यानंतर दिनांक ५/५/२०१६ च्या परिपत्रकाप्रमाणे चावडी वाचनाच्या विशेष मोहिमेमध्ये प्राप्त आक्षेप व तपासणीत दिसून आलेल्या त्रुटी दूर करण्यासाठी RE EDIT MODULE उपलब्ध करून दिले होते. या कामात ZERO TOLERANSE TO ERROR हेच तत्व कायम ठेऊन हे काम गुणवत्तापूर्वक पूर्ण झाले असेल अशी अपेक्षा आहे. या कामात गुणवत्ता राखण्यासाठी पालक महसूल अधिकारी ही संकल्पना देखील राबविणेत आली होती, तसेच प्रत्येक स्थरावर तपासणी करणेचा इष्टांक देखील देनेत आला होता .अशा पद्धतीने DATA क्लेनिंग चे काम केल्यानंतर तयार झालेला अचूक ७/१२ व ८अ जनतेला डिजिटल स्वाक्षरीने उपलब्ध करून देण्यासाठी मार्गदर्शक सूचना खालीलप्रमाणे देण्यात येत आहेत. १. DSP–RoR वर काम सुरु करण्यापूर्वी पहिल्यांदा CONTROL PANAL मधून install असलेले Active X REMOVE करावे, तद्नंतर नियमित landing page वरून Active X download करून install करून संगणक RESTART करून तलाठी लोगिन ने काम सुरु करावे. २. चावडी वाचनाची विशेष मोहीम तीन टप्प्यात पूर्ण झाले नंतर तलाठी यांने खाते प्रोसेसिंग चे काम पूर्ण झालेनंतर घोषणापत्र १ केले आहे, पालक महसूल अधिकाऱ्याने १ ते २४ मुद्द्यांची तपासणी केल्यानंतर आणी प्रत्येक तलाठी, मंडळ अधिकारी व महसूल अधिकारी यांनी इष्टांकाप्रमाणे तपासणी करून दिलेले प्रपत्र १ मधील प्रमाणपत्र पाहून नायब तहसीलदार यांनी घोषणापत्र २ दिले असेल व त्यानंतर दिनांक १६/१०/२०१७ मध्ये दिलेल्या सूचना प्रमाणे तपासणी करून १ ते १५ मुद्द्यांची संचिका त्यातील प्रमाणपत्रासह तहसील कार्यालयाच्या अभिलेख कक्षामध्ये किमान १० वर्षे या कालावधीसाठी जतन करून ठेवण्यासाठी प्राप्त झाल्याची खात्री करून तहसीलदार यांनी घोषणापत्र ३ केले असेल त्यामुळे कामाची गुणवत्ता राखली असल्याची खात्री जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त यांचे कार्यालयातील तपासणी पथकाने केली असेल अशी अपेक्षा आहे. ३. अशा पद्धतीने काम पूर्ण झालेल्या तालुक्यांमधील गावनिहाय तालुका समरी अहवाल मधील सर्व १ ते २८ अहवाल निरंक केले आहेत ह्याची खात्री करावी व ODC मधील अतिरिक्त अहवाल क्र.११ (खाता मास्टर मध्ये अतिरिक्त नावे असलेल्या खात्यांची सर्वे क्रमांक निहाय यादी) ओपन करून पहावा व तो ODC च्याच दुरुस्त्यांच्या सुविधा मधील सुविधा क्रमांक १९ (खाता मास्टर वरील अतिरिक्त नावे काढणे) वापरून निरंक करणेत यावा. ४. घोषणापत्र ३ पूर्ण झालेल्या तालुक्यासाठी दिनांक ५/५/२०१७ च्या परिपत्रकात विहित केलेल्या प्रपत्र २ मधील प्रमाणपत्रात संयुक्त स्वाक्षरीचा अहवाल उप विभागीय अधिकारी यांनी जिल्हाधिकारी यांना दिला असेल व अश्या पद्धतीने सर्व तालुक्यांचा प्रपत्र २ मधील अहवाल पाहून जिल्हाधिकारी यांनी प्रपत्र ३ मधील अहवाल जमाबंदी आयुक्त कार्यालयाला पाठवावा व त्याची एक प्रत विभागीय आयुक्तांना सदर करावी. ५. चावडी वाचनाची प्रक्रिया पूर्ण झाली असल्याची खात्री करून तहसीलदार यांनी USER CREATION मधून लॉगीन करून पुनर्लिखित संगणकीकृत सातबारा चे प्रख्यापण करण्याची कार्यवाही पूर्ण करावी . यामुळे यापुढे फक्त चालू नोंदी सह सातबारा दिसुलागेल व कंस केलेल्या सर्व नोंदी फक्त DATA मध्ये असतील. त्यामुळे नियम ६ व ७ प्रमाणे सातबारा प्रख्यापानाची कार्यवाही तहसीलदार यांनी पूर्ण करावी. ६. घोषणापत्र ३ पूर्ण झालेल्या गावातील अचूक संगणकीकृत ७/१२ च्या अचूकते बद्दल तलाठी पुन्हा एकदा हा ७/१२ एक-एक ओपन करून पाहील व अचूक असल्यास कायम (CONFIRM) करील. अशा पद्धतीने कायम केलेल्या ७/१२ पैकी २५/५०/१०० अश्या ग्रुप मध्ये ७/१२ निवडून डिजिटल स्वाक्षरी करील. ७. प्रथमता प्रत्येक ७/१२ अशा पद्धतीने डिजिटल स्वाक्षरी करणे आवश्यक राहील, त्यानंतर प्रत्येक फेरफार मंडळ अधिकाऱ्याने मंजूर/नामंजूर केल्यानंतर परिणाम होणारे सर्व सर्वे नं. तलाठ्याने त्या-त्या वेळी डिजिटल स्वारीत केले पाहिजेत. प्रत्येक हंगामातील पिक पाहणीच्या नोंदी(पीक पेरा) तलाठ्याने भरल्यानंतर तो ७/१२ डिजिटल स्वाक्षरीत करणे आवश्यक राहील. त्याशिवाय तलाठी यांना कोणतेही अन्य काम करता येणार नाही. अश्या पद्धतीने डिजिटल स्वाक्षरी केलेल्या DATA वरुन ७/१२ तयार करून जनतेला महाभूलेख (https://mahabhulekh.maharashtra.gov.in) संकेत स्थळावरून आपले सरकार पोर्टल वरून विहित फी online भरून उपलब्ध होऊ शकतील. असे डिजिटल स्वाक्षरीचे ७/१२ वर एक पडताळणीक्रमांक (Verification I.D.) छापण्यात येईल त्यावरून त्या त्या वेळच्या ७/१२ ची स्थिती संकेतस्थळावरून पडताळून पाहता येईल. ८. गावनिहाय एकूण ७/१२ व डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ संख्या दर्शविणारा MIS प्रत्येक महसूल अधिकाऱ्याला पाहता येईल. ९. ODC अहवाल १ व ३ मध्ये प्रलंबित ७/१२ डिजिटल स्वाक्षरीत करता येणार नाहीत त्यामुळे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम १५५/२५७ प्रमाणे कार्यवाही करून असे सर्व ७/१२ अचूक असतील ह्याची खात्री तहसीलदार व उप विभागीय अधिकारी यांनी करावी. १०. घोषणापत्र-३ पूर्ण झालेल्या सर्व तालुक्यांनी (आज रोजी फक्त १४९ तालुके) गुणवत्तापूर्ण काम केलेले (अचूक ७/१२ व ८अ) प्रथम फक्त एक गाव निवडून २४ तासात या गावात अ) ७/१२ पाहून दिगीतल स्वाक्षरी PDF(DSP- RoR) साठी confirm करणे. आ) confirm ७/१२ वर डिजिटल स्वाक्षरी करणे. इ) डिजिटल स्वाक्षरी झालेल्या सर्व ७/१२ च्या PDF तयार करणे. ११. या तीन टप्यात कार्यवाही करावी. त्यानंतर पुढील गाव निवडून या प्रमाणेच कार्यवाही करावी. तलाठी यांनी संगणकीकृत ७/१२ डिजिटल स्वाक्षरीत करण्यापूर्वी पुन्हा एकदा त्याचे अचूकते बद्दल खात्री करून प्रत्येक ७/१२ कायम ( CONFIRM) करावा व त्यानंतरच डिजिटल स्वाक्षरीत करावा . यानंतर संबंधीत तलाठ्याचे डिजिटल स्वाक्षरीने असा ७/१२ online payment स्वीकारून वितरीत करणेत येणार आहेत . १२. अचूक ७/१२ व ८अ करण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्टा करणाऱ्या तलाठी , मंडळ अधिकारी , डी.बी.ए./नायब तहसीलदार, तहसीलदार व उप विभागीय अधिकाऱ्यांचा यथोचित गौरव करण्यात यावा व त्यांचा वस्तुनिष्ठ कामाची नोंद त्यांचा गोपनीय अहवालात घेणेत यावी. १३. कामाची सुरवात करताना अत्यंत गुणवत्तापूर्ण काम झाले आहे त्या गावाची निवद्कारून कामाची सुरुवात करावी. जनतेला अचूक ७/१२ व ८अ उपलब्द्ध करून देनेच्या या कार्यक्रमात सर्व महसूल अधिकारी व कर्मचारी रात्रंदिवस कष्ट करत आहेत त्या सर्वांचे अभिनंदन. (सोबत USER MANUAL जोडले आहे.) आपला विश्वासू xxx स्वाक्षरी xxx (रामदास जगताप) उपजिल्हाधिकारी तथा राज्य समन्वयक जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि अभिलेख कार्यालय, पुणे प्रत : मा. विभागीय आयुक्त , विभागीय आयुक्त कार्यालय , (सर्व) प्रत : मा. जिल्हाधिकारी (सर्व) प्रत : मा. डिस्ट्रीक्ट डोमेन एक्सपर्ट तथा उप जिल्हाधिकारी (सर्व) प्रत : मा. जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी (DIO )जिल्हा सूचना विज्ञान केंद्र (NIC (सर्व)

Comments

Archive

Contact Form

Send