रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

डिजिटल स्वाक्षरीयुक्त संगणकीकृत ७/१२ देण्यासाठी पूर्वतयारी करणेबाबत मार्गदर्शक सूचना दिनांक १०.३.२०१८

नमस्कार मित्रांनो , डिजिटल स्वाक्षरीयुक्त संगणकीकृत ७/१२ देण्यासाठी पूर्वतयारी करणेबाबत मार्गदर्शक सूचना दिनांक १०.३.२०१८ Re-edit मधील घोषणापत्र ३ पूर्ण झालेल्या तालुक्यांमध्ये पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर डिजिटल स्वाक्षरीयुक्त संगणकीकृत ७/१२ जनतेला उपलब्ध करून देण्याचा शासनाचा मानस आहे त्यासाठी पत्र असलेल्या सुमारे १५० तालुक्यांनी पूर्वतयारी करून ठेवावी . १. प्रपत्र २ मधील अहवाल प्रांताधीकार्यानी जिल्हाधिकारी यांना पाठवावा २. प्रपत्र ३ मधील अहवाल जिल्हाधीकारी यांनी जमाबंदी आयुक्त यांना पाठवावा ३. तहसीलदार यांनी घोषणापत्र ३ साठी आवश्यक १ ते १५ दस्तांची संचिका तालुका अभिलेख कक्ष्यात जमा झाली असल्याची खात्री करावी . ४. डी बी ए यांनी गाव निहाय तालुका समरी अहवाल तहसीलदार यांनासादर करावा ५. ODC अतिरिक्त अहवाल ११ निरंक केला असल्याची खात्री तलाठी यांनी करावी ५. तहसीलदार यांनी user creation मधून संगणकीकृत ७/१२ च्या चावडी वाचनानंतरची ७/१२ प्रख्यापनाची online ऑर्डर काढावी ६. प्रांताधिकारी यांने re edit च्या गुणवत्तापूर्ण कामाची खात्री करावी ७. प्रत्येक तालुक्यातून डिजिटल स्वाक्षरीयुक्त ७/१२ तयार करणेत येणाऱ्या ५ गावांची निवड करावी आपली ही तयारी डी डी ई यांनी केल्याचे प्रमाणपत्र / अहवाल जमाबंदी आयुक्त यांना सोमवारी संध्याकाळ पर्यंत पाठवावा आपला रामदास जगताप

Comments

Archive

Contact Form

Send