ई-फेरफार आज्ञावलीत प्रत्येक फेरफाराची पडताळणी सुची निश्चित करून देण्याबाबत.
कक्ष ४/ रा.अ.अ.आ.का./रा.स. / 32 / २०१८
जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि अभिलेख,
(म.राज्य) पुणे यांचे कार्यालय,3 रा मजला
पुणे, दिनांक 01 /03 /2018.
प्रति,
१. श्री. राजेंद्र खंदारे, निवासी उपजिल्हाधिकारी, उस्मानाबाद
ई-फेरफार विषयतज्ञ उपसमिती प्रमुख
२. श्री. राजेश खवले, उपजिल्हाधिकारी महसुल, अकोला
पिकांची नोंदणी (Crop Module) विषयतज्ञ उपसमिती प्रमुख
३. श्री. शशिकांत मंगरुळे, उपजिल्हाधिकारी, नाशिक
विविध विभाग जोडणे (Linkage) विषयतज्ञ उपसमिती प्रमुख
४. श्री.विकास गजरे, उपविभागिय अधिकारी, पालघर
ई-चावडी व अहवाल विषयतज्ञ उपसमिती प्रमुख
विषय - ई-फेरफार आज्ञावलीत प्रत्येक फेरफाराची पडताळणी सुची निश्चित करून देण्याबाबत.
ई-फेरफार आज्ञावलीत तलाठी यांनी फेरफार घेताना व मंडळ अधिकारी यांना फेरफार प्रमाणित करताना प्रत्येक फेरफारासाठी कोणत्या कायदेशीर बाबी पडताळणी करणे आवश्यक आहे त्या निश्चित करून देणे आवश्यक आहे . सध्या ई-फेरफार आज्ञावलीत खालील फेरफाराचे प्रकार उपलब्ध आहेत. त्यापैकी कोणते फेरफार प्रकार कमी / एकत्र करता येतील ह्याचा विचार करून प्रत्येक फेरफार प्रकारासाठी तलाठी यांनी खात्री करणे आवश्यक बाबी व फेरफार प्रमाणित करताना खात्री करणे आवश्यक असलेल्या बाबी / कागदपत्र आपल्या समिती सदस्या बरोबर चर्चा करून माझे नावे statecordinatormahaferfar@gmail.com या मेलवर दिनांक ५ मार्च २०१८ पर्यंत पाठवावीत ही विनंती
फेरफाराचे प्रकार पडताळणी सुची
1) तारण
2) वापरात बदल
3) बोजा कमी करणे
4) भाडे पट्याने
5) नोटीस ऑफ लिस पेंडन्सी
6) पोट विभाजन
7) घोषणापत्र
8) वारस
9) बक्षीसपत्राने / देणगीने
10) क्षेत्र दुरूस्ती
11) वाडी विभाजन
12) फाळणी बाराने
13) एकत्रिकरन
14) इकरार
15) आदेश व दस्तावेज
फेरफाराचे प्रकार पडताळणी सुची
16) वाटपाने / वाटणीपत्राने
17) मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र
18) बोजा
19) बिनशेती आदेश ( NA)
20) न्यायालय आदेश
21) राजपत्राने नावात बदल
22) आदलाबदलीने
23) भूसंपादन
24) मयताचे नाव कमी करणे
25) अ.पा.क शेरा कमी करणे
26) खरेदी
27) हक्कसोड पत्र / रिलीज डिड
28) स्थावर मालमत्ता जप्ती आदेशाने
29) भुधारणा प्रकारात बदल
30) ए.कु.मॅ नोंद कमी करणे
31) इतर फेरफार
32) पुनर्वसनाबाबत आदेशाने
33) विशेष वसुली अधिकारी यांचे आदेशाने बोजा नोंद
34) खरेदी ( अनोंदणीकृत )
35) गहाण खत
36) बंद ७/१२ आदेशाने सुरु करणे
37) आदेशाने जुन्या खात्यात नाव समाविष्ट करणे
38) सर्व्हे/गट अदलाबदली
39) दुरुस्ती चा आदेश
40) कोर्ट आदेशाने वारस नोंद
41) दुरुस्ती चा आदेश
42) क्षेत्र दुरुस्तीचा आदेश
43) क्षेत्र दुरुस्तीचा आदेश (शेती)
44) विश्वस्त खाते वगळून वारस नोंद
यापैकी कोणते चेक online ठेवता यातील ते देखील नमूद करावे
आपला विश्वासू,
( रामदास जगताप )
राज्य समन्वयक, रा.भू.अ.आ.का.
जमाबंदी आयुक्त कार्यालय (म.राज्य) पुणे.
Comments