रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

मंजुर अभिन्यासाप्रमाणे भूमि अभिलेखामध्ये दुरूस्ती करताना करावयाच्या कार्यवाहीबाबत दि.26.02.2018

नमस्कार मित्रांनो ई फेरफार प्रणाली मध्ये येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी मा. जमाबंदी आयुक्त कार्यालयाकडून बिगरशेती आदेश्या प्रमाणे आठवा मंजुर अभिन्यासाप्रमाणे भूमि अभिलेखामध्ये दुरूस्ती करताना करावयाच्या कार्यवाहीबाबत महत्वाच्या या परिपत्रकात दिल्या आहेत त्या प्रमाणे आपल्या उप विभागातील उप अधीक्षक भूमी अभिलेख व तहसीलदार यांचा योग्य समन्वय करून उप विभागीय अधिकारी यांनी समान कार्यपद्धतीने अभिलेख दुरुस्त करून घेणेत यावेत वाचा:- 1) महाराष्ट्र जमीन महसूल ( महसूली भूमापन व भूमापन क्रमांकाचे उपविभाग ) नियम 1969. 2) जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि अभिलेख (म.राज्य) यांचेकडील परिपत्रक क्र. एसव्हीसीआर 1079. /स 2/1996, दि. 21/09/1996 व पत्र क्र. एसव्हीसीआर 1079/ भू - 3/2003, दि. 24/03/2003. 3) जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि अभिलेख ((म. राज्य ) यांचेकडील परिपत्रक क्रमांक एल आर 1153/ भू. 3/2001, दि. 29/01/2002 व क्र. भू. 3/ अभिलेख दुरूस्ती / विनोक्र. 88/13 दि.27/09/2013 4) जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि अभिलेख (म. राज्य ) यांचेकडील परिपत्रक क्र.नाभू.1 / सामीलीकरण / प्र. क्र. / 2015, दि. 16/05/2015. -------------------------------------------------------------------------------------------------- क्र. भू. 3 / विनोंक्र 317 /2018 जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि अभिलेख,( म. राज्य ) पुणे यांचे कार्यालय पुणे, दिनांक 26/02/2018 विषय :- मंजुर अभिन्यासाप्रमाणे भूमि अभिलेखामध्ये दुरूस्ती करताना करावयाच्या कार्यवाहीबाबत. परिपत्रक नगर रचना विभागाकडुन अभिन्यास तात्पुरत्या स्वरूपात मंजुर केल्यानंतर बिगरशेती आदेशाप्रमाणे भूमि अभिलेख विभागाकडुन अर्जदार यांचे अर्जानुसार जागेवरील सिमांकनानुसार मोजणीची कार्यवाही केली जाते. त्यानंतर नगर रचना विभागाकडुन अभिन्यासास अंतिम मंजुरी देण्यात येते. नगर रचना विभागाने दिलेल्या अंतिम मंजुरी नुसार भूमि अभिलेख विभागाकडून कमी जास्त पत्रक तयार करताना सर्व्हे नंबर / गट नंबर / हिस्सा नंबर नमुद करण्याबाबत एकवाक्यता नसल्यामुळे भूमि अभिलेख व 7/12 संगणकीकरणामध्ये विविध अडचणी निर्माण होत आहेत. त्या अनुषंगाने कमी जास्त पत्रक तयार करताना करावयाच्या कार्यवाहीबाबत खालीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहेत. 1. सक्षम प्राधिकारी यांचेकडुन ब-याच वेळा अनेक सर्व्हे नंबर/ गट नंबर/ हिस्सा नंबर चे एकत्रीकरण करून अभिन्यास मंजुर केला जातो. अशा वेळी विभागातील कार्यालयाकडून सर्व्हे नंबर / गट नंबर / हिस्सा नंबर नमुद करून त्यानंतर प्लॉट नंबर नमुद केले जातात. उदा. गट नं. 2+3+4/5 + 4/ 6 चा प्लॉट नं. 1 ते 50 असे नमुद करून कमी जास्त पत्रक तयार केले जातात. याप्रमाणे नवीन नंबर देण्यात आल्यास त्याचा अंमल संगणकीकृत 7/12 मध्ये घेता येत नाही. कारण संगणकीकृत 7/12 मध्ये + (अधिक) चिन्ह नमुद करून भूमापन क्रमांक नमुद करण्याची सुविधा उपलब्ध नाही. महाराष्ट्र जमीन महसूल ( महसूली भूमापन व भूमापन क्रमांकाचे उपविभाग ) नियम 1969 मधील नियम 11 (3) नुसार भूमापन क्रमांकाचे एकत्रीकरण बाबतची कार्यपद्धती ठरवुन देण्यात आलेली आहे. त्यानुसार सर्व्हे नंबर / गट नंबर / हिस्सा नंबर चे एकत्रीकरण करतेवेळी एकत्रीकरणाच्या क्रमांकाच्या मालिकेतील पहिला क्रमांक द्यावयाचा आहे. त्यामुळे यापुढे कमी जास्त पत्रक तयार करतेवेळी उपरोक्त नमुद केलेप्रमाणे अनेक सर्व्हे नंबर / गट नंबर / हिस्सा नंबर चे एकत्रीकरण होत असल्यास त्या सर्व्हे नंबर / गट नंबर / हिस्सा नंबर मधील पहिला क्रमांक देऊन त्यामध्ये मंजुर रेखांकनानुसार भूखंडाचे क्रमांक दर्शवावे. उदा. गट नं. 2, भूखंड क्रमांक 1 ते 50. 2. त्याचप्रमाणे मंजुर अभिन्यासाप्रमाणे असणारे रस्ते, खुल्या जागा व सुविधा क्षेत्र यास देखील भूखंड क्रमांक देऊन त्यापुढे कमी जास्त पत्रक रकाना क्र. 16 मध्ये मंजुर अभिन्यासामधील रस्ता / खुली जागा / सुविधा क्षेत्र असे स्पष्टपणे नमुद करावे. म्हणजे त्याप्रमाणे योग्य नोंदी संगणकीकृत 7/12 मध्ये घेता येतील. 3. 7/12 संगणकीकरणामध्ये सर्व बिनशेती क्षेत्रासाठी आर. चौ. मी. हे एकक निश्चित करण्यात आलेले आहे. त्यामुळे मंजुर रेखांकन / बिनशेती आदेश कोणत्याही एककामध्ये असला तरी कमी जास्त पत्रक तयार करताना भूखंडाचे क्षेत्र आर. चौ. मी. मध्ये रुपांतरित करुन नमुद करण्यात यावे. उदा. 515.50 चौ. मी. क्षेत्र असल्यास ते 5.15.50 आर चौ.मी. असे नमुद करावे. म्हणजे त्याचा योग्यरित्या अंमल संगणकीकृत आज्ञावलीमध्ये घेता येईल. राज्यामध्ये 7/12 संगणकीकरणाचे काम अंतीम टप्यात असुन यापूर्वी मंजुर केलेल्या कमी जास्त पत्रकाचा अंमल घेण्यात काही तांत्रिक अडचण आल्यास संबंधित तहसिलदार यांचेकडून आवश्यक ती कागदपत्रे व प्रस्ताव प्राप्त करुन घेऊन नियमानुसार दुरुस्त कमी जास्त पत्रक तयार करुन गावी अंमल घेण्यासाठी पाठवावे.त्याचप्रमाणे यापुढे कमी जास्त पत्रक तयार करताना उपरोक्त सूचनांचा काटेकोरपणे विचार करावा. जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख / उप संचालक भूमि अभिलेख यांनी त्यांचे दौ-याचेवेळी उपरोक्तप्रमाणे कार्यवाही होत असल्याची खात्री करावी. सही (एस. चोक्कलिंगम्) जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि अभिलेख,(म.राज्य) पुणे प्रत :- मा.प्रधान सचिव, महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई -32. प्रत :- मा.प्रधान सचिव, नगर विकास विभाग, मंत्रालय मुंबई – 32. प्रत :- सर्व विभागीय आयुक्त. प्रत :- संचालक नगर रचना महाराष्ट्र राज्य. प्रत :- सर्व जिल्हाधिकारी. प्रत :- सर्व आयुक्त, महानगर पालिका ( नगर रचना विभाग ) मुख्याधिकारी, नगरपालिका / नगरपरिषद (नगर रचना विभाग) प्रत :- सर्व उपसंचालक भूमि अभिलेख. प्रत :- सर्व जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख. प्रत :- सर्व तहसिलदार प्रत :- सर्व उप अधीक्षक भूमि अभिलेख/ नगर भूमापन अधिकारी. प्रत :- सर्व कार्यालय अधीक्षक, जमाबंदी आयुक्त, पुणे कार्यालय.   प्रत :- मा.प्रधान सचिव, महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई -32. प्रत :- मा.प्रधान सचिव, नगर विकास विभाग, मंत्रालय मुंबई – 32. प्रत :- सर्व विभागीय आयुक्त. प्रत :- संचालक नगर रचना महाराष्ट्र राज्य. प्रत :- सर्व जिल्हाधिकारी. प्रत :- सर्व आयुक्त, महानगर पालिका ( नगर रचना विभाग ) मुख्याधिकारी, नगरपालिका / नगरपरिषद (नगर रचना विभाग) प्रत :- सर्व उपसंचालक भूमि अभिलेख. प्रत :- सर्व जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख. 2/- आपल्या जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, उप अधीक्षक भूमि अभिलेख / नगर भूमापन अधिकारी तसेच महानगरपालिका/नगरपालिका /नगरपरिषद (नगर रचना विभाग) या सर्व कार्यालयांना सदर परिपत्रकाची प्रत पुरविण्यात यावी. प्रत :- सर्व उपविभागीय अधिकारी प्रत :- सर्व तहसिलदार प्रत :- सर्व उप अधीक्षक भूमि अभिलेख/ नगर भूमापन अधिकारी. प्रत :- सर्व कार्यालय अधीक्षक, जमाबंदी आयुक्त, पुणे कार्यालय.

Comments


  1. प्रति,
    उपअधिक्षक भुमी अभिलेख
    कार्यालय, बार्शी

    अर्जदार :- श्री. संदीप विजय चौधरी मौजे शिराळे ता.बार्शी जि.सोलापुर मो.नं.9922737146

    विषय :- संगणकीकृत गट बुक नकाशा दुरुस्ती करणेबाबत....

    महोदय,
    उपरोक्त विषयास अनुसरून मी संदीप विजय चौधरी मौजे शिराळे विनंती अर्ज करतो की, गट क्रमांक व उपविभाग 404 व गट क्रमांक व उपविभाग 408 मौजे शिराळे येथील हद्दीतील आहेत परंतु दोन्ही गट क्र. वेगवेगळे असुन सुद्धा आॅनलाईन गट बुक नकाशा मध्ये दोन्ही गटाला एकच नंबर दाखवण्यात आला आहे तथापि संगणकीय प्रणाली मध्ये दुरुस्ती करून मिळवी हि विनंती.

    ReplyDelete

Archive

Contact Form

Send