कलम 155 च्या आदेशाने दुरुस्तीच्या सुविधा उपलब्ध करुन देणेबाबत.
दिनांक 31 /03/२०१8.
प्रति
जिल्हाधिकारी,
वाशिम, वर्धा, भंडारा, नागपुर,
बुलडाणा, जळगांव व सांगली
विषय - कलम 155 च्या आदेशाने दुरुस्तीच्या सुविधा उपलब्ध करुन देणेबाबत.
महोदय,
आपले विनंतीप्रमाणे घोषणापत्र-३ पुर्ण झालेल्या ठिकाणी काही काम अपुर्ण राहिले असल्यास अथवा त्रुटी राहीली असल्यास त्या दूर करण्यासाठी तहसिलदार व उपविभागीय अधिकारी यांनी पारीत केलेल्या कलम 155 / 257 अंतर्गतच्या आदेशाप्रमाणे त्रुटी दूर करण्यासाठी खालील सुविधा आपणांस उपलब्ध करुन दिल्या आहेत.
१. कलम 155 च्या आदेशाने खात्यात दुरुस्ती करणे.- याद्वारे खात्यामध्ये जुने नावाला कंस करून त्याच खात्यात नवीन / दुरुस्त केलेले नाव दाखल करता येईल .
२. कलम 155 च्या आदेशाने फेरफार क्रमांक बदलणे.- याद्वारे कोणत्याही खातेदाराच्या नावासमोरील / इतर हक्कातील तपशिला समोरील अथवा इतर फेरफार क्रमांकातील ( history mutation no.) कोणताही फेरफार क्रमांक बदलता येईल .
३. कलम 155 च्या आदेशाने नवीन 7/12 तयार करणे.- एकाच आदेश्याने data entry न केलेले हस्तलिखित ७/१२ ची data entry करून ७/१२ तयार करता येईल .
४. कलम 155 च्या आदेशाने चुकीचे भूधारणा प्रकार बदलणे.- ज्या सर्वे न. वर भोगवटादार वर्ग १ , भोगवटादार वर्ग २ , सरकार व सरकारी पट्टेदार या शिवाय अन्य भूधारणा पद्धती निवडली असल्यास ती बदलून या पैकी एक करता येईल .
या सुविधा वापरण्यासाठी प्रथम तलाठयाने डाटा एन्ट्री करणे आवश्यक आहे. त्यासाठी आपल्या जिल्हयाच्या नियमित URL च्या पुढे eferfar2beta_test_( आपल्या जिल्हयाचे नांव ) ही URL वापरावी. त्यानंतर तलाठयाने सुचविलेल्या दुरुस्त्यांसाठी तहसिलदार यांनी user creation module मधुन Biometric module मधुन मान्यता द्यावी. त्या साठी तहसिलदार यांनी usercreation_test ही url वापरावी.
त्यानंतर फेरफार तयार करावे व प्रमाणित करणेसाठी देखील पुढे eferfar2beta_test_( आपल्या जिल्हयाचे नांव ) ही URL वापरुन कामकाज करावे. त्याबाबतचे user monual यापूर्वीच आपणांस पाठविण्यात आले आहे.
वरील सुविधांचा वापर करुन अचूक 7/12 व अचूक 8 अ तयार झाल्याची खात्री तलाठयाने करावी व त्यानंतर DSP-RoR या module चा वापर करुन डिजीटल स्वाक्षरीने 7/12 तयार करावा.
सदरच्या सुचना सर्व संबंधितांच्या नजरेस आणाव्यात ही विनंती
आपला,
( रामदास जगताप )
राज्य समन्वयक, रा.भू.अ.आ.का.
जमाबंदी आयुक्त कार्यालय (म.राज्य) पुणे.
प्रत --- उप जिल्हाधिकारी तथा डी डी ई ./उप विभागीय अधिकारी / तहसीलदार --
भंडारा , वाशीम , वर्धा ., नागपूर , जलगाव ,बुलढाणा , सांगली
Sir this is adv.Pawar, from Nashik, after reading your blog for 155 section under MLRC, i have one unresoved query Kindly provide me proper solution :
ReplyDeleteThere is one mortgage mutation entry no.2881 in the other rights colomn of my 7/12, said entry is old entry for the year 1937, it is not connected to my property, the property under the mortgage deed of this entry has not connected to our property, the property involved in the mortgage entry is different , we tried to correct it under 155 of MLRC requested to Hon'ble Tahasildar,through all the means but no one take proper action to shift it or correct it.
My Email Id: Subhadralegal@gmail.com
8380008875
Kindly guide me sir.
खरेदी च्या फेराने कटलेले क्षेत्र हे इतर हक्कात लावण्यात आलेले आहे. आणि ते सातबारा उताऱ्यावर त्याच नावाने तेच क्षेत्र मालकी हक्कात कमी लावण्यात आले. परंतु मूळ मालकाचे क्षेत्र वाढवले गेले नाही. आणि ते पुन्हा १५५ chya आदेशानुसार ते आमच्या परवानगी शिवाय कमी केले. ते पुन्हा पूर्ववत करण्यासाठी महीती सांगा.
ReplyDeleteखरेदी च्या फेराने कटलेले क्षेत्र हे इतर हक्कात लावण्यात आलेले आहे. आणि ते सातबारा उताऱ्यावर त्याच नावाने तेच क्षेत्र मालकी हक्कात कमी लावण्यात आले. परंतु मूळ मालकाचे क्षेत्र वाढवले गेले नाही. आणि ते पुन्हा १५५ chya आदेशानुसार ते आमच्या परवानगी शिवाय कमी केले. ते पुन्हा पूर्ववत करण्यासाठी महीती सांगा.
ReplyDeleteनमस्कार साहेब,
ReplyDeleteगाव: येताला तालुका: धर्माबाद, जिल्हा नांदेड येथील गट क्रमांक :५३३ मध्ये २०१८ साळी भोगवटादार रकान्यात ' व्यंकटेश देवस्थान ' असे नोंदविले आहे. जे चुकीचे असून ' अग्निहोत्र देवस्थान ' असणे अभिप्रेत आहे. परंतु कलम १५५ MLRC अंतर्गत आदेश होवून सुद्धा तलाठी, तहसीलदार नोंद घेत नसतील तर काय करावे?