१ एप्रिल २०१८ पासून पुनर्लिखित संगणकीकृत ७/१२ साठी तहसीलदार यांनी प्रख्यापण आदेश काढणे बाबत
नमस्कार मित्रांनो ,
आपण सर्वांनी प्रयत्नांची पराकाष्टा करून व अहोरात्र अनेक तांत्रिक अडचणींवर मात करून १००% घोषणापत्र ३ पूर्ण केलेल्या तालुक्यातील तहसीलदार व तलाठी मंडळ अधिकाऱ्यासह नायब तहसीलदार यांचे मनपूर्वक हार्दिक अभिनंदन . यांच्यासाठी महत्वाच्या सुचना----
सध्या उपलब्ध असलेल्या ७/१२ मध्ये सन २००२-०३ पासून झालेल्या नोंदी व त्यानंतर online कामकाजात अनेक तृटी काढून टाकण्यासाठी odu / edit / re edit मध्ये अनेक फेरफार घेनेत आले आहेत
त्याच बरोबर आपण घेतलेल्या चावडी वाचन मोहिमे नंतर प्रत्येक गावातील ठरवून दिलेल्या बिंदू चे ७/१२ आपण तपासणी केले आहेत व त्या प्रत्येक ७/१२ वर नाव व पदनाम टाकून सही केली आहे . आता १/४/२०१८ पासून हा पुनर्लिखित अचूक ७/१२ जनतेला उपलब्ध व्हावा म्हणून १०० % काम पूर्ण झालेल्या तहसीलदार यांनी user creation मधून प्रख्यापण आदेश काढावा त्यावेळी आपल्या तालुक्यातील महसूल गावांची संख्या अचूक नमूद करावी . अशा प्रख्यापण आदेश्याची स्वाक्षरीत एक प्रत संबंधित डी डी ई यांनी जमाबंदी आयुक्त कार्यालयाकडे / हेल्प डेस्क व मला माझ्या ई मेल वर (statecordinatormahaferfar@gmail.com) उद्या दिनांक २/४/२०१८ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत पाठवावी ही विनंती
रामदास जगताप
उप जिल्हाधिकारी तथा राज्य समन्वयक
Comments