एकाचवेळी वेगवेगळ्या युटीलिटी मध्ये फेरफार घेतल्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत मार्गदर्शक सूचना.
जमाबंदी आयुक्त तथा संचालक
भूमी अभिलेख महाराष्ट्र
राज्य पुणे यांचे कार्यालय
ई-फेरफार/क्र/रा.स./कावि/ 31/ /२०१8
दिनांक : २३/२/२०१८
प्रति
उपजिल्हाधिकारी तथा डी. डी. ई. ( सर्व.)
विषय - एकाचवेळी वेगवेगळ्या युटीलिटी मध्ये फेरफार घेतल्यामुळे
निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत मार्गदर्शक सूचना.
महोदय,
अनेक वेळा अचूक ७/१२ व ८ अ तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या विविध सुविधा ( ODU / EDIT / RE-EDIT / E-FERFAR ) फेरफार घेतले जातात. काही ठिकाणी एका सुविधेमधून फेरफार घेताना अन्य सुविधेतील फेरफार प्रलंबित आहे का ? ते पहिले जात नाही व अन्य सुविधेतून त्याच ७/१२ फेरफार घेऊन प्रमाणित केला जातो अश्या वेळी अगोदरच्या सुविधेतून घेतलेला फेरफार प्रमाणित करता येत नाही अथवा प्रमाणित केला तरीही त्याचा योग्य रित्या अंमल होत नाही. अश्या विविध घटनाक्रमामध्ये कार्यपद्धती कशी असावी या संधर्भात खालील प्रमाणे मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत.
घटनाक्रम -१
ई-फेरफार मध्ये प्रथम फेरफार घेतल्या नंतर तो प्रमाणित न करताच एडीट / री एडीट आज्ञावली मध्ये सदर सर्वे नंबरवर फेरफार घेनेत आला परंतु प्रमाणित करण्यात आला नाही. त्यानंतर ई-फेरफार मध्ये प्रथम घेण्यात आलेला फेरफार प्रमाणित केला. त्यानंतर EDIT / RE-EDIT घेण्यात आलेला फेरफार प्रमाणित केला.
घटनाक्रम -२
EDIT / RE-EDIT मध्ये प्रथम फेरफार घेतल्या नंतर तो प्रमाणित न करताच ई-फेरफार आज्ञावली मध्ये सदर सर्वे नंबरवर फेरफार घेऊन प्रमाणित करण्यात आला. त्यानंतर EDIT / RE-EDIT घेण्यात आलेला फेरफार प्रमाणित केला.
घटनाक्रम -३
ई-फेरफार मध्ये प्रथम फेरफार घेतल्या नंतर तो प्रमाणित न करताच एडीट / री एडीट आज्ञावली मध्ये सदर सर्वे नंबरवर फेरफार घेऊन प्रमाणित करण्यात आला. त्यानंतर ई-फेरफार मध्ये प्रथम घेण्यात आलेला फेरफार प्रमाणित केला.
या सर्व प्रक्रीयेमधे एडीट / री एडीट मधील फेरफार प्रठव मंजूर करणेत यावा कारण त्याद्वारे मोठ्या प्रमाणात दुरुस्त्या ७/१२ मध्ये केल्या जातात . या पुढे फेरफार प्रमाणित करताना विशेष दक्षता घेनेत यावी व मंडळ अधिकारी यांनी ७/१२ चे पूर्वावलोकन पहिल्या शिवाय फेरफार प्रमाणित करू नयेत .
घटनाक्रम -१ व घटनाक्रम -२ करिता अनुसरायची कार्यपद्धती.
१. ई-फेरफार आज्ञावली मध्ये मंडळ अधिकारी फेरफार मंजूर करीत असतान एडीट / री एडीट आज्ञावली मध्ये प्रलंबित फेरफार आहे तो प्रथम मंडळ अधिकारी यांनी प्रमाणित करावा असा अलर्ट MESSAGE येईल. त्यामुळे मंडळ अधिकारी यांनी प्रथम एडीट / री एडीट आज्ञावली मध्ये फेरफार प्रमाणित करणे आवश्यक आहे.
२. त्यानंतर ई-फेरफार आज्ञावली मध्ये जाऊन तेथे घेण्यात आलेला फेरफार प्रमाणित करणे आवश्यक आहे. ई-फेरफार आज्ञावली मध्ये फेरफार प्रमाणित करत असताना “सदर सर्वे नंबरवर एडीट / री एडीट आज्ञावली मध्ये फेरफार घेऊन प्रमाणित करण्यात आला आहे करिता सदर फेरफार RE-ENTRY करिता तलाठी LOGIN ला ई-फेरफार आज्ञावली मध्ये पाठविणे आवश्यक आहे ”असा अलर्ट MESSAGE येईल.
३. तदनंतर तलाठी फेरफार निवडा करेल तेथे त्यांना प्रथम पूर्वावलोकन पहा असा ALERT MESSAGE येईल.पूर्वावलोकन OK असल्यास तलाठी PREVIEW मध्ये OK COMMENT देईल आणि सदर फेरफार प्रमाणित करण्यासाठी मंडळ अधिकारी यांच्या LOGIN ला पाठवेल व तो मंडळ अधिकारी प्रमाणित करतील .
PREVIEW बरोबर नसल्यास तलाठी सादर फेरफाराची REENTRY घेतील आणि पुन्हा PREVIEW बघतील.PREVIE OK असल्यास तलाठी PREVIEW मध्ये OK COMMENT देईल आणि सदर फेरफार प्रमाणित करण्यासाठी मंडळ अधिकारी यांच्या LOGIN ला पाठवेल.REENTY करूनही PREVIEW बरोबर नसल्यास तलाठी PREIVEW NOT OK अशी COMMENT देईल व सदर फेरफार नामंजुरी करिता निवडेल.आता सदर फेरफार हा COMPULASARY मंडळ अधिकारी यांच्या LOGIN ला नामंजुरी करिता जाईल.सदर फेरफार मंडळ अधिकारी यांनी नामंजुर च करावा लागेल त्या नंतर तलाठी कलम १५५ च्या आदेशाने तांत्रिक दोष दूर करण्यासाठी चा प्रस्थाव तहसीलदार यांना पाठवून कलम १५५ खालील आदेश प्राप्त करून घेईल व त्या प्रमाणे नवीन फेरफार घेवून मंजुरी साठी मंडळ अधिकार्यांकडे पाठउ शकतील.
घटनाक्रम -3
सदर घटनाक्रमामध्ये एडीट / री एडीट आज्ञावली मध्ये फेरफार प्रमाणित करण्यात आला असल्यामुळे व त्यानंतर ई फेरफार मधील फेरफार देखील प्रमाणित झाला असल्याने एडीट / री एडीट च्या फेरफाराचा अंमल देखील नसत झाला असेल किंवा त्यात बदल झाला असेल त्यामुळे याबाबतीत वापरकर्त्यांनी घटनाक्रम -१ व घटनाक्रम -२ मधील मुद्दा क्रमांक २ आणि ३ वापरावा .
ही सर्व कार्यपद्धती समजून घेणे आवश्यक आहे त्यासाठी चे document सोबत जोडले आहे . कोणत्याही ठिकाणी तलाठ्याने आपल्या सहाय्यकाच्या मदतीने काम करताना विशेष काळजी घ्यावी . ही संपूर्ण कार्य पद्धती सर्व महसूल अधिकारी , तलाठी व मंडळ अधिकारी यांने अचूकरीत्या समजून घ्यावी .
आपला विश्वासू ,
( रामदास जगताप )
राज्य समन्वयक, रा.भू.अ.आ.का.
जमाबंदी आयुक्त कार्यालय (म.राज्य) पुणे.
प्रत,
उप विभागीय अधिकारी ( सर्व )
तहसीलदार ( सर्व )
वरील प्रमाणे फेरफार प्रमाणित करताना करावयाची कार्यपद्धती समजून घ्यावी व सर्व तलाठी मंडळ अधिकारी यांना समजून सांगावी . या पुढे अयोग्य रित्या फेरफार प्रमाणित होणार नाहीत याची खात्री तलाठी दप्तर तपासणी चे वेळी करणेत यावी
Comments