महाराष्ट्र जमीन महसूल बहुमजली इमारतीमधील सदनिकांचे अधिकार अभिलेख आणि नोंदवह्या (तयार करणे व सुस्थितीत ठेवणे) प्रारुप नियम, 2015
DRAFT RULES 9 ( फक्त सूचना मागविण्यासाठी )
महाराष्ट्र जमीन महसूल बहुमजली इमारतीमधील सदनिकांचे अधिकार अभिलेख आणि नोंदवह्या
(तयार करणे व सुस्थितीत ठेवणे) प्रारुप नियम, 2015
1. संक्षिप्त नाव - या नियमास महाराष्ट्र जमीन महसूल सदनिकांचे अधिकार अभिलेख आणि
नोंदवह्या (तयार करणे व सुस्थितीत ठेवणे) नियम 2015 असे म्हणता येईल.
२. व्याख्या -
(1) संदर्भानुसार दुसरा अर्थ अपेक्षित नसेल तर, या नियमात-
“ सदनिका” याचा अर्थ (महाराष्ट्र मालकी हक्काच्या सदनिकाबाबत (त्याबाबत
प्रोत्साहन देणे त्यांचे विक्री व्यवस्थापन व हस्तांतरण यांचे नियमन करणेबाबत)
अधिनियम 1963 मधील कलम (2) मध्ये नमूद केल्याप्रमाणे असे.
(अ) “ प्रमाणन अधिकारी ” म्हणजे कलम 150, पोट कलम (6) अन्वये
फेरफाराच्या नोंदवहीतील नोंदी प्रमाणित करण्यास सक्षम असलेला महसूल किंवा
भूमापन अधिकारी,
(आ) “ अधिनियम ” म्हणजे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, 1966.
(इ) “ नमुना ” म्हणजे या नियमास जोडलेला नमुना.
(ई) “ कलम ” म्हणजे महसूल अधिनियमाचे कलम.
(2) अधिनियमात वापरलेले आणि या नियमात व्याख्या न केलेले शब्द आणि शब्दप्रयोग
याचा अर्थ अधिनियमान्वये त्यांना अनुक्रमे जो अर्थ नेमुन दिलेला असेल तोच असेल.
३. हे नियम महाराष्ट्र जमिन महसूल अधिकार अभिलेख आणि नोंदवह्या ( तयार करणे व
सुस्थितीत ठेवणे ) नियम, 1971 चे नियमास पुरक असतील व ज्या ठिकाणी आवश्यक असेल
तेथे या नियमातील तरतुदी लागू होतील.
४. हे नियम महाराष्ट्र राज्यातील नगर भूमापन क्षेत्रातील रितसर सक्षम प्राधिका-याची परवानगी
घेवून बांधलेल्या सदनिकांना तसेच बांधकामासाठी परवानगीची आवश्यकता नसलेल्या
सदनिकांना लागू होतील.
5 अ. नगर भूमापन झालेल्या क्षेत्रात प्रत्येक मिळकतीतील बांधीव इमारतीतील प्रत्येक सदनिकेचा
अधिकार अभिलेख हा पुरवणी मिळकत पत्रिकेच्या सोबत विहित केलेल्या ड(1) नमुन्यात
ठेवण्यात येईल.
पुरवणी मालमत्ता पत्रकाचा नमुना ड(1)मध्ये विहीत केल्याप्रमाणे असेल.
ब) नगर भूमापन क्षेत्राव्यतिरिक्त उर्वरित क्षेत्रात हा अधिकार अभिलेख
सोबत विहित केलेल्या 1अ नमुन्यात ठेवण्यात येईल.
पुरवणी अधिकार अभिलेखाचा नमुना 1 अ मध्ये विहीत केल्याप्रमाणे असेल.
6. सदनिकांचे अधिकार अभिलेख तयार करण्याची जबाबदारी कलम 126 अन्वये भूमापन
झालेल्या क्षेत्रात सबंधित भूमापन अधिकारी / नगर भूमापन अधिकारी यांची असेल.
7.सदनिकांचे अधिकार अभिलेख तयार करणेकामी अर्ज देण्याची जबाबदारी
सबंधित धारक / प्रवर्तक / विकसक अथवा सहकारी संस्थेचा प्रवर्तक / अध्यक्ष /सचिव
हे सदनिकेची विक्री किंवा वापर सुरु यापैकी जे अगोदर घडेल तेव्हापासून तीन महिन्याच्या
आत भूमि अभिलेख कार्यालयास अर्जाने सदनिकेची नोंद घेवून पुरवणी मिळकत पत्रिका
तयार करण्यासाठी कळवील. हे नियम लागू होण्यापूर्वी अस्तित्वात असलेल्या इमारतींच्या
बाबतीत देखील हे नियम अंमलात आलेपासून वरील हितसंबंधी हे तीन महिन्याच्या
आत सदनिकानिहाय नोंदी घेवून पुरवणी मिळकत पत्रिका तयार करणेसाठी अर्ज करेल.
परंतु, असा अर्ज केला नाही तर अस्तित्वात असलेल्या इमारतींबाबत भूमि अभिलेख
विभाग नगरपालिका /महानगरपालिकेचा मालमत्ता विभाग व सहकारी संस्थेचे संबंधित
कार्यक्षेत्रातील सहाय्यक /उपनिबंधक यांचे समितीने संयुक्तरित्या निर्णय घेवून भूमापन
अधिकारी याने नियमाप्रमाणे पुढील कार्यवाही करावी व यासाठीचा होणारा खर्च संस्था/
इमारत धारकांकडून वसूल करतील.
8. सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या सदनिका धारक सभासद यांच्या नोंदी अधिकार अभिलेखात
इतर हक्क सदरी घेण्यास सहकारी संस्थेला भाग पाडण्याची जबाबदारी ही संबंधित
उप/सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांची राहील व अशा प्रकरणी संबंधित अधिकारी हे
सहकार कायदयानुसार कारवाई करण्यास सक्षम असेल.
दुय्यम निबंधक यांनी नगर भूमापन क्षेत्रातील सदनिकांच्या क्षेत्रातील अधिकार
अभिलेखाच्या पुरवणी मिळकत पत्रिका यावरील नोंदीच्या आधारे दस्त नोंदविण्याबाबतची
कार्यवाही करेल.
9. सदनिकांचे अधिकार अभिलेख ठेवण्याची कार्यपद्धती -
(१) महाराष्ट्र मालकी हक्काच्या सदनिकांबाबत ( त्या बांधण्यास प्रोत्साहन देणेस, त्याची
विक्री,व्यवस्थापन व हस्तांतरण यांचे नियमन करण्याबाबत ) अधिनियम 1963,
महाराष्ट्र वेश्म मालकी अधिनियम 1970 अन्वये बांधण्यात आलेल्या सदनिकांबाबत व
इतर इसमांनी बांधलेल्या सदनिका इमारतींबाबत नोंदीसाठी अर्जासोबत सादर
करावयाची कागदपत्रे
नोंदणीकृत घोषणापत्र/स्वयंघोषणापत्र(Deed of Declaration)/Self Declaration सह
इमारतीचा भोगवटा / पूर्णत्वाचा दाखला.
(२) सहकारी गृहनिर्माण संस्थेने बांधलेल्या सदनिकांबाबत वर पोटनियम 1(1)मध्ये नमूद केलेल्या कागदपत्राशिवाय
i) सहकारी संस्थेकडील नोंदणी प्रमाणपत्र.
ii) सहकारी गृहनिर्माण संस्थेचे सदनिका वाटप प्रमाणपत्रासह अभिहस्तांतरणाचे
नोंदणीकृत दस्त.
iii) ज्याठिकाणी मानीव हस्तांतरण (Deemed convenience) केले असेल अथवा
विकसकाने बांधलेली मिळकत फ्लॅट धारकांना हस्तांतरीत केली असेल ती अनुषंगिक
कागदपत्रे.
(३) शासन अंगीकृत उपक्रमांतर्गत बांधलेल्या सदनिकांबाबत वर पोटनियम 1(1) मध्ये नमूद
केलेल्या कागदपत्राशिवाय.
i) सक्षम प्राधिकारी यांचेकडील सदनिका वाटप आदेश/नोंदणीकृत हस्तांतरण दस्त.
(4) या नियमांतर्गत सदनिकेची नोंद मिळकत पत्रिकेवर घेताना मंजुर नकाशा व नोंदणीकृत
घोषणापत्र यानुसार इमारतीत एकूण सदनिका त्यांचे चटई क्षेत्र (Carpet area)
(चौ.मी.मध्ये)अविभक्त हिस्सा सामाईक वापरण्याच्या जागा (जसे, जिना, उद्वाहक,
सदनिकेसमोरील मोकळी जागा, गच्ची व वाहनतळाची जागा , इ.) / याबाबतची नोंद
नगर भूमापन हद्दीमध्ये मिळकत पत्रिकेवर घेण्यात यावी. परंतु, यातील
सामाईक/सार्वजनिक जागा अहस्तांतरणीय असतील.
i) प्रत्येक सदनिकानिहाय अधिकार अभिलेख तयार करताना नगर भूमापन हद्दीमध्ये
सदनिकानिहाय स्वतंत्र पुरवणी मिळकत पत्रिका यासोबत विहित केलेल्या नमुना
1 ड मध्ये ठेवण्यात येईल. तर इतर क्षेत्रात ही नोंद यासोबत विहीत केलेल्या
नमुना 1 अ मध्ये ठेवण्यात येईल.
ii) प्रत्येक विकसक , बांधकाम व्यावसायिक ,मालक यांना बांधण्यात येणा-या
मिळकतीचा आराखडा मंजूर झाल्यानंतर प्रत्येक सदनिकेस भूमि अभिलेख
विभागाकडून सदर सदनिकेची विक्री / वाटप करणेपूर्वी व्हर्चुअल (आभासी)
क्रमांक प्राप्त करुन घेणे आवश्यक आहे.
iii) भूमि अभिलेख विभागाने बांधकाम नियमानुसार वाहनतळाचे जागेला व्हर्चुअल
(आभासी) नंबर देताना जमिनीवरील मजल्यांना पी-1, पी-2,------पी-10
अशाप्रमाणे क्रमांक दयावेत तर जमिनीखालील क्रमांकाला p(-1),p(-2) असे
क्रमांक दयावेत. सदनिकांना क्रमांक देताना घडयाळाचे काटयाच्या दिशेने
पासून सुरु करुन क्रमांक दयावा. पहिल्या मजल्यासाठी 101 पासून , दुस-या
मजल्यासाठी 201 पासून अशाप्रमाणे क्रमांक दयावेत. मजल्याप्रमाणे चढत्या
क्रमांकाने क्रमांक देणेची कार्यवाही करावी.
iv) सदनिकेचे अधिकार अभिलेख तयार करणेपूर्वी मंजूर आराखड्यानुसार
बांधलेल्या इमारतीचे जुन्या नकाशात बांधकाम बसविणे आवश्यक राहील. त्यात
इमारतीचे मजलेही नमूद करण्यात यावेत. मात्र इमारत धारकांनी नवीन मोजणी
नकाशाची मागणी केलेस रितसर भूमापन फी जमा करुन घेवून मोजणी करुन
अद्ययावत नकाशे बसवावेत.
v) ज्या जमिनीवर इमारत बांधलेली आहे त्याबाबतचे मंजूर आराखड्यानुसार
विहित कार्यपद्धतीने मोजणी केल्यानंतर मिळकतीतील सर्व बांधकाम दर्शवून
नकाशा अद्ययावत करेल व त्यानुसार दुरूस्ती अभिलेख अद्ययावत करण्यात
येईल.
vi) सदनिका धारकाने सदनिका घेणेसाठी घेतलेल्या प्रथम कर्जाची नोंद ही पुरवणी
मिळकत पत्रिकेवरील इतर भार सदरी कर्ज मुदत दिनांकासह घेणेत यावी.
तसेच याठिकाणी नोंदविलेली कर्जाची नोंद जर कर्ज संस्थेने कर्जाची मुदत
संपल्यानंतर काहीही कळविले नाही, तर त्यानंतरच्या 90 दिवसांत स्वत:हून
कमी करण्याची कार्यवाही सुरु करण्यात येईल.मात्र याबाबत संबंधित संस्थेला
नोटीसा देणे बंधनकारक असेल.
vii) ज्या इमारतींचे पुनर्निर्माण / पुनर्विकास केला जाईल त्याठिकाणी मुळ मिळकत
पत्रिका सोडून संबंधित पुरवणी मिळकत पत्रिका जुन्या इमारती पाडण्यात
आल्यानंतर संपूर्णपणे रद्द केल्या जातील व त्याठिकाणी नवीन इमारत
आराखडा मंजूर झालेनंतर विहित कार्यपध्दतीनुसार नवीन पुरवणी मिळकत
पत्रिका उघडण्यात येतील.
viii) सामिलीकरण /पोटहिस्सा होणा-या मिळकतीवर चटईक्षेत्र किती प्रमाणात
वापरले आहे याची नोंद घेणेत यावी.
ix) शासकीय, देवस्थान, सार्वजनिक विश्वस्त व तत्सम जमिनीवरील सदनिकांची
नोंद घेताना त्याबाबत अस्तित्वात असलेल्या कायदेशीर तरतुदीचे पालन करून
कार्यवाही करण्यात येईल. तसेच ज्या संस्थांनी सदनिका कायद्यातील/
नियमातील तरतूदीनुसार भाडेपट्याने (30 वर्ष, 99 वर्ष, निरंतर) दिलेल्या
असल्यास सदर संस्थांची नोंद मुळ धारकाच्या नावासह भाडेपट्टेदाराची
नोंद सदनिकेच्या पुरवणी मिळकत पत्रिका/पुरवणी नमुना 1अ /1ड मध्ये करावी.
x) जर एका पेक्षा जास्त भूमापन क्रमांक/गट क्रमांक/नगर भूमापन क्रमांक/हिस्सा
क्रमांक/प्लॉट क्रमांक यांचे सामीलीकरण करुन इमारत आराखडा मंजूर झालेला
असल्यास विहित कार्यपध्दतीनुसार सामीलीकरण करुन वरीलप्रमाणे कार्यवाही
करेल.
10. या नियमानुसार तयार होणारा पुरवणी अभिलेख (पुरवणी मिळकत पत्रिका व पुरवणी
सातबारा) हे मुळ मिळकत पत्रिका /मुळ सातबारासह वाचणेत यावे. मुळ मिळकत पत्रिका /मुळ
सातबाराशिवाय सदर पुरवणी मिळकतपत्रिका/पुरवणी सातबारा अवैध असेल.(Invalid)
11. सदनिकांच्या अधिकार अभिलेख तयार करण्याकरीता सुरुवातीला प्रत्येक सदनिकानिहाय
रुपये 1000/- इतकी फी आकारली जाईल व तदनंतर जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि
अभिलेख (म.राज्य), पुणे हे वेळोवेळी अधिसूचनेव्दारे निश्चित करतील त्याप्रमाणे प्रत्येक
सदनिकेकरीता फी आकारणी करतील व ती शासकीय फी जमिन महसूलाची थकबाकी म्हणून
वसूल करता येईल.
12. शास्ती - जो कोणताही इसम विहित केलेल्या मुदतीत सदनिकांचे अधिकार अभिलेख तयार
करणेकामी आवश्यक असलेले प्रतिवृत्त देण्यास किंवा आवश्यक असलेली माहिती
पुरविण्यास किंवा दस्ताऐवज सादर करण्यास कसूर/हयगय करेल अशा
इमारतीबाबत व्यक्ती/संस्था यांचेविरुध्द संबंधित नियमान्वये कारवाई करण्यात येईल.
१3. या नियमान्वये कार्यवाही करताना जेथे आवश्यक असेल तेथे महाराष्ट्र जमिन महसूल अधिकार
अभिलेख आणि नोंदवह्या( तयार करणे व सुस्थितीत ठेवणे ) नियम, 1971 या नियमातील
तरतुदी लागू होतील.
का.अ.ना.भू.1 उ.सं.भू.अ.संलग्न जमाबंदी आयुक्त, पुणे.
ज.आ.(ना.भू.)पुणे
विशेष सूचना --
या प्रारूप नियमामध्ये काही सुधारणा आवश्यक वाटत असतील तर सुचवाव्यात
नमुना ड 1
(महाराष्ट्र जमिन महसूल (नगर भूमापन ) नियम 1969 मधील नियम 7 पहा आणि
महाराष्ट्र जमीन महसूल सदनिकांचे अधिकार अभिलेख आणि नोंदवह्या (तयार करणे व सुस्थितीत ठेवणे) नियम, 2015 मधील नियम 5अ
पुरवणी मालमत्ता पत्रक
मूळ मिळकतपत्रिकेसोबत वाचण्यात यावे
मूळ मिळकतपत्रिके शिवाय अग्राहय
जिल्हा तालुका/कार्यालय गांव / नगर/ प्रभाग/ पेठ शासनाला दिलेल्या आकारणीचा किंवा भाडयाचा तपशील व त्यांच्या फेरतपासणीची नियत वेळ
नगर भूमापन क्रमांक इमारत क्रमांक मजला क्रमांक
सदनिका क्रमांक सदनिकेचे क्षेत्र
(चौ.मी.) विशिष्ट ओळख क्रमांक
सुविधाकार
हक्काचा मूळ धारक
पट्टेदार
इतर भार
इतर शेरे
दिनांक व्यवहार खंड क्रमांक नविन धारक (H) पट्टेदार (L) किंवा भार (E)
(असल्यास आधार क्रमांकासह) साक्षांकन
नमुना 1अ
(महाराष्ट्र जमिन महसूल अधिकार अभिलेख आणि नोंदवह्या (तयार करणे व सुस्थितीत ठेवणे ) नियम 1971 मधील नियम 3,5,6 व 7 पहा) आणि
महाराष्ट्र जमीन महसूल सदनिकांचे अधिकार अभिलेख आणि नोंदवह्या (तयार करणे व सुस्थितीत ठेवणे) नियम, 2015 मधील नियम 5ब
पुरवणी अधिकार अभिलेख
मूळ अधिकार अभिलेखासोबत वाचण्यात यावे
मूळ अधिकार अभिलेखा शिवाय अग्राहय
गाव -------------------- तालुका -------------------- जिल्हा -----------------------
भूमापन क्रमांक भूमापन क्रमांकाचा उपविभाग भू-धारणाप्रकार सदनिका धारकाचे नाव
(असल्यास आधार क्रमांकासह) खाते क्रमांक
1 2 3 4 5
इतर अधिकार
इमारत क्रमांक मजला क्रमांक सदनिका क्रमांक
सदनिकेचे क्षेत्र (चौ.मी.)
विशिष्ट ओळख क्रमांक
Comments