रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

नागपूर विभागातील घोषणापत्र ३ झालेल्या गावातील शिल्लक कामाबाबत .....

मित्रांनो नमस्कार मी स्वता जमाबंदी आयुक्त कार्यालयातील पथकासह १६ जाने रोजी-गडचिरोली , १७ जाने -रोजी चंद्रपूर जिल्हा , १८ जाने- रोजी वर्धा जिल्हा व २० जाने रोजी नागपूर जिल्ह्यातील घोषणापत्र ३ पूर्ण झालेल्या गावातील झालेल्या कामाची तपासणी केली . त्या मध्ये प्रामुख्याने खालील बाबींवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे . १. नागपूर विभागात सन २००२ मध्ये संगणकीकरण करताना घेतलेले मानीव ( DUMMY / IMAGINARY ) फेरफार क्रमांक एडीट / री एडीट मध्ये बदलून खरे फेरफार क्रमांक टाकलेले नाहीत . त्यामुळे अनेक हस्तलिखित ७/१२ वर नसलेले फेरफार क्रमांक ONLINE ७/१२ वर आले आहेत तर अनेक आवश्यक फेरफार घेनेत आलेले नाहीत त्यामुळे अश्या ७/१२ ची मागिल हिस्ट्री काढणे अशक्य होणार आहे . २. सन १९७८-७९ पासून अधिकार अभिलेख बंद होऊन ७/१२ अस्तित्वात आल्या पासूनचे सर्व फेरफार क्रमांक संगणकीकृत ७/१२ वर येणे आवश्यक आहे . एखाद्या गावात गात एकत्रीकरण योजना अस्तित्वात आली असल्यास त्यानंतर चे फेरफार क्रमांक संगणकीकृत ७/१२ येणे अपेक्षित आहे . ३. सर्व मानीव फेरफार क्रमांक कमी करून त्या ऐवजी हस्तलिखित मधील योग्य फेरफार क्रमांक घेनेत यावा . ४. वन जमिनीत वन हक्काचे पत्ते देनेत आले आहेत त्या ठिकाणी ७/१२ संगणकीकृत करणेत आलेले नाहीत त्या ठिकाणी संगणकीकरण पूर्ण करावे. ५. काही खातेदारांची आडनावे नमूद नाहीतर त्या ठिकाणी स्थानिक चौकशी करून व संबंधितांचे अर्ज घेऊन आडनावे लावावीत ६. बिगरशेती क्षेत्राचे ७/१२ आर चौ मी मध्ये नमूद करून एकक बदलावे

Comments

Archive

Contact Form

Send