रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

नागपूर विभागाच्या तपासणीचा आढावा सारांश दिनांक २०.१.२०१८

नमस्कार मित्रांनो , नुकताच नागपूर- अमरावती विभागाच्या तपासणी दौऱ्यावरुन घरी पोहोचलो , या दौऱ्यात गुणवत्तापूर्ण कामाचे काय ? याबाबत सारांश आपल्या माहितीसाठी देत आहे १. गडचिरोली जिल्हा - दिनांक १६.१.२०१८ २. चंद्रपूर जिल्हा - दिनांक १७.१.२०१८ ३. वर्धा जिल्हा - दिनांक १८.१.२०१८ ४. यवतमाळ जिल्हा - दिनांक १९.१.२०१८ ५. नागपूर जिल्हा - दिनांक २०.१.२०१८ नागपूर विभागामध्ये प्रामुख्याने बऱ्याच ठिकाणी पुनर्लिखित ७ /१२ वर जुन्या ७/१२ वरील सर्व जुने फेरफार घेणेत येत नव्हते त्यामुळे सन २०१४-१५ मध्ये हस्तलिखित बंद केलेल्या ७/१२ वरील फेरफार क्रमांक व सध्याच्या re edit केलेल्या ७/१२ वरील फेरफार क्रमांक जुळत नाहीत . सध्या वापरत असलेल्या संगणकीकृत ७/१२ मध्ये हस्तलिखित ७/१२ वर नमूद नसलेले असंबंधित फेफार क्रमांक / मानीव फेरफार क्रमांक घेणेत आले आहेत . edit / re edit आज्ञावलीचा वापर करून असे फेरफार क्रमांक बदलेले नाहीत . फेरफार क्रमांक हा सात बारा वरील सर्वात महत्वाचा घटक असलेने अचूक ७/१२ च्या मूळ संकल्पनेलाच बाधा येत आहे . त्यामुळे असे फेरफार क्रमांक अचूक असणे अत्यंत महत्वाचे आहे . इतर अनेक मुद्दे गाव निहाव त्रुटी संबंधितांना कालावीनेत येतील . आपला रामदास जगताप

Comments

Archive

Contact Form

Send