दिनांक ७.१२.२०१७ पासून ई फेरफार आज्ञावली मध्ये करणेत आलेल्या सुधारणा
नमस्कार मित्रांनो
दिनांक ७.१२.२०१७ पासून ई फेरफार आज्ञावली मध्ये खालील सुधारणा करणेत आल्या आहेत
१. तलाठी मंडळ अधिकायांच्या हजेरी पत्रकात दिनांक FORMAT बदलनेत आले आहे .dd.MM.yyyy
२. जुने फेरफार आदेशाने ७/१२ वरून काढून टाकणे ची सुविधा देणेत आली आहे .
३. दुय्यम निबंधक यांचेकले नोंदलेले दस्तांची सूची २ व scanned document ( दस्त ) पाहण्याची व download करण्याची सुविधा तलाठी मंडळ अधिकारी व dba लॉगीन ला देनेत आली आहे
४. गहाणखत दस्ताचे फेरफाराची reentry केल्यास पुढील नंबर पडण्याची अडचण दूर करणेत आली आहे (BUG FIXATION DONE)
५. ई फेरफार MIS - तलाठी स्थरावरील नोटीस काढलेली फेरफार संख्या व, नोटीसा बजावलेली फेरफार संख्या आणी हरकतीच शेरा भरलेल्या फेरफाराची संख्या मधील तफावत दूर करणेत आली आहे .
६. राज्यातील सर्व १८२ उप विभागीय अधिकाऱ्यांसाठी LOGIN I D व PASSWORD देणून MIS पाहण्याची सुविधा देनेत आली आहे
रामदास जगताप
उप जिल्हाधिकारी तथा राज्य समन्वयक , ई फेरफार प्रकल्प
जमाबंदी आयुक्त कार्यालय , पुणे
Comments