रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

दि. १५.११.२०१७ पासून ई फेरफार आज्ञावली मध्ये दिलेल्या नवीन सुधारणा

नमस्कार मितांनो दि. १५.११.२०१७ पासून ई फेरफार आज्ञावली मध्ये दिलेल्या नवीन सुधारणा ( Release Notes eFerfar – 15 Nov 2017) १. बिगरशेती व शेती जमिनीचे ७/१२ चे एकक व क्षेत्र रूपांतराचे आदेश घेण्याची सुविधा २. जिल्हा निहाय data signing component ( ACTIVE x) देणेत आले ३. नवीन फेरफार घेताना जुन्या अगोदरच्या फेरफारची माहिती पुन्हा येण्याची अडचण दूर करणेत आली ४. अनोंदणीकृत पद्धतीने घेतल्या जाणारया टेम्प्लेट व सामान्य खरेदीच्या फेरफार प्रकारामध्ये नवीन खाते तयार करणेची सुविधा देनेत आली आहे . ५. राजपत्राने नावात बदल या प्रकारात इतर हक्कात नोंद करणेची सुविधा देनेत आली . ६ .नवीन तयार केलेल्या ७/१२ वरील भोगटादाराचे क्षेत्राप्रमाणे आकार आपोआप येणार ७. आदेशाने घेतलेल्या फेरफारावर आक्षेप / तक्रार घेता येणार नाही . ८. खातेदारांची माहिती या अहवालामध्ये यापूर्वी एकाच गटाचे क्षेत्र येत होते आता त्या खात्यावरील सर्व गटांचे क्षेत्राची बेरीज येणार . ९. मोठ्या गावांचे फेरफार रजिस्टर व खाते रजिस्टर ( ८अ ) तयार होण्यासाठी रेंज प्रमाणे तयार करता येणार . उदा १ ते ५० , ५१ ते १००. १०. नोंदणीकृत दास्तामधील मान्यता देणाराची नावे फेरफाराच्या तपशिलामध्ये येतील मात्र ती ७/१२ मध्ये येणार नाहीत अशी सुधारणा केली . ११. RE-EDIT मध्ये खाता एकत्रीकरण व खाता विभागनी ची सुविधा पुन्हा चालू केली . १२. भूधारणा वर्ग १ मध्ये १) आदिवासी च्या वर्ग १ च्या जमिनी , २) कुळकायदा कलम ६३ १(क) प्रमाणे खरेदी केलेल्या जमिनी , व ३) भूमिधारी हक्काने धारण केलेल्या वर्ग १ च्या जमिनी असे उप प्रकार ई फेरफार , एडिट व री एडिट मध्ये देनेत आले . १३. घोषणापत्र १ झालेल्या गावाचे घोषणापत्र १ पूर्ववत करण्याची विनंती तलाठी यांनी केल्यास घोषणापत्र १ पूर्ववत करण्याची मान्यता DBA यांनी देण्याची सुविधा तयार केली . १४. ODC मध्ये दुबार खाती शोधण्याची व नष्ट करण्याची सुविधा देनेत आली . १५. वारस नोंदीची नवीन सुविधा देनेत आली अ) वेगवेगळ्या नावाने नोंदविलेल्या मयत खातेदाराचा शोध घेऊन खाते निवडण्याची सुविधा ( एक किंवा अनेक खाती ) ब) निवडलेल्या खात्यावरील सर्व सर्व्हे नंबर वर वारस नोंद होणार . क) यामध्ये एकाच खातेदाराच्या नावात काही स्पेलिंग च्या चुका झाल्या असल्यास अशा खातेदाराची सर्व खाती वारस नोंदी मध्ये समाविष्ट करता येतील. ड) या सुविधेमुळे दोन मयात व्यक्तींना एक समान वारस असल्यास एकाच फेरफारातून वारस नोंद घेता येईल ( मुलांचे वडील व आई मयात झाली असल्यास एकाच वारस नोंदीतून नोंद घेता येईल ) १५. तलाठी मंडळ अधिकारी व नायब तहसीलदार ( DBA) यांना सूची २ ( इंडेक्स २ ) पाहण्याची सुविधा देनेत आली आहे . १६. नोटीस बजावल्याची तारीख आज पासून जास्तीत जास्त १५ दिवस मागची भरता येईल . १७. एकदा भरलेली नोटीस बजावल्याची तारीख पुन्हा बदलता येणार नाही . १८. हरकतीचा शेरा भरण्याची सोय फक्त शेवटच्या खातेदाराला नोटीस बजावल्याच्या तारखेपासून १५ दिवस पूर्ण झाल्या नंतर तीन दिवसच ठेवण्यात आली आहे . १९. हरकतीचा शेरा तलाठ्याला भरता येईल त्यामध्ये अ) हरकतदाराचे नाव , ब) हरकतदाराचा आधार क्रमांक , क) मोबाईल नंबर ड) हरकत आल्याची तारीख व इ) हरकतीचा थोडक्यात तपशील भरता येईल . २०. हरकतीच्या / तक्रार केसेस साठी स्वतंत्र DASHBOARD देनेत आला आहे २१. हरकत निर्गत करण्याचा शेरा मंडळ अधिकारी यांना भरता येईल त्यामध्ये अ) हरकत निर्गातीच्या आदेशाचा दिनांक व जावक नंबर , ब) आदेशाचा थोडक्यात तपशील . २२. तलाठी शेरा यापुढे हरकतीचा शेरा म्हणून नमूद करणेत येईल . २३. मंडळ अधिकारी शेरा यापुढे “ हरकत का निर्गत करत आहोत याचा तपशील “ असा बदलला आहे २४. हरकत घेणार्याचा मोबाईल नंबर किंवा आधार नंबर घेनेत यावा ( दोन्ही बंधनकारक नाहीत ) . २५. सर्व्हे नंबर निहाय DATA SIGNING तलाठी व मंडळ अधिकारी यांना उपलब्ध . २६ सामान्य फेरफार प्रकारातून वारस व लीस पेंडन्स हे फेरफार प्रकार काढून टाकणेत आले आहेत . २७. खाते उताऱ्यात (८अ) टोपण नाव छापणेत येत नव्हते ते यापुढे ७/१२ प्रमाणे ८अ वर देखील छापणेत येईल . २८. धारणा प्रकार बदलणे च्या फेरफार प्रकारात PREVIEW योग्य दाखवला जात नव्हता तो आता योग्य करणेत आला आहे . २९. अकृषिक ७/१२ वरील क्षेत्र आर.चौ.मी. मध्ये रुपांतरीत करून देखील मंडळ अधिकारी स्थरावर PREVIEW योग्य दिसत नव्हता तो आता दुरुस्त करणेत आला आहे . ३०. अंशता नामंजूर फेरफरमध्ये वापरलेला दस्त क्रमांक नामंजूर सर्व्हे नंबरसाठी व पूर्णता नामंजूर फेरफारासाठी वापरलेला दस्त क्रमांक सर्व सर्व्हे नंबरसाठी उपलब्ध असेल , तथापि मंजूर असलेल्या फेरारासाठी वापरलेला दस्त क्रमांक पुन्हा फेरफारासाठी उपलब्ध असणार नाही . ३१. RE-EDIT MODULE मध्ये नामंजूर फेरफार क्रमांकाची यादी दर्शविणारा अहवाल उपलब्ध करून दिला आहे . ३२. CROP MASTER मध्ये पिकाचे नाव नमूद करण्याची सोय DBA लॉगीन ला देनेत आली आहे. ( फक्त कृषी गणना संचालनालयाने दिलेल्या पिकांच्या यादीतीलच पिके सामाविष्ट करणेत यावीत. ३३. जलसिंचनाची साधने समाविष्ट करण्याची सोय DBA लॉगीन ला देनेत आली आहे. ३४. गाव नमुना १२ मध्ये शेरा रकान्या मध्ये लागवडी अयोग्य क्षेत्राचा तपशील नमूद करण्याची सोय DBA लॉगीन ला देनेत आली आहे. ३५.अ.पा.क. नोंदी स्वतंत्र ओळीमध्ये घेतल्या असल्यास ती तफावत समजनेत येईल , त्या बाबतचा अहवाल ODCमध्ये देनेत आला असून तो घोषणापत्र ३ देणेपुर्वी निर्गत करणे आवश्यक आहे . (अ.पा.क. नोंदी टोपण नावाचे रकान्यात घेणेत याव्यात ) . ३६. ठाणे , नाशिक व कोल्हापूर जिल्ह्यासाठी BSNL CLOUD वरून mis देनेत आला आहे . ३७. ई फेरफार मध्ये ODU मधील प्रलंबित फेरफार क्रमांकाची यादीचा अहवाल देनेत आला आहे . ३८. ई फेरफारामध्ये विशिष्ट क्षेत्राचे सर्व्हे नंबर दाखविणारा अहवाल उपलब्ध करून देनेत आला आहे . ३९. दैनिक हजेरी पत्रक व गैर हजेरी पत्रक उपलब्ध करून देनेत आले आहे . ४०. ODU, Edit, Re-Edit and eFerfar मधील नामंजूर फेरफार क्रमांकाची यादी दर्शविणारा अहवाल उपलब्ध करून दिला आहे . ४१. ODC मध्ये एकच खाते क्रमांक असलेल्या सर्व्हे नंबरची यादी दर्शविणारा अहवाल उपलब्ध करून दिला आहे . ४२. ई फेरफार मध्ये भूधारणा बदललेल्या सर्व्हे नंबरची यादी दर्शविणारा अहवाल उपलब्ध करून देनेत आला आहे.( हा अहवाल तपासून पालक महसूल अधिकाऱ्याने योग्य असल्याची खात्री करावी ). ४३. ODC मध्ये एक समान नावे असलेल्या एकापेक्षा जास्त खाते नंबर असलेल्या सर्व्हे नामर ची यादी दर्शविणारा अहवाल उपलब्ध करून देनेत आला आहे . ४४. वाडी विभाजनाचा फेरफार अधिक अचूक करण्यासाठी , अ) जुन्या गावातील बदललेले सर्व्हे नंबरची यादी ब) नवीन गावातील बदललेले सर्व्हे नंबरची यादी क) जुन्या गावातील न बदललेले सर्व्हे नंबरची यादी ड) नवीन गावातील न बदललेले सर्व्हे नंबरची यादी इ) जुन्या ( मूळ) गावात शिल्लक राहिलेल्या सर्व्हे नंबरची यादी अनेक वेळा सर्व्हे नंबरचे क्रमांक बदलणे व कायम ठेवणे स्थलांतरित करणे यामध्ये वापरकर्त्यांकडून चुका होतात त्या होऊ नये म्हणून हे अहवाल दिले आहेत . या प्रमाणे खात्री करूनच वाडी विभाजन करणेत यावे . ४५. खाता दुरुस्तीची प्रक्रिया सुरु करणेपुर्वी निवडलेल्या सर्व्हे नंबर ची यादी दर्शविणारा अहवाल RE-EDIT मध्ये देनेत आला आहे ४६. शून्य क्षेत्र असलेल्या खात्यांचा अहवाल ODC मध्ये देनेत आला आहे व तो घोषणापत्र ३ करणेपुर्वी निरंक करणे आवश्यक करणेत आले आहे . ४७. हे.आर.चौ.मी. एकक असलेल्या अकृषिक सर्व्हे नंबर अथवा ७/१२ ची यादी दर्शविणारा अहवाल ई फेरफार मध्ये देनेत आला आहे . ४८. हे.आर.चौ.मी. एकक नसलेल्या शेतीच्या/ कृषी क्षेत्राचे सर्व्हे नंबर अथवा ७/१२ ची यादी दर्शविणारा अहवाल ई फेरफार मध्ये देनेत आला आहे .

Comments

  1. मी पी. के. नंदनवार तलाठी हिंगणघाट जिल्हा वर्धा. सर खातेदारांची माहिती या अहवालामध्ये खातेदाराचे एकुण क्षेत्र येते परंतू खातेदारांची एकुण आकारणी येत नाही. कृपया त्यावर मार्गदर्शन करावे सर.

    ReplyDelete

Archive

Contact Form

Send