Re-Edit मॉडयुल मधील घोषणापत्र 2 नायब तहसिलदार ( DBA ) व घोषणापत्र 3 तहसिलदार यांनी करणेबाबत.
क्र.रा.भू.अ.आ.का.4 / Re-Edit /2017
जमाबंदी
आयुक्त आणि संचालक
भूमि अभिलेख (महाराष्ट्र राज्य ),
यांचे
कार्यालय, पुणे
दिनांक -06/09/2017
प्रति,
जिल्हाधिकारी, ( सर्व ) .
विषय - Re-Edit मॉडयुल मधील घोषणापत्र 2 नायब तहसिलदार ( DBA ) व
घोषणापत्र 3 तहसिलदार यांनी
करणेबाबत.
संदर्भ- 1) या कार्यालयाचे परिपत्रक क्र.राभूअआका4 /Re-Edit /2017
दि. 10/07/2017.
चावडीवाचनाच्या विशेष मोहिमेमध्ये प्राप्त आक्षेप व महसूल अधिकाऱ्यांच्या
तपासणीत संगणकीकृत 7/12 व 8अ मध्ये आढळून आलेल्या त्रुटी दुर करण्यासाठी RE-Edit Module संदर्भीय परिपत्रकान्वये उपलब्ध करून
देण्यात आले होते.त्यामध्ये घोषणापत्र 1,2 व 3 तलाठी
यांनी करणे अपेक्षीत होते. त्यामध्ये अंशत: बदल करून सध्या घोषणापत्र -1 तलाठी
यांनी करणे घोषणापत्र-2 नायब तहसिलदार (DBA) यांनी व घोषणापत्र-3 तहसिलदार यांनी करणे आवश्यक आहे. अशी सुधारणा करण्यात आली आहे.त्यासाठी
आवश्यक त्या सुचना खालील प्रमाणे सर्व संबंधीतांच्या निदर्शनास आणाव्यात.
1) यापुढे घोषणापत्र 2 व3 तलाठी यांना करता येणार नाहीत.
2) खाता प्रोसेसिंग , खाता एकत्रीकरण व खाता
विभागणी इत्यादी काम पुर्ण झालेनंतर संबंधीत तलाठी यांनी घोषणापत्र 1 करावे.
3) Edit Moduel चे काम पुर्ण झाल्यानंतर एकुण गट नंबर /सर्व्हे नंबर पैकी ज्या गट नंबर/ सर्व्हे नंबरवर दुरूस्ती आवश्यक आहे असे गट Re-
Edit मध्ये निवडून त्यावर योग्य ती दुरुस्ती केल्यानंतर परिशिष्ट
ब तयार करून त्यास तहसिलदार यांची मान्यता घेतल्यानंतर तयार केलेला फेरफार मंडळ
अधिकारी यांनी सर्व्हे नंबर/ गट
नंबर निहाय मंजुर करावा. तत्पुर्वी
जर काही गट Re-Edit मध्ये निवडून दूरुस्त्या फेरफार तयार करून मंजूर केल्या असतील तर असा 7/12 पुन्हा Re-Edit साठी उपलब्ध होणार नाही . मात्र Re- Edit मध्ये गट नंबर /सर्व्हे नंबर निवडून कोणतीही दूरुस्ती केली नसल्यास
फेरफाराने दुरूस्त्या नामंजूर केल्या असल्यास अशा गटावर/ सर्व्हे नंबरवर दुरुस्त्या Re- Edit मधून करता येतील.
( परिशिष्ट ब फक्त संगणकीकृत 7/12 हस्तलिखित 7/12 शी तंतोतंत जुळविण्यासाठी आहे. त्यामध्ये हस्तलिखितमध्ये नसलेल्या कोणत्याही
दुरूस्त्या घेण्यात येऊ नयेत जर हस्तलिखित
गा.न.नं.7/12 मध्ये काही चुका/ त्रुटी असल्यास त्या दुरूस्त करण्यासाठी महाराष्ट्र जमीन
महसुल अधिनियमाच्या कलम 155 प्रमाणे योग्य ती सुनावणी घेऊन व संबंधीत पक्षकारांची बाजु
ऐकुन घेऊनच निर्णय घेण्यात यावा. अशा
दुरुस्त्या थेट परिशिष्ट ब मध्ये घेण्यात येऊ नयेत. )
4) पालक महसुल अधिकाऱ्याने 1ते 24 मुद्दयांची केलेली तपासणी व महसूल अधिकाऱ्यांच्या तपासणीत आढळून आलेल्या त्रुटी
तसेच ODC अहवाल 1 ते 26 निरंक
करण्यासाठी आवश्यक त्या दुरुस्त्या पुर्ण झाल्यानंतर व त्या योग्य रित्या साठविल्या गेल्या असल्यास अचूक 7/12 ची प्रिंट आऊट काढून महसुल कर्मचारी अधिकाऱ्यांनी ठरवून दिलेल्या बिेंदु
प्रमाणे तपासणी पुर्ण करावी . या
तपासणीत काही त्रुटी आढळून आल्यास त्या
देखील Re- Edit मधून दुरूस्त करण्यात याव्यात व त्यानंतरच घोषणापत्र 2 संबंधीत डी.बी.ए. ( नायब तहसिलदार ) यांचे लॉगीनने करण्यात यावे.
घोषणापत्र दोन करण्यापुर्वी सर्व तपासण्या इष्टांकाप्रमाणे पुर्ण करून
दुरुस्त्या देखील केल्या आहेत व तपासणी केलेले सर्व 7/12 वर नाव व पदनाम टाकुन स्वाक्षरीत 7/12 तालुका अभिलेख कक्षात जमा केल्याची खात्री DBA यांनी करावी.
5) घोषणापत्र 2 डीबीए ने केल्यानंतर घोषणापत्र
3 साठीची माहिती नायब
तहसिलदार यांनी भरुन साठवावी व त्यानंतर
घोषणापत्र 3 तहसिलदार यांच्या Biometric login ने
Usercreation मधून करण्यात यावे.
घोषणापत्र 3 करण्यापुर्वी
तहसिलदार यांनी या घोषणापत्रात नमुद सर्व बाबी पुर्ण असल्याची खात्री करावी.
Re-Edit Module मध्ये
खालीलप्रमाणे नमुद Software मध्ये Checks लावण्यात आलेले आहेत.
1.
कोणताही 7/12 Edit
Module मध्ये Confirm किंवा Certify केल्याशिवाय Re-Edit साठी उपलब्ध होणार नाही. जो 7/12
Edit Module मध्ये प्रलंबित आहे तो प्रथम Edit Module मध्ये Confirm
किंवा Certify करावा व त्यानंतरच गरज
असल्यास Re-Edit
साठी घ्यावा.
2.
कोणतेही खाते खाता
प्रोसेसिंगसाठी निवडण्यापुर्वी तो खाता ज्या 7/12 वर
नमुद असेल त्या 7/12 वर ई-फेरफार
( नोंदणीकृत व अनोंदणीकृत ), Edit, ODU मध्ये
कोणताही फेरफार प्रलंबित असु नये अथवा त्या सर्व्हे नंबर / गट
नंबर वर कोणताही नोंदणीकृत दस्त प्रलंबित असु नये.
3.
खाते प्रोसेसिंगमध्ये निवडलेला
खाता क्रमांक,
खाता एकत्रिकरण किंवा खाता विभागणीसाठी त्याचवेळी निवडलेला
असु नये.
4.
घोषणापत्र -1 झालेनंतर कोणत्याही खाते क्रमांकावर खाता प्रोसेसिंग, खाता
एकत्रिकरण किंवा खातेविभागणी करता येणार नाही. जरी
अशा खात्यावर यापुर्वी खाता एकत्रिकरण, खाता विभागणी अथवा खाता
प्रोसेसिंग केले नसले तरीही अशा खात्यावर कोणतीही दुरुस्ती करता येणार नाही.
5.
घोषणापत्र – 1 करणेपुर्वी किमान एका तरी खात्यामध्ये दुरुस्ती करणे आवश्यक आहे.
6.
Re-Edit Module मध्ये
घोषणापत्र -1
झाल्याशिवाय कोणताही 7/12 दुरुस्तीसाठी
निवडुन दुरुस्त्या करता येणार नाहीत.
7.
घोषणापत्र – 2 करण्यापुर्वी Re-Edit Module मधुन ज्या चुका / त्रुटी दुरुस्त झाल्या नव्हत्या त्या सर्व त्रुटींसह चावडी वाचनात प्राप्त
झालेले सर्व आक्षेपाप्रमाणे आवश्यक असलेल्या दुरुस्त्या ज्या ठिकाणी 7/12 वरील क्षेत्राचे एकक बदलणे, 7/12 शेती / बिगरशेतीसाठी
निवडणे,
बिगरशेती साठी निवडलेल्या क्षेत्राचे योग्य एकक व योग्य
क्षेत्र आर.चौ.मी.
मध्ये रुपांतरीत करणे गांव नमुना 1 क
अद्ययावत करणे व ODC मधील 1 ते 26 अहवाल निरंक करण्यासाठी ज्या ज्या दुरुस्त्या आवश्यक आहेत अशा सर्व दुरुस्त्या
पुर्ण केल्यानंतर तसेच महसुल अधिकारी यांचे तपासणीत काही त्रुटी आढळुन आल्यास त्या
दुरुस्त्या केल्यानंतरच घोषणापत्र -2 करावे.
8.
घोषणापत्र – 2 केल्यानंतर 7/12 मध्ये Re-Edit मधुन दुरुस्त्या करणेच्या चुकुन राहिल्या असतील तर या 7/12 वर घोषणापत्र -2 नंतर कोणत्याही दुरुस्त्या करता येणार
नाहीत.
9.
घोषणापत्र –2 तलाठयाने न करता नायब तहसिलदार ( DBA) यांनी
Re-Edit Moduel मधुन
करावे.
त्यासाठी घोषणापत्रात नमुद सर्व बाबी पुर्ण झाल्याची खात्री
DBA
यांनी करावी.
10. घोषणापत्र –
3 User Creation मधुन बायोमेट्रीक लॉगीनद्वारे तहसिलदार यांनी करावे
त्यासाठी घोषणापत्रातील नमुद सर्व बाबी पुर्ण झाल्या असल्याची खात्री करावी.
11. घोषणापत्र –
3 झाल्यानंतर कोणत्याही खात्यामध्ये अथवा 7/12 मध्ये कोणतीही दुरुस्ती करता येणार नाही तसेच हे गांव Edit व Re-Edit
Module साठी उपलब्ध राहणार नाही.
12. 7/12 वर एकच खाते असल्यास 7/12 वरुन असे खाते वगळता येणार
नाही.
यापुर्वी योग्य ते खाते समाविष्ठ करुनच असे अनावश्यक खाते
वगळता येईल.
13. खाता वगळणे या पर्यायामधुन काम करतांना जर 7/12 वर
एकच खाते असेल तर असे खाते वगळता येणार नाही.
घोषणापत्र
2
करण्यापुर्वी तपासणी अधिकाऱ्याने काही त्रुटी 7/12 मध्ये निदर्शनास आणल्यास जर असा गट नं./स.नं.
यापुर्वी Re-Edit मधून दुरुस्त करून परिशिष्ट ब आणि फेरफार तयार करून प्रमाणीत
केला नसेल तर दुरुस्त करता येईल मात्र जर असा गट नंबर/ सर्व्हे
नंबर यापुर्वीच Re-Edit केला असेल तर त्याबाबत एकत्रीत
अहवाल घेऊन कलम 155 प्रमाणे हस्तदोष दुरूस्तीचा आदेश घेऊनच दुरुस्ती ई-फेरफार
मधून करता येईल याची नोंद घ्यावी.
वरील सर्व सूचना तात्काळ सर्व वापरकर्त्यांच्या
निदर्शनास आणण्यात याव्यात ही विनंती.
Comments