रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

हस्तलिखीत अधिकार अभिलेख संगणकीकृत अधिकार अभिलेखाशी तंतोतंत जुळविण्यासाठी Edit Module मधुन कन्फर्म केलेल्या अधिकार अभिलेखांची तपासणी व अचूक संगणकीकृत अधिकार अभिलेखांचे चावडी वाचन करणे बाबत मार्गदर्शक सूचना.

वाचा :- 1) शासन परिपत्रक क्रमांक रा.भू.अ./प्र.क्र./80/ल-1 दिनांक 07/05/2016. 2) या कार्यालयाकडील परिपत्रक क्र.रा.भू.अ.आ.का.4/युनिकोड रुपांतरण/प्र.क्र.15/2012 दि. 15/03/2013. क्र. रा.भू.अ.आ.का.4/चावडी वाचन/ /2017 जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि अभिलेख दिनांक ०५/०५/२०१७ परिपत्रक विषय:- हस्तलिखीत अधिकार अभिलेख संगणकीकृत अधिकार अभिलेखाशी तंतोतंत जुळविण्यासाठी Edit Module मधुन कन्फर्म केलेल्या अधिकार अभिलेखांची तपासणी व अचूक संगणकीकृत अधिकार अभिलेखांचे चावडी वाचन करणे बाबत मार्गदर्शक सूचना. राज्यात केंद्र पुरस्कृत डिजीटल इंडिया लँड रेकॉर्ड मॉडर्नायझेशन प्रोग्रॅम (DILRMP) कार्यान्वित असुन त्याअंतर्गत राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र, पुणे यांनी ई-फेरफार आज्ञावली विकसित केली आहे. राज्यातील “ ई-फेरफार ” आज्ञावलीची प्रत्यक्ष अंमलबजावणी यशस्वी करण्यासाठी स्टेट डाटा सेंटर या ठिकाणी स्थापित केलेला अधिकार अभिलेखाचा अद्ययावत डाटा हा मूळ हस्तलिखीत अभिलेखाशी तंतोतंत (100%) जुळणे अत्यावश्यक आहे. सदर डाटामध्ये एकही चूका राहणार नाही व स्टेट डाटा सेंटरवर स्थापित डाटा हा (100%) बिनचूक असावा यासाठी शासनाचे दिनांक 7/5/2016 चे परिपत्रकान्वये हस्तलिखीत व संगणकीकृत अधिकार अभिलेख तंतोतंत जुळविण्यासाठी “ Edit Module” देण्यात आले आहे. सदर “ Edit Module” चा वापर करुन राज्यातील एकुण गा.न.नं. 7/12 पैकी 80% गा.न.नं. 7/12 Edit करुन अथवा Edit केल्याशिवाय कन्फर्म करण्यात आले आहेत. परंतु कन्फर्म केलेल्या गा.न.नं. 7/12 ची तपासणी केली असता काही ठिकाणी संगणकीकृत अधिकार अभिलेख हस्तलिखीत अधिकार अभिलेखांशी तंतोतंत न जुळविता कन्फर्म केल्याचे निदर्शनास येत आहे. “ ई-फेरफार ” आज्ञावलीच्या भविष्यातील यशस्वी अंमलबजावणीसाठी सदरची बाब अडसर असुन गंभीर स्वरुपाची आहे. सबब स्टेट डाटा सेंटरवर स्थापित डाटा हा बिनचूक असावा यासाठी सर्व तालुक्यांतील सर्व गावांतील संगणकीकृत अधिकार अभिलेख पुनर्लिखीत केले आहेत असे गृहित धरुन त्याप्रमाणे महाराष्ट्र जमीन महसुल अधिकार अभिलेख नोंदवहया ( तयार करणे व सुस्थितीत ठेवणे ) नियम 1971 मधील नियम 6 व 7 प्रमाणे गा.न.नं. 7/12 व गा.न.नं. 8 (अ) तयार करण्यासाठी “चावडी वाचन” ची एक विशेष मोहिम घेण्यात येत आहे. त्यासाठी मार्गदर्शक सूचना खालीलप्रमाणे देण्यात येत आहेत. सदर मोहिमेचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे असेल. 1) पहिला टप्पा- ऑनलाईन तपासणी ( कालावधी 01/05/2017 ते 15/05/2017) सदर कालावधीत खातेदारांना जमीनीचे गा.न.नं. 7/12 अधिकृत संकेतस्थळ https://mahabhulekh.maharashtra.gov.in यावर पाहता येतील. याशिवाय महा-ई-सेवा केंद्र, ‘आपले सरकार ’ पोर्टल, जिल्हा व तालुका ‘ सेतू ’ या ठिकाणांहून देखील खातेदारांनी आपले गा.न.नं. 7/12 प्राप्त करुन घेता येतील व आपले आक्षेप संबंधीत तलाठी / तहसिलदार यांचेकडे लेखी पत्राने पाठविता येतील. या कालावधीत तहसिलदार यांनी तालुका स्तरावर देखील जादा संगणक लावुन ‘फेरफार कक्षा ’ मधुन आपले गा.न.नं. 7/12 पाहण्याची सोय खातेदारांना उपलब्ध करुन द्यावी. तलाठी व तालुका स्तरावर खातेदारांकडुन प्राप्त आक्षेपांसाठी स्वतंत्र नोंदवही ठेवून त्यावर विहीत कालावधीत कार्यवाही पुर्ण करावी. संगणकीकृत अधिकार अभिलेखांची तलाठी यांनी 100% ऑनलाईन तपासणी करणे आवश्यक आहे त्यानंतर एडिटचे काम पुर्ण झालेल्या अशा सर्व गावांची तपासणी महसूल अधिकाऱ्यांनी सोबत जोडलेल्या पडताळणी सूची प्रमाणे (ऑनलाईन अहवालासह) करावी. तपासणी केलेले गा.न.नं. 7/12 मध्ये चुका दुरुस्त करण्यासाठी आज्ञावलीत सोय उपलब्ध करुन देण्यात येईल. त्याप्रमाणे आवश्यक तेथे दुरुस्त्या पुर्ण करण्यात याव्यात. खातेदारांनी आपल्या गा.न.नं. 7/12 ची तपासणी https://mahabhulekh.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरुन करण्यासाठी व्यापक प्रचार व प्रसिध्दी करावी. 2) दुसरा टप्पा - चावडी वाचन ( कालावधी 16/05/2017 ते 15/06/2017) ऑनलाईन तपासणीची कार्यवाही पुर्ण झाल्यानंतर गावातील सर्व गा.न.नं. 7/12ची PDF generate करुन 2 प्रतीमध्ये प्रिंट काढावी. गा.न.नं. 7/12 च्या प्रिंट साठी येणारा खर्च जिल्हा सेतू समितीच्या उपलब्ध निधीतून करावा. एका प्रतीची 100% तपासणी तलाठी यांनी पुर्ण करावी. सदर प्रतीवर आढळलेल्या चूका हिरव्या शाईने दुरुस्त कराव्यात. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम अभिलेख (नोंदवहया तयार करणे व सुस्थितीत ठेवणे ) नियम 1971 नियम 6 व 7 प्रमाणे व महाराष्ट्र जमीन महसूल नियम पुस्तिका खंड 4 मध्ये तरतुद असल्याप्रमाणे गा.न.नं. 7/12 व गा.न.नं. 8 (अ) चे चावडी वाचन करण्यासाठी तलाठी यांनी गांवात योग्य प्रसिध्दी करुन / दवंडी देवुन चावडी वाचनाची वेळ व तारीख निश्चित करावी. चावडीवाचना वेळी तयार करण्यात आलेली दुसरी प्रिंट उपस्थित खातेदारांना तपासणीसाठी द्यावी व त्यांना निदर्शनास आलेल्या चूका लाल शाईने त्या प्रिंटवर दाखविण्यास सांगावे व सदर प्रतीवर खातेदार यांची स्वाक्षरी घ्यावी. या कालावधीत सर्व गांवामध्ये चावडी वाचनाची कार्यवाही पुर्ण करावी व खातेदारांकडुन आक्षेप प्राप्त करुन घेवुन त्यासाठी ठेवलेल्या नोंदवहित नोंदवावेत. 3) तिसरा टप्पा - चावडी वाचनानंतर प्रत्यक्ष दुरुस्ती व तपासणी ( कालावधी 16/06/2017 ते 15/07/2017) चावडी वाचन पुर्ण झाल्यानंतर खातेदारांकडुन प्राप्त आक्षेप व गा.न.नं. 7/12 ची स्वाक्षरी केलेली प्रत याप्रमाणे हस्तलिखीत गा.न.नं. 7/12ची रुजवात घ्यावी. खातेदारांनी सूचविलेल्या दुरुस्त्या हस्तलिखीत गा.न.नं. 7/12 शी तंतोतंत जुळविण्यासाठी योग्य असल्याची खात्री करावी. त्याव्यतिरिक्त दुरुस्त्या सुचविल्या असल्यास त्यांची दुरुस्ती सदर मोहितेअंतर्गत करण्यात येवू नये. तपासणीमध्ये आढळून आलेल्या त्रुटी दूर करण्यासाठी व कार्यक्रमाचा टप्पा 1 व टप्पा 2 प्राप्त आक्षेपांप्रमाणे आवश्यक त्या दुरुस्त्या पुर्ण करण्यात याव्यात. दुरुस्त्या पुर्ण केल्यानंतर त्या (तेवढयाच )अचुक 7/12 ची पुन्हा प्रिंट काढुन सर्व स.नं. / ग.नं. च्या अचुक 7/12 चा संच तयार करण्यात यावा व असा अचुक गा.न.नं. 7/12 मंडळ अधिकारी यांनी (30%), नायब तहसिलदार यांनी (10%), तहसिलदार यांनी (5%), उपविभागीय अधिकारी यांनी (3%), जिल्हाधिकारी यांनी (1%) याप्रमाणे तपासणी या कार्यालयाकडील दिनांक 15/03/2013 रोजीच्या परिपत्रकाप्रमाणे पुर्ण करावी. महसूल अधिकाऱ्याने तपासणी केलेल्या प्रत्येक 7/12 वर त्यांचे नांव पदनाम लिहून दिनांकित स्वाक्षरी करावी. एका अधिकाऱ्याने तपासणी केलेले 7/12 दुसऱ्या अधिकाऱ्याने तपासू नयेत. प्रत्येक अधिकाऱ्याने टक्केवारी प्रमाणे येणाऱ्या संख्ये इतके स्वतंत्र 7/12 तपासावेत व ते सर्व 7/12 तपासणी सूचीप्रमाणे अचूक असलेची खात्री करावी. अशा पध्दतीने तपासणी करुन स्वाक्षरीत केलेली अंतिम अचूक 7/12ची प्रत सोबत जोडलेल्या प्रमाणपत्रासह ( प्रपत्र 1 ते 3 सोबत सादर ) तहसिल कार्यालयात ‘अ ’ वर्ग अभिलेख म्हणुन जतन करुन ठेवावी. गाव नमुना 7/12 ची तपासणी करतानांच अचूक गांव नमुना 8 (अ) ची देखील तपासणी करण्यात यावी. गांवनिहाय प्रमाणपत्राची एक प्रत उपविभागीय अधिकाऱ्यामार्फत जिल्हाधिकारी यांचेकडे सादर करावी. त्यानंतरच तो तालुका डिजीटल स्वाक्षरीने गा.न.नं. 7/12 वितरणासाठी योग्य समजला जावा. सदर मोहिमेअंतर्गत तयार झालेला बिनचूक संगणकीकृत गा.न.नं. 7/12 दिनांक 1 ऑगष्ट, 2017 रोजी राज्यातील सर्व खातेदारांना https://mahabhulekh.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपल्बध होतील याची दक्षता घ्यावी. शासनाच्या या मोहिमेला स्थानिक स्तरावर व्यापक प्रमाणात प्रसिध्दी द्यावी त्यामुळे संगणकीकृत अधिकार अभिलेख बिनचूक होण्यास मदत होईल. अचूक गा.न.नं. 7/12 व गा.न.नं. 8 (अ) झाल्याशिवाय ई-फेरफार प्रणाली व ई-चावडी-प्रणालीची अंमलबजावणी यशस्वी होणार नसल्याने सर्व तलाठी , मंडळ अधिकारी व महसूल अधिकाऱ्यांनी ही शेवटीची संधी समजून अचूक संगणकीकृत गा.न.नं. 7/12 व गा.न.नं. 8 (अ) करण्यासाठी कठोर परिश्रम घ्यावेत. या मोहिमेंअंती होणारे काम 100% अचूक होईल ( ZERO TOLERANCE TO ERROR ) याची दक्षता घ्यावी. चावडी वाचनाच्या या विशेष मोहिमेनंतरही गा.न.नं. 7/12 मध्ये त्रुटी /चूका आढळून आल्यास त्याची गंभीर दाखल घेतली जाईल व संबंधित अधिकारी / कर्मचारी यांचेवर जबाबदारी निश्चित करुन शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी. सोबत- 1.अचुक गा.न.नं. 7/12 तपासणीसाठी महसूल अधिकाऱ्यांनी वापरावयाची तपासणी सूची. 2. प्रपत्र क्रमांक -1 तपासणी करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांनी सादर करावयाचे प्रमाणपत्र. 3. प्रपत्र क्रमांक -2 संबंधित तलाठी, मंडळ अधिकारी, नायब तहसिलदार व तहसिलदार यांनी गांवनिहाय संगणकीकृत 7/12 च्या डाटाच्या अचुकतेबाबत जिल्हाधिकारी यांन सादर करावयाचे प्रमाणपत्र. 4. प्रपत्र क्रमांक -3 – संगणकीकृत 7/12 तपासणीबाबतच्या माहितीचा गोषवारा (जिल्हाधिकारी कार्यालयाचा अहवाल) (एस. चोक्कलिंगम) जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि अभिलेख (म.राज्य) पुणे प्रत : मा.प्रधान सचिव (महसूल) महसूल व वनविभाग मंत्रालय मुंबई यांना माहितीसाठी प्रत : मा. प्रधान सचिव माहिती तंत्रज्ञान, मंत्रालय मुंबई प्रत : विभागीय आयुक्त (सर्व) प्रत : जिल्हाधिकारी (सर्व) प्रत: राज्य सुचना विज्ञान अधिकारी, मुंबई प्रत: तांत्रिक संचालक, राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र, पुणे प्रत: डिस्ट्रीक्ट डोमेन एक्सपर्ट (सर्व) प्रत: जिल्हा सूचना विज्ञान केंद्र (सर्व) अचुक गा.न.नं. 7/12 तपासणीसाठी महसूल अधिकाऱ्यांनी वापरावयाची तपासणी सूची. गांवाचे नांव तालुका तपासणी अधिकाऱ्याचे नांव पदनांम अ.क्र. तपासणीचे मुद्दे तपासणीचा निष्कर्ष 1. सर्व्हे नंबर योग्य प्रकारे लिहीला आहे का ? ( ODC – अहवाल -9 ) 2. प्रत्येक 7/12 वर भूधारणा पध्दती निवडलेली आहे का ? व भोगवटादार वर्ग-2 असलेल्या 7/12 साठी उपप्रकार 1 ते 14 पैकी एक निवडलेला आहे का ? ( E-Ferfar - नियंत्रित सत्ता प्रकाराच्या नोंदीमधुन दुरुस्ती करणे ) 3. संगणकीकृत गा.न.नं. 1 (क) व हस्तलिखीत गा.न.नं. 1 (क) जुळतो का ? ( E-Ferfar गा.न.नं. 1(क) च्या जमीनीची यादी व हस्तलिखीत 1 (क) ची रुजवात घेणे. 4. एकूण खातेदारांची संख्या खाते प्रकारनिहाय बरोबर आहे का ?शेती व बिगरशेती क्षेत्राचे 8 अ स्वतंत्र झालेले आहेत ते बरोबर आहेत का ? खात्री करा ( E-Ferfar मधील अहवाल 7/12 वरील खातेदारांची संख्या समान नसल्यास ODU मधुन खाते विभागणी /एकत्रिकरण करावे व खातेदारांची माहिती आणि ODC – अहवाल -7 प्रमाणे हस्तलिखीत 8 (अ) शी पडताळणी करावी. ) 5. 7/12 वर नसलेली अथवा निरंक क्षेत्राची खाती गांवात नाहीत ना ? ( ODBA tool मधील निरंक क्षेत्राची खाती अहवाल ) 6. भोगवटदारांचे नांव योग्य लिहीण्यात आले आहे का ? याची खात्री करावी. ( ODC – अहवाल -5 व 6 ) 7. ब्लँक 7/12 गांवात नाहीत ना ? खात्री करा ( ODC – अहवाल -16 ) 8. शेती क्षेत्राचा आकार 7/12 वर लिहीला आहे का ? व खातेदाराच्या नांवासमोर त्याचे क्षेत्र व आकार नमूद केले आहे का ? ( प्रत्येक खातेदाराचे क्षेत्र निश्चित केले असल्यास (100%) व संयुक्त व समाईक खातेप्रकारामध्ये एका खातेदाराच्या नावासमोर व समाईकात (0%) क्षेत्र व आकार नमूद केला आहे का ? ) (ODC मध्ये 0% व 100% क्षेत्र निश्चित न केलेल्या खातेदारांची माहिती हा अहवाल पाहणे.) 9. भोगवटादाराचे सदरी असलेल्या खातेदाराच्या नावासमोरील क्षेत्र व आकाराची बेरीज गटाचे एकुण क्षेत्र व आकाराशी जुळते का? (ODC अहवाल -1) 10. जर हस्तलिखीत 7/12 वर आणेवारी नमूद असेल तर संगणकीकृत 7/12 मध्ये आणेवारी काढून त्याचे क्षेत्रात रुपांतर केले आहे का ? ( ODC मधील फक्त आणेवारी असलेल्या गटांची यादीचा अहवाल) 11. बिगरशेती क्षेत्राचे बाबत एकक आर. चौ.मी. निवडून हस्तलिखीत 7/12 वर आर चौ.फुट व एकर गुंठे व हे. आर. असले तरी क्षेत्राचे रुपांतर आर.चौ.मी. मध्ये करुन क्षेत्र खातेदाराच्या नांवासमोर नमूद केले आहे का ? ( एडिट मधील सर्व्हे क्रमांकाचा शेती बिगरशेतीचा अहवाल व गा.न.नं. 2 ची रुजवात घ्यावी. ) 12. बंद असलेल्या 7/12 ची यादी बरोबर आहे का ? ( Edit – सारांश अहवाल ) 13. Edit Module मधील अहवाल दुरुस्ती पर्यायातील –अ) Edit आज्ञावलीद्वारे नावाची स्पेलिंग दुरुस्ती केल्याने तयार झालेल्या अहवाल 7 ची दुरुस्ती व ब) नावाची स्पेलिंग दुरुस्ती केलेल्या रेकॉर्डची 7/12 व खाता रजिष्टर मधील दुरुस्ती हे अहवाल निरंक आहेत का ? 14. 7/12 वर खातेदाराचे नांव ज्या फेरफार क्रमांकाने दाखल झाले आहे तो फेरफार क्रमांक त्या खातेदाराचे पुढे लिहिला आहे का ? ( ODC अहवाल -8 व प्रत्यक्ष तपासणी ) 15. 7/12 वरील सर्व जुने फेरफार क्रमांक संगणकीकरणात ( History मध्ये) घेतले आहेत का ? (प्रत्यक्ष तपासणी) 16. 7/12 जेवढया खात्यांमध्ये विभागला आहे तेवढेच खाते क्रमांक 7/12 वर नमूद केले आहेत का ? एखाद्या खात्याला कंस झाला असल्यास संबंधीत खातेदाराच्या नांवाला देखील कंस झाला आहे ना ? किंवा खातेदाराचे नांवाला कंस झाला असल्यास खात्याला कंस झाला आहे ना ? याची खात्री करा. ( ODC मधील अहवाल व प्रत्यक्ष तपासणी) 17. नवीन खाते तयार केले आहे परंतु 7/12 वर त्याचा अंमल घेतला नाही अशी सर्व खाती नष्ट केली आहेत का ? ( ODC मधील अनावश्यक तयार झालेल्या खात्यांचा अहवाल व दुरुस्तीची सुविधा) 18. E-Ferfar मध्ये DBA login ने गा.न.नं.1(क) चे व्यवस्थापन केले आहे का ? भोगवटादार 1 सर्व्हे क्रमांक 1 (क) मधुन वगळणे हा अहवाल निरंक आहे का?   19. इतर हक्कात कोणत्याही नोंदी दुबार नाहीत ना ? अथवा वगळलेल्या नाहीत ना ? याबाबत खात्री करा. (प्रत्यक्ष तपासणी) 20. गा.न.नं. 12 वर पिक पाहणी / पिक पेरे पत्रक सन 2016-17 पर्यंत अद्ययावत केलेले आहे. ( ODC अहवाल 14 या अहवालासाठी शेवटच्या 3 वर्षाची पिक पाहणी विचारात घ्यावी. ) 21. सन 2017-18 अथवा त्यापुढील वर्षासाठी चुकून पिकपाहणी / पेरेपत्रक कॉपी झाले असल्यास नष्ट केले आहे का ? ( ODC मधील अहवाल व सुविधा) 22. जलसिंचनाची साधणे, लागवडी अयोग्य पडक्षेत्र, झाडांची नांवे व संख्या हस्तलिखीत 7/12 प्रमाणे नमुद केली आहेत का ? (प्रत्यक्ष तपासणी ) 23. ODBA tool मध्ये DBA login ने तालुका समरी अहवाल (अहवाल 1 ते 14 ) निरंक आहे का ? ( फक्त अहवाल -1 व 3 वगळून ) 24. अचूक संकणकीकृत 7/12 व 8 (अ) बाबत अन्य अभिप्राय दिनांक तपासणी अधिकाऱ्याचे नांव, पदनाम व स्वाक्षरी.   प्रपत्र क्रमांक -1 तपासणी करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांनी सादर करावयाचे प्रमाणपत्र. ( तलाठी- 100% / मंडळ अधिकारी- 30% /नायब तहसिलदार- 10% / तहसिलदार -5%/ उपविभागीय अधिकारी-3% / जिल्हाधिकारी-1% ) जिल्हा - उपविभाग - तालुका - सजा- गांव - प्रमाणीत करण्यात येते की, मौजे------------- तालुका ----------- या गांवातील संगणकीकृत गा.न.नं. 7/12 व हस्तलिखीत गा.न.नं. 7/12 ची रुजवात घेवून व तपासणी सूची प्रमाणे तपासणी करुन खात्री केली. त्यामध्ये हस्तलिखीत मधील सर्व नोंदी बरोबरच तालुका ऑनलाईन झाल्यापासुनच्या सर्व नोंदी अद्यावत करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये कोणतीही तफावत आढळून आली नाही म्हणून हे प्रमाणपत्र दिले असे. मी तपासणी केलेल्या सर्व्हे नंबरची याची सोबत जोडली आहे. ठिेकाण - दिनांकित स्वाक्षरी दिनांक- ( अधिकारी / कर्मचाऱ्याचे नांव व पदनाम) प्रपत्र क्रमांक -2 संबंधित तलाठी, मंडळ अधिकारी, नायब तहसिलदार व तहसिलदार यांनी गांवनिहाय संगणकीकृत 7/12 च्या डाटाच्या अचुकतेबाबत जिल्हाधिकारी यांन सादर करावयाचे प्रमाणपत्र. आम्ही खाली सहया करणार प्रमाणीत करतो की, मौजे-------------(सेन्सस कोड----------------) तालुका ----------- जिल्हा ---------- या गांवातील सर्व संगणकीकृत अचूक 7/12 च्या प्रिंटस (संख्या------------) काढुन त्या मुळ हस्तलिखीत चालु 7/12 शी रुजवात घेवुन पडताळणी करण्यात आल्या असुन संगणकीकृत 7/12 तील सर्व तपशील मूळ हस्तलिखीत 7/12 शी तंतोतंत मेळात आहे तसेच तालुका ऑनलाईन झाल्यापासुनच्या सर्व नोंदी देखील योग्य रित्या संगणकीकृत झालेल्या आहेत. डिजीटल इंडिया लँड रेकॉर्ड मॉडर्नायझेशन प्रोग्रॅम (DILRMP) कार्यक्रमांतर्गत विकसीत केलेल्या ई-चावडी व ई-फेरफार योजनेच्या अंमलबजावणीसाठी उपरोक्त नमुद 7/12 चा संगणकीकृत डाटा अचूक व योग्य आहे तो डिजीटल स्वाक्षरीने ऑनलाईन पध्दतीने खातेदारांना उपलब्ध करुन देण्यास हरकत नाही. (नांव, स्वाक्षरी) (नांव, स्वाक्षरी) (नांव, स्वाक्षरी) (नांव, स्वाक्षरी) तलाठी---------- मंडळ अधिकारी------- ना.तहसिलदार(DBA) तहसिलदार--------

Comments

Archive

Contact Form

Send