रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

अचुक गा.न.नं. 7/12 व 8अ साठी घोषणापत्र-3 करुन गुणवत्तापुर्वक काम करणेबाबत चेकलिस्ट

विषय – अचुक गा.न.नं. 7/12 व 8अ साठी घोषणापत्र-3 करुन
गुणवत्तापुर्वक काम करणेबाबत चेकलिस्ट
संदर्भ –1. या कार्यालयाचे परिपत्रक दिनांक 3 डिसेंबर,2015.
2. या कार्यालयाचे परिपत्रक दिनांक 5 मे 2017.
3. या कार्यालयाचे परिपत्रक दिनांक 10 जुलै 2017.
4. इकडील मा.जमाबंदी आयुक्त यांचे दिनांक 2 सप्टेंबर, 2017
चे अ.शा.प./रा.भु.अ.आ.का.-4/रि- एडिट/17.

चावडी वाचनाच्या विशेष मोहिमेनंतर अचुक गा.न.नं. 7/12 व 8अ च्या कामासाठी उपलब्ध करुन दिलेल्या Re-
Edit Module मधील घोषणापत्र 1,2,3 सह गुणवत्तापुर्वक काम पुर्ण करण्यासाठी खालील चेकलिस्ट (तपासणी सुची) वापरावी. तलाठी
अथवा तहसिलदार यांनी घोषणापत्र-3 दिलेल्या गावांसाठी खालीलप्रमाणे सर्व बाबी पुर्ण केल्या असल्याची खात्री तहसिलदार यांनी
करावी.
1. घोषणापत्र -3 पुर्ण केलेल्या गावांतील दुरुस्त 7/12 च्या Print out काढुन त्यांची तपासणी पुर्ण करुन ठरवून दिलेल्या बिंदुच्या
7/12 वर तलाठी व मंडल अधिकारी व संबंधीत महसुल अधिकाऱ्याचे नांव व पदनाम टाकुन दिनांकित स्वाक्षरी केली आहे व हे
सर्व स्वाक्षरीत 7/12 तालुका अभिलेख कक्षात जमा केले आहेत.
2. सर्व संबंधीत महसुल अधिकाऱ्यांनी 7/12 तपासणी केलेबाबत चे प्रपत्र - 1 मधील प्रमाणपत्र सादर केले आहेत. (
दिनांक 5/5/2017) व ते सर्व तालुका अभिलेख कक्षात जमा केले आहेत.
3. घोषणापत्र - 3 पुर्ण करण्यापुर्वी ODC मधील सर्व 1 ते 26 अहवाल ( 1 व 3 वगळुन) व समान नांवे असलेल्या खाते क्रमांकाचा
अहवाल निरंक करणेत आले आहेत व तालुका समरी अहवालाची प्रत तलाठी, मंडल अधिकारी यांचे स्वाक्षरीने तालुका अभिलेख
कक्षात जमा करुन घेतली आहे.
4. घोषणापत्र – 3 करण्यापुर्वी पालक महसुल अधिकाऱ्याने या गावाचे घोषणापत्र – 2 झालेनंतर 1 ते 24 मुद्यांवर तपासणी करुन
तपासणी अहवाल तलाठी, मंडळ अधिकारी यांचे मार्फत तहसिलदार यांचेकडे सादर केला आहे व काम गुणवत्तापुर्वक पुर्ण
झाल्याचे प्रमाणपत्र केले आहे का ?
5. घोषणापत्र – 3 पुर्ण करण्यापुर्वी संगणकीकृत गा.न.नं. 1 (क) व हस्तलिखीत गा.न.नं. 1 (क) ची रुजवात घेतली असुन ते अचुक
असल्याचे पालक महसुल अधिकाऱ्याने प्रमाणीत केले आहे का ? मुळ 1 (क) मध्ये वर्ग-2 च्या जमीनी अनाधिकार वर्ग – 1 मध्ये
घेतलेल्या नाहीत ना ? (याची खात्री )स्वत: पालक महसुल अधिकारी यांनी स्वत: करावी.
6. घोषणापत्र – 3 पुर्ण करण्यापुर्वी संगणकीकृत 8 अ (गावची खाते नोंदवही) Print out काढुन ती अचुक असल्याबाबत खात्री
करावी.
7. घोषणापत्र – 3 पुर्ण करण्यापुर्वी सर्व अकृषीक 7/12 चे क्षेत्र आर.चौ.मी. मध्ये व शेती क्षेत्राचे 7/12 चे क्षेत्र हे.आर मध्ये बिनचुक
भरुन अकृषीक क्षेत्राचा योग्य आकार भरल्याची खात्री करावी तहसिलदार यांचा क्षेत्र रुपांतराचा आदेश पहावा.
8. Re-Edit Module च्या सर्व परिशिष्ट व आदेशाच्या प्रती स्वाक्षरीसह दप्तरी असल्याची खात्री करावी.
9. घोषणापत्र 1,2 व 3 च्या प्रती सर्व संबंधीतांच्या स्वाक्षरीसह तालुका अभिलेख कक्षात जमा करण्यात आल्याची तहसिलदार यांनी
स्वत: खात्री करावी.
वरील चेकलिस्ट प्रमाणे कार्यवाही पुर्ण झाल्याची संक्षिप्त टिपणी तलाठी, मंडळ अधिकारी, डी.बी.ए. यांनी तयार
करुन सर्व अभिलेख तहसिलदार यांचे अवलोकनार्थ सादर करुनच काम पुर्ण झाल्याची घोषणा करावी.
सदरच्या सूचना सर्व वापरकर्त्यांच्या निदर्शनास आणाव्यात ही विनंती.
आपला,
( रामदास जगताप )
राज्य समन्वयक, रा.भू.अ.आ.का.

Comments

Archive

Contact Form

Send